कराडच्या कृष्णा साखर कारखान्यावर कुणाची सत्ता, मतदानाकडे प. महाराष्ट्राचं लक्ष

पश्चिम महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी (Krishna Sugar Mill Election voting ) आज मतदान होत आहे.

कराडच्या कृष्णा साखर कारखान्यावर कुणाची सत्ता, मतदानाकडे प. महाराष्ट्राचं लक्ष
यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना

कराड, सातारा : पश्चिम महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. सातारा आणि सांगली जिल्ह्यातील पाच तालुक्यामध्ये या कारखान्याचे कार्यक्षेत्र आहे. या कार्यक्षेत्रात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, राज्यमंत्री विश्वजीत कदम या दिग्गजांचे विधानसभा मतदारसंघ येतात.
(Yashwantrao Mohite Krishna Sugar Mill Election voting live today Karad Satara Sahakar Panel vs Rayat Panel Suresh Bhosale vs Indrajeet Mohite)

सध्या कारखान्याची सत्ता जयवंतराव भोसले सहकार पॅनलकडे आहे. त्याचे नेतृत्व डॉ. सुरेश भोसले करत आहेत. तर विरोधात अविनाश मोहिते नेतृत्व करत असलेले संस्थापक पॅनेल आणि डॉ. इंद्रजीत मोहिते रयत पॅनेल लढत आहे. गेल्या दोन महिन्यात या सगळ्या परिसरात आक्रमकपणे प्रचार सुरू आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा साखर कारखाना असल्याने याची सत्ता मिळवण्यासाठी सर्वच पॅनेलनी जोरदार प्रयत्न केले आहेत. 47 हजार 160 मतदान आहे. पाच तालुक्यातील 148 मतदान केंद्रावर मतदान होत आहे. 1480 कर्मचारी मतदान प्रक्रियेसाठी काम करणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व काळजी घेण्यात येत आहे.

कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीसाठी भाजपा नेते डॉ. अतुल भोसले, सौ. गौरवी भोसले आणि विनायक भोसले विद्यमान चेअरमन डॉ सुरेश भोसले यांनी रेठरे बुद्रुक येथे मतदान केले. सत्ताधारी सहकार पॅनल या निवडणुकीत जिंकेल असा दावा, डॉ. अतुल भोसले चेअरमन डॉ सुरेश भोसले यांनी केला.

कुणाविरोधात कोण लढतंय?

दरम्यान पश्चिम महाराष्ट्रातला सर्वात मोठा सहकारी साखर कारखाना म्हणून कराडच्या यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची ओळख आहे. जयवंतराव भोसले सहकार पॅनल हे सत्ताधारी आहे. विद्यमान चेअरमन डॉ. सुरेश भोसले, डॉ. अतुल भोसले यांनी अर्जही दाखल केला आहे.

तिरंगी लढत कशी होणार?

डॉ. सुरेश भोसले आणि डॉ. अतुल भोसले यांनी सत्ताधारी जयवंतराव भोसले सहकार पॅनलकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आता त्यांच्याविरोधात कारखान्याचे माजी चेअरमन अविनाश भोसले यांच्या संस्थापक पॅनल आणि इंद्रजित मोहिते यांच्या रयत पॅनलचे आव्हान असेल.

48 हजाराहून अधिक सभासद मतदानाचा हक्क बजावणार

या निवडणुकीसाठीच्या प्रचाराची रणधुमाळी संपली आहे. कृष्णा कारखान्याची निवडणूक तिरंगी होत असून उद्या 29 जूनला यासाठी मतदान होत आहे. सातारा सांगली जिल्ह्यात या कारखान्याचे कार्यक्षेत्र असून जवळपास 48 हजाराहून अधिक सभासद आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

कृष्णा साखर कारखान्याची निवडणूक महत्त्वाची का?

कराडचा यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना हापश्चिम महाराष्ट्रातला सर्वात मोठा कारखाना म्हणून ओळखला जातो. त्याचं कार्यक्षेत्र सातारा, सांगली अशा दोन जिल्ह्यात आहे. 47 हजार 700 एवढी सभासद संख्या आहे. या महिन्याच्या शेवटी म्हणजेच 29 जूनला निवडणूक होते आहे. तर निकाल हा 1 जुलै रोजी लागेल.

कारखाना मोठा आणि सभासद संख्याही मोठी असल्यामुळे दोन्ही जिल्ह्यातल्या राजकारणावर ह्या निकालाचे परिणाम होणार हे निश्चित. राज्य सहकारी संस्था निवडणूक प्राधिकरणाकडून यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक उच्च न्यायालयाच्या आदेशानं घेण्यात येत आहे. सातारा, सांगली जिल्ह्यातील पाच तालुक्यात कारखान्याचे कार्यक्षेत्र आहे.

संबंधित बातम्या 

कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणूक, प्रचाराची रणधुमाळी संपली, मंगळवारी मतदान

कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणूक, महाडिक बंधूंचा ‘या’ पॅनेलला पाठिंबा

कृष्णा सहकारी कारखान्याच्या तिरंगी निवडणुकीत ट्विस्ट, विश्वजीत कदमांचा ‘या’ पॅनेलला पाठिंबा

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI