पूरग्रस्त कोल्हापूर, सातारा, सांगलीत येत्या दोन दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा

पूरग्रस्त कोल्हापूर, सातारा, सांगलीत येत्या दोन दिवसांत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. पुणे वेधशाळेने येत्या दोन दिवसांत या तिन्ही जिल्ह्यांमध्ये पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे पूरग्रस्त कोल्हापूर, सातारा, सांगलीमध्ये धाकधूक वाढली आहे.

heavy rain in next two days in Kolhapur-Sangli-Satara, पूरग्रस्त कोल्हापूर, सातारा, सांगलीत येत्या दोन दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा

पुणे : पूरग्रस्त कोल्हापूर, सातारा, सांगलीत येत्या दोन दिवसांत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. पुणे वेधशाळेने येत्या दोन दिवसांत या तिन्ही जिल्ह्यांमध्ये पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे पूरग्रस्त कोल्हापूर, सातारा, सांगलीमध्ये धाकधूक वाढली आहे.

आता कुठेतरी दोन दिवसांपासून पावसाने जरा विश्रांती घेतली होती. अनेक भांगामधील पुराचं पाणीही ओसरण्यास सुरुवात झाली होती. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात येईल असं वाटत होतं. सांगली आणि कोल्हापुरातील अनेक भागांमधील साचलेलं पाणी ओसरु लागल्याने पुढील कार्याला वेग आला होता. लोकं आपल्या घरी परतू लागली होती. परिसरातील कचरा काढला जात होता, आरोग्याच्या दृष्टीने पावलं उचलली जात होती, पूरग्रस्तांच्या पुर्नवसनाच्या प्रक्रियेकडे प्रशासनाची वाटचाल सुरु झाली होती. मात्र, आता पुन्हा पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्याने चिंता वाढली आहे.

सांगलीत (Sangli Flood) पुन्हा मुसळधार पाऊस झाला, तर जी गावं पाण्याखाली आहेत त्यांना मोठा धोका निर्माण होऊ शकतो. सांगलीतील सुखवाडी, ब्रम्हनाळ, आमणापूर यांसारख्या गावांमध्ये अद्यापही मोठ्या प्रमाणात पुराचं पाणी साचलेलं आहे. शेकडो घरं अजूनही पाण्याखाली आहेत. त्यामुळे पुन्हा पाऊस झाल्यास धोका दुप्पट होणार आणि ज्या चार भिंती शिल्लक आहेत, कदाचित त्याही उरणार नाहीत. सांगलीत पावसाने विश्रांती घेतल्याने बचावकार्याला वेग आला होता, मात्र जर पुन्हा पाऊस सुरु झाला तर बचावकार्यात मोठा अडथळा येऊ शकतो.

दुसरीकडे, कर्नाटकातही पूरस्थिती आहे. त्यामुळे जर अलमट्टीचा विसर्ग थांबवला तर याहीपेक्षा वाईट परिस्थिती उद्भवू शकते.

कोल्हापुरात (Kolhapur Flood) हळूहळू पूरस्थिती नियंत्रणात येत आहे. पुणे-बंगळुरु महामार्ग सुरु केल्याने कोल्हापूरकरांपर्यंत जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा होतो आहे. कोल्हापुरातील काही भागातील पाणी ओसरु लागलं आहे. मात्र, शिरोळ, आंबेवाडी चिखली या गांवांमध्ये आद्यापही पाणी साचलेलं आहे. शिरोळ तालुक्यात अजूनही आठ ते दहा हजार लोक अडकलेले आहेत. त्यांनी बाहेर काढण्यासाठी बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे. मात्र, येत्या दोन दिवसांत मुसळधार पाऊस झाला तर प्रशासनासमोरील संकट वाढण्याची शक्यता आहे.

पाहा व्हिडीओ :

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *