Maharashtra Police | मुंबईत तीन तर पुण्यात एका पोलिसाचा कोरोनामुळे मृत्यू

मुंबईत दिवसभरात (15 जून) तीन पोलिसांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तर पुणे पोलीस दलातील आणखी एका पोलीस अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

Maharashtra Police | मुंबईत तीन तर पुण्यात एका पोलिसाचा कोरोनामुळे मृत्यू

मुंबई/पुणे : मुंबईत दिवसभरात (15 जून) तीन पोलिसांचा (Maharashtra Police Died By Corona) कोरोनाने मृत्यू झाला आहे. तर पुणे पोलीस दलातील आणखी एका पोलीस अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबईतील अंधेरी, जोगेश्वरी आणि निर्मल नगर पोलीस ठण्यातील कर्मचारी कोरोनाबळी (Maharashtra Police Died By Corona) ठरले आहेत.

पुण्यात आतापर्यंत पोलीस दलातील तिघांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भगवान पवार यांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. ते पोलीस आयुक्तालयात विशेष शाखेत कार्यरत होते.

भगवान पवार हे आजार पणाच्या रजेवर होते. यावेळी त्यांना कोरोनाची बाधा झाली. कोरोनासह त्यांना इतर ही व्याधी होत्या. खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. आतापर्यंत सहाय्यक फौजदारासह वाहतूक शाखेतील पोलिसाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे (Maharashtra Police Died By Corona).

आतापर्यंत तब्बल 76 अधिकाऱ्यांसह पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी तिघांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. 25 पोलीस रुग्णालयात उपचार घेत असून 48 पोलिसांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्णालयात दाखल असलेल्यांमध्ये एका एसीपीचा समावेश आहे.

पुणे जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या 12 हजारांवर

पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 12 हजार 147 वर पोहोचला आहे. तर आतापर्यंत 7 हजार 619 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर सध्या जिल्ह्यात 4 हजार 27 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. कोरोनाबाधित एकूण 501 रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. तर 255 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत.

पुणे जिल्ह्यामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 62.72 टक्क्यांवर आहे. तर मृत्यूचे प्रमाण 4.12 टक्क्यांवर आहे.

Maharashtra Police Died By Corona

संबंधित बातम्या :

कोरोना काळात डॉक्टर, नर्सचे हॉटेल बील कोटींच्या घरात, पुण्यातील हॉटेलकडून 86 लाख 72 हजारांचे बील सादर

Pune Corona | पुणेकरांसाठी गुड न्यूज! कोरोना रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढला, तर मृत्यूदर घसरला

नवी मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा 4 हजारच्या दिशेने, रुग्णवाढ कायम

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *