Pune | पुण्यात परप्रांतीय प्रवाशी, मजुरांचा ओघ, 15 दिवसात 13 हजार परप्रांतीय दाखल

लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल झाल्यापासून पुण्यात परप्रांतीय प्रवाशी आणि मजुरांचा ओघ कायम आहे. वेगवेगळ्या राज्यातून आतापर्यंत पुण्यात 13 हजार 161 प्रवाशी आले आहेत.

Pune | पुण्यात परप्रांतीय प्रवाशी, मजुरांचा ओघ, 15 दिवसात 13 हजार परप्रांतीय दाखल
Follow us
| Updated on: Jun 15, 2020 | 8:33 PM

पुणे : लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल झाल्यापासून पुण्यात (Pune Migrant Workers Coming Back) परप्रांतीय प्रवाशी आणि मजुरांचा ओघ कायम आहे. वेगवेगळ्या राज्यातून आतापर्यंत पुण्यात 13 हजार 161 प्रवाशी आले आहेत. या प्रवाशांमध्ये सर्वाधिक जास्त संख्या ही मजुरांची (Pune Migrant Workers Coming Back) आहे.

1 जून ते 15 जूनपर्यंत 90 ट्रेनच्या माध्यमातून हे मजूर पुण्यात दाखल झाले आहेत. रोज साधारण 1 हजारापेक्षा जास्त परप्रांतीय प्रवासी पुण्यात येत आहेत. एकट्या बिहारमधून 5 हजार 77 प्रवासी पोहचले आहेत. बिहारमधून सर्वाधिक जास्त प्रवासी पुण्यात आले आहेत.

पुणे आणि जिल्ह्यातील उद्योगधंदे पूर्ववत सुरु झाले आहेत. त्यामुळे रोजगारासाठी आता परप्रांतीय मजूर दाखल होऊ लागले आहेत. परप्रांतीय मजुरांवरुन राजकीय आरोप-प्रत्यारोप झाले. मात्र, पोटासाठी हे मजूर पुन्हा आपल्या कामावर रुजू होत असल्याचं पाहायला मिळत आहे.

पुणे-दानापूर एक्सप्रेसमधून बिहारी प्रवासी, मजूर येत आहेत. दररोज जवळपास 400 ते 500 मजूर येत आहेत. 5 जून ते 15 जून या कालावधीत बिहार मधून 11 ट्रेन पुण्यात पोहचल्या आहेत (Pune Migrant Workers Coming Back).

5 जून ते 15 जून

  • 5 जून – 686
  • 6 जून – 476
  • 7 जून – 385
  • 8 जून – 316
  • 9 जून – 319
  • 10 जून – 367
  • 11 जून – 506
  • 12 जून – 495
  • 13 जून – 584
  • 14 जून – 463
  • 15 जून – 480

परप्रांतीय प्रवासी मजूर पुण्यात दाखल झाले. मुंबईतून पुणे मार्गे गदग एक्स्प्रेस, कोणार्क एक्स्प्रेस, उद्यान एक्स्प्रेस, हुसेन सागर एक्स्प्रेस आणि गोवा एक्स्प्रेस धावतात, तर पुण्यातून बिहारसाठी फक्त दानापूर एक्स्प्रेस एकमेव गाडी सुटते.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे रेल्वे स्थानकावर परप्रांतीय प्रवाशांची वैद्यकीय तपासणी केली जाते. यासाठी रेल्वे स्थानकावर वैद्यकीय पथक आणि महसूल पथक 24 तास तैनात आहे. प्रवाशांना कोरोना संदर्भात लक्षणं आढळल्यास संस्थात्मक विलगीकरण केलं जातं. तर उर्वरित प्रवाशांच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारला जातो. त्यानंतर 14 दिवस होम क्वारंटाईनच्या सूचना केल्या जातात (Pune Migrant Workers Coming Back).

संबंधित बातम्या :

Petrol Diesel Price Hike : पेट्रोल-डिझेलच्या दरात आठवडाभर वाढ कायम, वाहनचालक त्रस्त

Pune Corona | पुणेकरांसाठी गुड न्यूज! कोरोना रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढला, तर मृत्यूदर घसरला

कानून के हाथ लंबे होते है | तडीपार आरोपींवर नजर ठेवण्यासाठी पुणे पोलिसांचा हायटेक फंडा

पुण्यात 2 महिन्याच्या कोरोनाग्रस्त बालकाचा मृत्यू दडपण्याचा प्रयत्न, तब्बल 7 दिवसांनी पालिकेकडे मृत्यूची माहिती

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.