महादेव जानकरांकडून बारामतीतून लढण्याची घोषणा, पण दानवे म्हणतात...

बारामती : येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत आले तर तुमच्यासह, नाहीतर त्यांच्याशिवाय निवडणुकांना सामोरे जाऊ, असं म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेला अप्रत्यक्ष उत्तर दिलंय. त्याचवेळी त्यांनी रासपचे महादेव जानकर यांच्या लोकसभा उमेदवारीबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचं सांगत जानकरांच्या उमेदवारीचा बार फुसका ठरवलाय. दुसरीकडे धनगर आरक्षणाबाबत भाजपची अद्यापही वेट अँड वॉचची भूमिका असल्याचं दानवेंच्या वक्तव्यावरुन स्पष्ट …

महादेव जानकरांकडून बारामतीतून लढण्याची घोषणा, पण दानवे म्हणतात...

बारामती : येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत आले तर तुमच्यासह, नाहीतर त्यांच्याशिवाय निवडणुकांना सामोरे जाऊ, असं म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेला अप्रत्यक्ष उत्तर दिलंय. त्याचवेळी त्यांनी रासपचे महादेव जानकर यांच्या लोकसभा उमेदवारीबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचं सांगत जानकरांच्या उमेदवारीचा बार फुसका ठरवलाय. दुसरीकडे धनगर आरक्षणाबाबत भाजपची अद्यापही वेट अँड वॉचची भूमिका असल्याचं दानवेंच्या वक्तव्यावरुन स्पष्ट झालंय.

बारामती लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी दानवे बुधवारी बारामतीत आले होते. यावेळी त्यांना अनेक प्रश्न विचारण्यात आले असता त्यांनी उत्तरं दिली. समविचारी पक्षांनी एकत्र यावं, अशी इच्छा असल्याचं त्यांनी सांगितलं. वाचाबारामती लोकसभा : जानकरांनी दमछाक केली, पण यंदा सुप्रिया सुळेंचा मार्ग सुकर

बारामती लोकसभा मतदारसंघासाठी आपण लढणार असल्याचे महादेव जानकर यांनी अनेक वेळा जाहीर केल्याबाबत दानवे यांना विचारलं. “त्यांच्याशी आमची याबाबत अद्याप चर्चाच झालेली नाही, असं दानवेंनी स्पष्ट केलं. त्यावरून बारामती लोकसभा मतदारसंघाबाबतील जानकारांच्या उमेदवारीचा बार फुसकाच असल्याचं दानवे यांच्या जाहीर वक्तव्यातून स्पष्ट होतंय.

लोकसभा निवडणुकीच्या अगोदर धनगर समाजाला आरक्षण मिळेल का, असा प्रश्नही दानवेंना विचारण्यात आला. भाजपची भूमिका ही धनगर समाजाला आरक्षण मिळावे अशीच आहे, असं यावर त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बारामतीच्या विधानाचा दाखला देत येणाऱ्या अधिवेशनात यावर चर्चा करून केंद्राला शिफारस करु, असं मत दानवेंनी मांडलं.

2014 च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाट, महाराष्ट्रात निर्माण झालेला धनगर आरक्षणाचा प्रश्न यामुळे बारामतीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांना विजयासाठी झगडावं लागलं होतं. या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्या विरोधात भाजप, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि राष्ट्रीय समाज पक्षाच्या आघाडीकडून महादेव जानकर यांनी आव्हान निर्माण केलं. या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांना बारामती, इंदापूर आणि काही प्रमाणात भोर विधानसभा मतदारसंघात मताधिक्य मिळून त्यांनी महादेव जानकर यांचा 69 हजार 719 मतांनी पराभव केला.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *