पलट के आऊंगी...देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्यानंतर अमृता फडणवीसांचे ट्विट

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृती फडणवीस यांनी ट्विटरवर शायरी पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त (Amruta fadnavis tweet) केल्या.

पलट के आऊंगी...देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्यानंतर अमृता फडणवीसांचे ट्विट

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या निकाल लागल्यानंतर राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी पाहायला (Amruta fadnavis tweet) मिळाल्या. यानंतर शिवसेनेने भाजपसोबत युती तोडत थेट राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत आघाडी करत सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला. पण महाराष्ट्र विकास आघाडीने सरकार स्थापनेचा दावा करण्यापूर्वीच रातोरात अजित पवारांच्या पाठिंब्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेत सरकार स्थापन (Amruta fadnavis tweet) केले. मात्र बहुमत नसल्याने मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला. यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृती फडणवीस यांनी ट्विटरवर शायरी पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त (Amruta fadnavis tweet) केल्या.

“पलट के आऊंगी शाखों पे खुशबुएँ लेकर, खिजां की ज़द में हूँ मौसम ज़रा बदलने दे !, गेल्या 5 वर्षात वहिनी म्हणून महाराष्ट्राने जो आदर दिला. तुम्ही जे प्रेम केलात त्याबद्दल मी कायम तुमची ऋणी राहीन. असे अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे.

अमृता फडणवीस यांच्या या ट्विटनंतर नेटकऱ्यांनी या ट्वीटला अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. अमृता फडणवीस सक्रीय राजकारणात नसूनही त्या नेहमी सोशल मीडियावर चर्चेत (Amruta fadnavis tweet) असतात.

एकीकडे देवेंद्र फडणवीस यांचं सरकार अवघ्या 4 दिवसात कोसळल्यानंतर महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं महाविकासआघाडीचं सरकार येणार हे निश्चित झालं आहे. नुकतंच शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांची संयुक्त पत्रकार परिषद ट्रायडेंट हॉटेलला पार पडली. यानंतर महाविकासआघाडीचे नेते राजभवनावर सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी गेले.

राज्यपालांना भेटून आल्यानंतर युवासेना नेते आदित्य ठाकरे यांनी बाबतची माहिती दिली. “आम्ही राज्यपालांना भेटून सत्तास्थापनेचा दावा केला. येत्या 28 नोव्हेंबरला संध्याकाळी 6 वाजून 40 मिनिटांनी शपथविधी उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी राज्यपालांनी महाविकासआघाडीला 3 डिसेंबरपर्यंत बहुमत सिद्ध करा,” असे आदेश (Amruta fadnavis tweet) दिले आहेत.

मुख्यमंत्रिपदी उद्धव ठाकरेच!

राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ गटनेते जयंत पाटील यांनी महाविकासआघाडीच्या नेतेपदी आणि राज्याचे मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असावे असा ठराव मांडला. या  ठरावाला शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि मित्रपक्षांच्या सर्व आमदारांनी एकमताने मंजूर करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांना नावाला एकमताने मंजूरी देण्यात आली. यामुळे आता महाराष्ट्रात ठाकरे सरकार असणार आहे.

येत्या 28 नोव्हेंबर रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाची शपथही घेणार आहेत. तर भाजप प्रबळ विरोधी पक्ष म्हणून विधानसभेत बसणार आहे.

संबंधित बातम्या : 

उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीची तारीख बदलली

अजित पवारांची ‘घरवापसी’! बंडखोरीनंतर पहिल्यांदाच अजित पवार शरद पवारांच्या भेटीला

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *