‘बरं झालं स्वामी बोलले, नाहीतर राष्ट्रद्रोह झाला असता’, यशोमती ठाकूर यांचा भाजपला टोला

भाजपचेच नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी थेट ट्विट करत भाजपाची आणि केंद्र सरकारची पोलखोल केली आहे, त्यामुळे केंद्र सरकारने आता सत्य लपवण्याऐवजी सर्वांसमोर उघड करावे," अशी मागणी यशोमती ठाकूर यांनी केली.

'बरं झालं स्वामी बोलले, नाहीतर राष्ट्रद्रोह झाला असता', यशोमती ठाकूर यांचा भाजपला टोला


मुंबई : “केंद्र सरकारवर फोन टॅपिंग करून हेरगिरीचा आरोप आहे. मात्र याप्रकरणी कोणताही फोन टॅपिंग केला नसल्याचे केंद्र सरकारने सांगितलं. पेगासस सॉफ्टवेअरच्या माध्यमातून कोणतेही फोन टॅपिंग झालं नसल्याचा दावा केंद्राने केला. मात्र त्यानंतरही भाजपचेच नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी थेट ट्विट करत भाजपाची आणि केंद्र सरकारची पोलखोल केली आहे, त्यामुळे केंद्र सरकारने आता सत्य लपवण्याऐवजी सर्वांसमोर उघड करावे,” अशी मागणी काँग्रेस नेत्या आणि महिला बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी केली आहे (Yashomati Thakur criticize BJP over Pegasus Malware and Phone tapping).

यशोमती ठाकूर म्हणाल्या, “जर लपवण्यासारखं काही नाही, तर मोदी यांनी इस्राईलला विचारून पेगासस प्रकरणी कोणाला पैसे दिले याची माहिती घ्यावी आणि ती उघड करावी असं आव्हानच सुब्रमण्यम स्वामी यांनी केंद्र सरकारला दिले आहे. भाजपच्या सुब्रमण्यम स्वामी यांनी ही मागणी केल्याने केंद्र सरकार लपवाछपवी करते आहे हे स्पष्ट झाले.”

“सुब्रमण्यम स्वामी यांच्याच मागणीचा भाजपने तातडीने विचार करून देशासमोर सत्य उघड करावे. स्वामी यांनी मागणी केल्याने आता सुंठीवाचून खोकला गेला असे म्हणावे लागेल. अन्यथा, काँग्रेस किंवा अन्य विरोधी पक्षांनी याबाबत मागणी केली असती तर त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा खटला दाखल करायला सरकारने मागेपुढे पाहिले नसते,” असा टोला यशोमती ठाकूर यांनी लगावला आहे.

श्रीक्षेत्र कौंडण्यपूरला पालखी मार्गाशी जोडावे, यशोमती ठाकूर यांची नितीन गडकरींकडे मागणी

दरम्यान, माता रुक्मिणीचे माहेर असलेल्या श्री क्षेत्र कौंडण्यपूर येथील पालखीचे महाराष्ट्राच्या वारी परंपरेत मानाचे स्थान आहे. 427 वर्षांची ही प्राचीन परंपरा जपण्यासाठी कौंडण्यपूरला राज्यात साकार होत असलेल्या पालखी मार्गाशी जोडण्यात यावे, अशी विनंती यशोमती ठाकूर यांनी केंद्रीय भूपृष्ठ व रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. त्यांनी गडकरी यांची भेट घेऊन हे निवेदन दिले व विविध विषयांवर चर्चा केली.

केंद्रपुरस्कृत पालखी मार्ग योजनेअंतर्गत शेगाव अकोला मेडशी अंबेजोगाई परळी मंगळवेढा पंढरपूर मार्ग प्रस्तावित आहे. काही ठिकाणी कामांनाही सुरुवात झाली आहे. अमरावती शहरापासून कौंडण्यपूर 40 किलोमीटरवर आहे. कौंडण्यपूर पालखी मार्गाला जोडल्यास या प्राचीन पालखी परंपरेसाठी अत्याधुनिक मार्गाची सुविधा उपलब्ध होईल. त्यामुळे ही सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी विनंती पालकमंत्र्यांनी निवेदनाद्वारे केली.

हेही वाचा :

अमरावतीच्या कौडण्यपूर येथील रुखमाईच्या पालखीचं पंढरपूरकडं प्रस्थान, यशोमती ठाकूर यांची उपस्थिती

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेविरोधात लढण्यासाठी अमरावती सज्ज, उपजिल्हा, ग्रामीण रुग्णालयात लहान मुलांसाठी राखीव ऑक्सिजन बेड

यशोमती ठाकूर यांची मध्यस्थी यशस्वी, अमरावतीत 48 तरुणांची नोकरी वाचवली

व्हिडीओ पाहा :

Yashomati Thakur criticize BJP over Pegasus Malware and Phone tapping

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI