राज-उद्धव एकत्र येतील का, राज म्हणाले परमेश्वराला माहीत, उद्धव म्हणतात, सध्याचा काळ कठीण, सर्वांनी एकत्र येणं आवश्यक

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) एकत्र येणार का, या प्रश्नाचं उत्तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं.

राज-उद्धव एकत्र येतील का, राज म्हणाले परमेश्वराला माहीत, उद्धव म्हणतात, सध्याचा काळ कठीण, सर्वांनी एकत्र येणं आवश्यक
raj thackeray-uddhav thackeray

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सर्वांना पडलेला प्रश्न म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) एकत्र येणार का, या प्रश्नाचं उत्तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं. लोकसत्ता (Loksatta) दैनिकाच्या मुलाखतीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज ठाकरेंनी दिलेल्या उत्तरावर प्रश्न विचारण्यात आला. तुम्ही दोन्ही भाऊ एकत्र येणार का?, असा प्रश्न राज ठाकरे यांना विचारण्यात आला. त्यावर राज ठाकरे यांनी दोन्ही हात आकाशाकडे दाखवत ‘परमेश्वरालाच ठाऊक’ असं उत्तर दिलं होतं. तोच प्रश्न उद्धव ठाकरे यांना विचारण्यात आला. (will Raj Thackeray and Uddhav Thackeray come together question asked in Loksatta interview shiv sena MNS alliance)

त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, “ज्या गोष्टी परमेश्वराला माहिती असतील, त्या मला माहिती असणं शक्य नाही”

कठीण काळात सर्वांनी एकत्र येणं आवश्यक 

व्यापक प्रयत्न म्हणून ममता, जगनमोहन रेड्डी यांना हाक देताय. मग संभाव्य खेळाडू मनसे असू शकतो का? असा प्रश्न विचारण्यात आला.

त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले, “देशासाठी, राज्यासाठी जे एकत्र येऊ शकतात, त्यांनी आताच्या घडीला एकत्र यावं, सध्या देशात जे संकट आहे ते साधंसुधं नाही, या परिस्थितीला योग्यप्रकारे सामोरं गेलो नाही तर देशात अराजक येईल. लॉकडाऊन किती काळ चालवायचा माहिती नाही, माझी प्राथमिकता जीव वाचवण्याला आहे, घरचा कर्ता पुरुष गेला तर अर्थचक्राला काय अर्थ? माझं म्हणणं आहे जे जे या विचारासाठी एकत्र येऊ शकतात, त्यांनी एकत्र यायला हवं, राजकारण थांबवावं” असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

खुर्ची खेचाल, पण खुर्ची माझं स्वप्नच नव्हतं

“माझी खुर्ची खेचाल, खुर्ची हे माझं स्वप्न नव्हतं, पण काळ कठीण आहे. पुत्रकर्तव्य म्हणून मी खुर्चीवर आहे. बाळासाहेबांना हातात हात देऊन वचन दिलं होतं, तुमचा शिवसैनिक मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसवेन, मात्र अजून माझं वचन पूर्ण झालेलं नाही. मी पुत्र म्हणून त्यांना वचन दिलं.. मी जबाबदारी घेतली, मी माझ्यासाठी काही करत नाही, मला मुख्यमंत्रिपदाची अभिलाषा नव्हती. खुर्ची हे वैभव आहे, देवाची दया आहे, अनेकांचं स्वप्न या खुर्चीचं होतं. त्यामुळे माझी खुर्ची खेचाल, तुम्ही बसा. पण खुर्चीचा मुद्दा काय आहे तर काम करा, माझ्यापेक्षा दुसरा काम करत असेल तर बरं आहे”, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

राज ठाकरे काय म्हणाले होते? 

तुम्ही दोन्ही भाऊ एकत्र येणार का?, असा प्रश्न राज ठाकरे यांना विचारण्यात आला. त्यावर राज ठाकरे यांनी दोन्ही हात आकाशाकडे दाखवत ‘परमेश्वरालाच ठाऊक’ असं उत्तर दिलं. त्यावर तुम्ही परमेश्वराला मानता का? असा सवाल करण्यात आला. तेव्हा, म्हणजे काय? परमेश्वराला मानतो म्हणूनच परमेश्वरालाच ठाऊक असं म्हणालो.

संबंधित बातम्या  

शिवसेना-भाजप पुन्हा कधी एकत्र येऊ शकतात? उद्धव ठाकरे म्हणतात..

राज-उद्धव एकत्र येतील काय?; आकाशाकडे हात दाखवत राज म्हणाले…

(will Raj Thackeray and Uddhav Thackeray come together question asked in Loksatta interview shiv sena MNS alliance)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI