जिथे असाल तिथून घरी परत या, पुण्याचे बेपत्ता उद्योजक गौतम पाषाणकरांच्या कुटुंबीयांची आर्त हाक

पुण्याचे उद्योजक गौतम पाषाणकर जिथे कुठे असतील, तिथून त्यांनी लवकर घरी यावं, अशी भावनिक साद त्यांच्या पत्नी आणि मुलीने घातली आहे.

जिथे असाल तिथून घरी परत या, पुण्याचे बेपत्ता उद्योजक गौतम पाषाणकरांच्या कुटुंबीयांची आर्त हाक

पुणे : पुण्यातील बेपत्ता उद्योजक गौतम पाषाणकर यांचा तीन दिवसांनंतरही शोध लागलेला नाही. पाषाणकरांच्या शोधासाठी पोलिसांची पाच पथक रवाना झाली आहेत. पाषाणकर जिथे कुठे असतील, त्यांनी तिथून लवकर घरी यावं, अशी साद त्यांची पत्नी आणि मुलीने घातली आहे. (Pune Missing Businessman Gautam Pashankar family appeals him to return)

गौतम पाषाणकर हे ऑटोमोबाईल क्षेत्रातील मोठं नाव आहे. पाषाणकर बुधवारी संध्याकाळी साडेचार वाजल्यापासून बेपत्ता आहेत. या प्रकरणी त्यांच्या मुलाने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातून गौतम पाषाणकर बेपत्ता झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

व्यवसायात कोणतेही तणाव नसताना त्यांच्या अचानक निघून जाण्याने त्यांच्या घरचे काळजीत पडले आहेत. पाषाणकर यांनी सुसाईड नोट लिहून ठेवली असली, तरी ते कोणतेही वेडं वाकडं पाऊल उचलणार नाहीत, असा विश्वास त्यांच्या कुटुंबियांनी व्यक्त केला आहे. पाषाणकर जिथे कुठे असतील, तिथून त्यांनी लवकर घरी यावं, अशी साद त्यांच्या पत्नी आणि मुलीने घातली आहे.

ड्रायव्हरकडे बंद लिफाफ्यात सुसाईड नोट

गौतम पाषाणकर यांनी लिहिलेली सुसाईड नोट सापडली आहे. त्यांनी आपल्या ड्रायव्हरकडे बंद लिफाफा दिला होता. घरी गेल्यानंतर त्यांच्या पत्नीने उघडून बघितल्यावर त्यात सुसाईड नोट होती. गेल्या काही दिवसांपासून व्यवसायात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा उल्लेख या नोटमध्ये करण्यात आला आहे. पाषाणकर यांचे कुणाशी वैर होते का? ते कुठे गेले असतील? बेपत्ता होण्यामागचं कारण काय असावं, या सगळ्या प्रकरणी पोलिसांकडून सध्या तपास सुरु आहे

पोलिसांची पाच पथके त्यांचा शोध घेत आहेत. पोलिसांचे एक पथक सीसीटीव्हीच्या माध्यमातून त्यांचा माग काढत आहे. तर दुसरे पथक त्यांनी एखाद्या हॉटेलमध्ये रुम बुक केली आहे का? याची तपासणी करत आहेत. त्यांनी मागील वर्षी एका वेबसाईटवरुन दोनदा रुम बुक केल्याचे तपासात आढळले. मात्र यानंतर त्यांनी परत ऑनलाईन पद्धतीने रुम बुक केलेली नाही. सुसाईड नोटसापडल्यावर त्यांच्या कुटुंबीयांनी खराडी येथील मालकीची गॅस एजन्सी, कंन्स्ट्रक्शन साईट, लवासा येथील फार्म हाऊस, नातेवाईक यांच्याकडे शोध घेतला.

पोलीस सध्या जागोजागी पाषाणकर यांचा शोध घेत असून त्यांचे नातेवाईक आणि कार चालकाची चौकशी करत आहेत. पाषाणकर कोणालाही दिल्यास त्यांच्या कुटुंबाला 9822474747 या मोबाईल क्रमांकावर किंवा शिवाजीनगर पोलिस ठाण्याला 020-25536263 या क्रमांकावर कळवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

संबंधित बातम्या :

ड्रायव्हरकडे बंद लिफाफ्यात ‘सुसाईड नोट’, पुण्याचे बेपत्ता उद्योजक गौतम पाषाणकर यांचा शोध सुरु

पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक गौतम पाषाणकर बेपत्ता, शोध सुरु

(Pune Missing Businessman Gautam Pashankar family appeals him to return)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *