पुण्यात 48 वर्षीय 'कोरोना'ग्रस्ताचा मृत्यू, परदेश प्रवास न केलेला चौथा पुणेकर 'कोरोना'चा बळी

पुण्यात आतापर्यंत मृत्युमुखी पडलेल्या ‘कोरोना’ग्रस्तांची संख्या चारवर पोहोचली आहे. महाराष्ट्रातील ‘कोरोना’ बाधित रुग्णांचा आकडा 661 वर गेला आहे. (Pune Sasoon Hospital Corona Patient Death)

पुण्यात 48 वर्षीय 'कोरोना'ग्रस्ताचा मृत्यू, परदेश प्रवास न केलेला चौथा पुणेकर 'कोरोना'चा बळी

पुणे : पुण्यात ‘कोरोना’मुळे चौथा बळी गेला आहे. 48 वर्षीय ‘कोरोना’ग्रस्त व्यक्तीचा ससून रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. गेल्या 24 तासात पुण्यात गेलेला हा दुसरा बळी असून महाराष्ट्रातील ‘कोरोना’बळींची संख्या 34 वर पोहोचली आहे. गंभीर गोष्ट म्हणजे, ‘कोरोना’मुळे मृत्यू झालेल्या पुण्यातील चारही जणांनी परदेश प्रवास केलेला नव्हता. (Pune Sasoon Hospital Corona Patient Death)

पुण्यात 48 वर्षीय ‘कोरोना’ग्रस्त व्यक्तीचा मृत्यू झाला. संबंधित व्यक्तीला मधुमेहाचा आजार होता. या व्यक्तीचा कोरोना अहवाल काल रात्री पॉझिटिव्ह आला. मयत व्यक्ती झोपडपट्टीत राहणारी असून त्यांनी परदेश प्रवास केलेला नाही. त्यामुळे कोरोनाग्रस्त रुग्णाच्या संपर्कात आल्याने त्यांना कोरोनाची बाधा झाल्याची शक्यता आहे. ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांनी ही माहिती दिली.

पुण्यात आतापर्यंत मृत्युमुखी पडलेल्या ‘कोरोना’ग्रस्तांची संख्या चारवर पोहोचली आहे. महाराष्ट्रातील ‘कोरोना’ बाधित रुग्णांचा आकडा 661 वर गेला आहे. आतापर्यंत राज्यात 34 कोरोना’ग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत.

‘त्या’ महिलेचं नेमकं काय झालं?

पुण्यातील 60 वर्षीय महिला तीन दिवसांपूर्वी नायडू रुग्णालयात दाखल झाली होती. यावेळी ती ‘कोरोना’ निगेटिव्ह असल्याने तिला डिस्चार्ज दिला होता. मात्र घरी गेल्यानंतर इंक्युबेशन पिरेडमध्ये असताना अचानक तिची तब्येत ढासळली. काल तिला ससून रुग्णालयात पुन्हा दाखल करण्यासाठी नेलं जात होतं, मात्र तोपर्यंत महिलेचा मृत्यू झाला होता. मृत्यूनंतर सॅम्पल चेक केले असता, ती कोरोना पॉझिटिव्ह आढळली.

चौघेही पुणेकर परदेश प्रवास न केलेले

ससून रुग्णालयात मृत्युमुखी पडलेल्या 48 वर्षीय ‘कोरोना’ग्रस्त व्यक्तीने परदेशी प्रवास केलेला नाही. ‘कोरोना’ रिपोर्ट निगेटिव्ह असल्याने डिस्चार्ज मिळालेल्या 60 वर्षीय महिलेनेही परदेशात प्रवास केलेला नव्हता. पुण्यात याआधी (2 एप्रिल) एका 50 वर्षीय कोरोनाबाधित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्या महिलेनेही कोणताही परदेशी प्रवास केला नव्हता. तर 30 मार्चलाही पुण्यात मृत्यू झाला, त्या 52 वर्षीय ‘कोरोना’ग्रस्त व्यक्तीचीही परदेशवारी झालेली नाही. त्यामुळे कोरोनाग्रस्त रुग्णाच्या संपर्कात आल्याने त्यांना कोरोनाची बाधा झाल्याची शक्यता आहे.

पुणेकरांची धाकधूक वाढली

पुणे जिल्ह्यात काल एकाच दिवशी एकूण वीस नवे कोरोना रुग्ण आढळले. पुण्यात 9, तर पिंपरीत सहा रुग्ण पॉझिटिव्ह सापडले. पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 83 वर गेली आहे. पुणे जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात 23 ने रुग्णांची संख्या वाढली, तर पुणे विभागातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 104 वर गेली आहे. (Pune Sasoon Hospital Corona Patient Death)

कोरोनामुळे महाराष्ट्रात कुठे किती मृत्यू?

1. मुंबई – 64 वर्षीय वृद्धाचा मृत्यू – 17 मार्च
2. मुंबई – 63 वर्षीय वृद्धाचा मृत्यू – 22 मार्च
*मुंबई – फिलिपाईन्सच्या 68 वर्षीय वृद्धाचा मृत्यू– 23 मार्च (कोरोना निगेटिव्ह, मृत्यूचं कारण अन्य)*
3. मुंबई – 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू – 23 मार्च
4. मुंबई – एकाचा मृत्यू -25 मार्च
5. नवी मुंबई – वाशीतील 65 वर्षीय महिलेचा मृत्यू– 26 मार्च
6. मुंबई – 63 वर्षीय महिलेचा मृत्यू– 26 मार्च
7. बुलडाणा – 45 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 28 मार्च
8. मुंबई – 40 वर्षीय महिलेचा मृत्यू – 28 मार्च
9. पुणे – 52 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू – 30 मार्च
10. मुंबई – 80 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू – 30 मार्च
11. मुंबई – 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू – 31 मार्च
12. पालघर  – 50 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 1 एप्रिल
13. मुंबई – 51 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 1 एप्रिल
14. मुंबई – 84 वर्षीय महिलेचा मृत्यू – 1 एप्रिल
15. मुंबई – 73 वर्षीय महिलेचा मृत्यू – 1 एप्रिल
16. मुंबई – 63 वर्षीय महिलेचा मृत्यू – 1 एप्रिल
17. मुंबई – 56 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 1 एप्रिल
18. जळगाव – एका रुग्णाचा मृत्यू – 2 एप्रिल
19. मुंबई – 61 वर्षीय महिलेचा मृत्यू – 2 एप्रिल
20. मुंबई – 58 वर्षीय महिलेचा मृत्यू – 2 एप्रिल
21. मुंबई – 58 वर्षीय महिलेचा मृत्यू – 2 एप्रिल
22. मुंबई – 63 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 2 एप्रिल
23. पुणे – 50 वर्षीय महिलेचा मृत्यू – 2 एप्रिल
24. वसई – 68 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 2 एप्रिल
25. बदलापूर – एका रुग्णाचा मृत्यू – 3 एप्रिल
26. मुंबई – 65 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 3 एप्रिल
27. अमरावती – एका रुग्णाचा मृत्यू – 4 एप्रिल
28. मुंबई – 70 वर्षीय महिलेचा मृत्यू – 4 एप्रिल
29. मुंबई – 53 वर्षीय महिलेचा मृत्यू – 4 एप्रिल
30. मुंबई – 67 वर्षीय महिलेचा मृत्यू – 4 एप्रिल
31. मुंबई – 47 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 4 एप्रिल
32. मुंब्रा – 57 वर्षीय पुरुषाचा मृत्यू -= 4 एप्रिल
33. पुणे – 60 वर्षीय महिलेचा मृत्यू – 5 एप्रिल
34. पुणे – 48 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 5 एप्रिल

ताजी आकडेवारी इथे पहा :

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई329743741065
पुणे (शहर+ग्रामीण)5985938275‬
पिंपरी चिंचवड मनपा350347
ठाणे (शहर+ग्रामीण)
3350‬3657
नवी मुंबई मनपा21548032
कल्याण डोंबिवली मनपा9899118
उल्हासनगर मनपा1986
भिवंडी निजामपूर मनपा99113
मिरा भाईंदर मनपा52515710
पालघर 12213
वसई विरार मनपा63010515
रायगड471 55
पनवेल मनपा37412
नाशिक (शहर +ग्रामीण)270‬22
मालेगाव मनपा72247
अहमदनगर (शहर+ग्रामीण)84365
धुळे1299
जळगाव 447141
नंदूरबार 322
सोलापूर646‬4149
सातारा33935
कोल्हापूर 340‬21
सांगली87‬291
सिंधुदुर्ग1920
रत्नागिरी17125
औरंगाबाद1310‬1453
जालना730
हिंगोली 13310
परभणी251
लातूर 8283
उस्मानाबाद 3730
बीड320
नांदेड 1055
अकोला 437‬1417
अमरावती 193‬14
यवतमाळ 115220
बुलडाणा 4983
वाशिम 80
नागपूर481‬848
वर्धा 701
भंडारा1400
गोंदिया 4710
चंद्रपूर25‬10
गडचिरोली2600
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)52012
एकूण5475716954 1792

(Pune Sasoon Hospital Corona Patient Death)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *