AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लाडकी बहीण योजनेच्या पैशांवरून मोठा गोंधळ, महिला संतापल्या, E-KYC करूनही…

राज्य सरकारने ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजना आणली. या लाडकी बहीण योजनेचा महायुतीला प्रचंड फायदा झाला. मात्र, ईकेवायसीमुळे अनेक महिलांना पैसे येणे बंद झाले. आता महिलांनी मोठा गोंधळ घातलाय.

लाडकी बहीण योजनेच्या पैशांवरून मोठा गोंधळ, महिला संतापल्या, E-KYC करूनही...
ladki bahin yojana
| Updated on: Feb 28, 2026 | 10:38 AM
Share

राज्य सरकारने राज्यात महिलांसाठी ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजना आणली. या लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत राज्यातील महिलांना दरमहिन्याला सरकारकडून 1500 रूपये मानधन दिले जाते. मात्र, या योजनेचा लाभ घेण्याकरिता काही नियम आणि अटीही सरकारकडून ठरून देण्यात आल्या. ज्याीवेळी ही योजना आली, त्यावेळी सरकारने महिलांनी केलेल्या अर्जांनुसार, सरसकट अर्ज मंजूर करून लाडकी बहीण योजनेचे पैसे दिले. मात्र, अनेक महिलांनी अर्ज करताना नियम आणि अटी बाजूला सारून अर्ज केले. आता महिला व बालकल्याण विभागाकडून अर्जाची छाननी बारीकपणे केली जात आहेत. यासोबतच ईकेवायसीचीही अट ठेवण्यात आली. यादरम्यान केवाएसी करूनही लाडकी बहीण योजनेचे पैसे येत नसल्याची ओरड अनेक महिलांची आहे.

महिला बालकल्याण विभागात महिलांचा मोठा गोंधळ 

ई-केवायसी करूनही लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत नसल्याने जळगावात महिला व बालकल्याण विभागाच्या कार्यालयात महिलांनी गोंधळ घातल्याचे बघायला मिळाले. गोंधळ वाढल्याचे पाहून कर्मचाऱ्यांनी महिलांना कार्यालयाबाहेर काढले आणि मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप लावून घेतल्याचा प्रकार. महिला पैसे न मिळाल्याने गोंधळ घातल होत्या.

लाडकी बहीण योजनेचे पैसे येणे बंद झाल्याने महिला संतापल्या 

लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद झाल्याने जिल्हाभरातील वेगवेगळ्या तालुक्यांमधील महिलांनी महिला व बालकल्याण विभागाचे कार्यालय गाठत गोंधळ घातला. कार्यालयात विचारणा करण्यासाठी गेलेल्या महिलांच्या प्रश्नांना उत्तर देण्याऐवजी कर्मचाऱ्यांनी त्यांच्याशी अरेरावी केल्याचा आरोप महिलांनी केला आहे.

कर्मचाऱ्यांनी गोंधळ घालणाऱ्या महिलांना काढले कार्यालयाबाहेर 

दोन तास चाललेल्या या प्रकारानंतर संतप्त महिलांनी स्वतः व्हिडिओ बनवून घेत आपली व्यथा मांडून लक्ष वेधून घेतले.  महिलांचे व्हिडिओ सोशल मिडिव्यावर व्हायरल झाले आहेत. मात्र, महिलांचा गोंधळ अधिक वाढल्याचे लक्षात येताच कर्मचाऱ्यांनी महिलांना कार्यालयाच्या बाहेर काढून थेट कुलूप लावले. यानंतर महिला या अधिकच संतापल्याचे बघायला मिळाले. ईकेवायसी करूनही लाडकी बहीण योजनेचे हप्ते मिळत नसल्याची ओरड गेल्या काही महिन्यांपासून महिलांची आहे.

Follow Us
संभाजीनगरात गरवारे स्टेडियमसाठी झाडांची कत्तल! वृक्षप्रेमींचा विरोध
संभाजीनगरात गरवारे स्टेडियमसाठी झाडांची कत्तल! वृक्षप्रेमींचा विरोध.
दादा सोबत नाही, पचवणं खूप कठीण जातंय; सुप्रिया सुळेंची भावनिक पोस्ट
दादा सोबत नाही, पचवणं खूप कठीण जातंय; सुप्रिया सुळेंची भावनिक पोस्ट.
राज्यसभेत 2 खासदार असणं आमची गरज! राऊत स्पष्टच बोलले
राज्यसभेत 2 खासदार असणं आमची गरज! राऊत स्पष्टच बोलले.
क्लोजर रिपोर्टनंतर राजकीय वाद पेटला; राऊतांचे थेट आरोप
क्लोजर रिपोर्टनंतर राजकीय वाद पेटला; राऊतांचे थेट आरोप.
संभाजीनगरमध्ये परीक्षा केंद्रावर शिक्षकाचं विद्यार्थिनीशी गैरवर्तन!
संभाजीनगरमध्ये परीक्षा केंद्रावर शिक्षकाचं विद्यार्थिनीशी गैरवर्तन!.
त्या काळ्या दिवशी मी अजितदादांच्या नंबरवर... रोहित पवारांचं ट्विट
त्या काळ्या दिवशी मी अजितदादांच्या नंबरवर... रोहित पवारांचं ट्विट.
सासरच्या छळाला कंटाळली अन् नवविवाहितेने उचलले टोकाचे पाऊल
सासरच्या छळाला कंटाळली अन् नवविवाहितेने उचलले टोकाचे पाऊल.
वाल्मिक कराडच्या मुलाची पोस्ट; धनंजय देशमुख संतापले!
वाल्मिक कराडच्या मुलाची पोस्ट; धनंजय देशमुख संतापले!.
वाल्मिक कराडच्या मुलाची 'ती' पोस्ट चर्चेत! पोस्टमध्ये काय?
वाल्मिक कराडच्या मुलाची 'ती' पोस्ट चर्चेत! पोस्टमध्ये काय?.
जागा एक, इच्छुक ढीगभर! राज्यसभेसाठी मविआत चढाओढ
जागा एक, इच्छुक ढीगभर! राज्यसभेसाठी मविआत चढाओढ.