बारामतीत एकाच कुटुंबातील चौघे ‘कोरोना’मुक्त, तालुक्यात आता एकच रुग्ण!

बारामतीत एकूण सात जणांना 'कोरोना'ची लागण झाली होती. यातील भाजी विक्रेत्याचा मृत्यू झाला, तर उर्वरित सहा जणांपैकी पाच जणांनी कोरोनावर मात केली. (Baramati Four Members of Family Corona Free)

बारामतीत एकाच कुटुंबातील चौघे 'कोरोना'मुक्त, तालुक्यात आता एकच रुग्ण!
Follow us
| Updated on: Apr 24, 2020 | 10:20 AM

बारामती : ‘कोरोना’ने बळी घेतलेल्या बारामतीमधील रुग्णाच्या कुटुंबातील चौघे जण ‘कोरोना’मुक्त झाले आहेत. ‘कोरोना’मुळे मृत्युमुखी पडलेल्या भाजी विक्रेत्याचा मुलगा, सून आणि दोन्ही नातींवर यशस्वी उपचार करण्यात आले. एकीकडे पुणे जिल्ह्यात कोरोनाचा विळखा वाढत असताना बारामतीमध्ये रुग्णांनी कोरोनावर मात केल्याचं दिलासादायक चित्र आहे. (Baramati Four Members of Family Corona Free)

बारामतीत एकाच कुटुंबातील पाच जणांना ‘कोरोना’ची लागण झाल्याने सर्वांची धाकधूक वाढली होती. या कुटुंबातील वृद्ध भाजी विक्रेत्याचा ‘कोरोना’मुळे मृत्यू झाला होता. मात्र आता, त्याचा मुलगा, सून यांच्यासोबत सात आणि एका वर्षाच्या नातीवर यशस्वी उपचार झाले. त्यामुळे आरोग्य यंत्रणेने सुटकेचा निश्वास सोडला आहे.

बारामतीत एकूण सात जणांना ‘कोरोना’ची लागण झाली होती. यातील भाजी विक्रेत्याचा 9 एप्रिलला मृत्यू झाला, तर उर्वरित सहा जणांपैकी पाच जणांनी कोरोनावर मात केली. बारामतीतील पहिला ‘कोरोना’ रुग्ण ठरलेला रिक्षाचालक आधीच कोरोनामुक्त झाला आहे. आता आणखी चौघे रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे बारामतीत आता एकच कोरोनाग्रस्त रुग्ण असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली.

हेही वाचा : इस्लामनुसार प्रार्थना करा, शासकीय नियमानुसार अंत्यविधी करा, बारामतीतील कोरोनाबाधित कुटुंबाचा आदर्श

न्यूमोनियाचं निदान झालेल्या या रुग्णाला पुण्यात तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. तेव्हा त्याला कोरोनाची लागण झाल्याचं मंगळवार 14 एप्रिलला स्पष्ट झालं होतं. पुढील काही दिवसात हा रुग्णही कोरोनावर मात करेल, अशी अशा आहे.

बारामती पॅटर्न

कोरोनाचा वाढता विळखा पाहता बारामती नगरपरिषदेने कोरोनाला रोखण्यासाठी एक अनोखी शक्कल लढवली आहे. बारामतीतील 44 वॉर्डमधील 44 नगरसेवक, 44 झोनल ऑफिसर, 44 पोलीस कर्मचारी आणि 440 स्वयंसेवक मिळून बारामतीकरांना अत्यावश्यक सुविधा घरपोच पोहोचवत आहेत. (Baramati Four Members of Family Corona Free)

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बारामती शहरामध्ये प्रशासन आणि पोलीस यंत्रणेमार्फत एकूण 44 झोन तयार करण्यात आले आहेत. त्यामध्ये प्रत्येक झोनसाठी मदत सहायता अधिकारी, त्यांना सहाय्य करण्यासाठी 10 स्वयंसेवक आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी 1 वॉर्ड मार्शल यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्या मदतीने आरोग्य सेवा, रेशन, अन्नधान्य पुरवठा, दूध आणि भाजीपाला, फळे, गॅस सिलेंडर घरपोच देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी आणि त्याची साखळी तोडण्यासाठी या टीममार्फत ज्या रुग्णांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे, त्यांचे हाय रिस्क कॉन्टॅक्ट आणि लो रिस्क कॉन्टॅक्ट शोधून वेळीच त्यांना वेगळं करण्यात येईल. गरज भासल्यास त्यांची कोविड-19 तपासणी करण्यात येईल.

आरोग्य विभागाकडून अशा रुग्णांची तपासणी करुन ज्यांना रक्तदाब (बीपी), मधुमेह (शुगर) आणि इतर गंभीर आजार असल्यास शोधून त्यांची तपासणी करता येईल. यादरम्यान, सोशल डिस्टंसिंगची अंमलबजावणी होते की नाही, यावर देखील नजर ठेवता येणे शक्य होईल.

या पॅटर्नमध्ये समाविष्ट लोकांव्यतिरिक्त इतर कुणीही रस्त्यावर येणार नाही, असे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. किराणा, भाजीपाला, दूध औषधं यांसह जीवनावश्यक वस्तू घरपोच दिल्या जातील.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ‘कोरोना’ रोखण्यासाठी वापरण्यात आलेल्या ‘बारामती पॅटर्न’वर फिदा असल्याचं दिसतंय. कारण पुण्यातील कोरोना रोखण्यासाठी बारामती पॅटर्न राबवता येईल का, याबाबत चंद्रकांत पाटलांनी मनपा आयुक्तांशी चर्चा केली.

(Baramati Four Members of Family Corona Free)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.