शरद पवारांच्या ताफ्यातील पोलिसांची गाडी उलटली, एक्स्प्रेस वेवर अपघात

पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी आहेत. तर शरद पवारांची गाडी सुखरुप मुंबईकडे रवाना झाली. (Sharad Pawar convoy car accident) अमृतांजन पुलाजवळ हा अपघात झाला.

शरद पवारांच्या ताफ्यातील पोलिसांची गाडी उलटली, एक्स्प्रेस वेवर अपघात

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ताफ्यातील पोलिसांच्या गाडीला अपघात झाला. शरद पवार हे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे अर्थात द्रुतगती मार्गावरुन पुण्याहून मुंबईला जात होते. त्यावेळी सकाळी सव्वा दहाच्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांची गाडी स्लिप होऊन उलटली. सुदैवाने पोलिसांना मोठी दुखापत झालेली नाही. पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी आहेत. तर शरद पवारांची गाडी सुखरुप मुंबईकडे रवाना झाली. (Sharad Pawar convoy car accident)

शरद पवार हे पुण्यावरुन मुंबईकडे निघाले होते. अमृतांजन पुलाजवळ हा अपघात झाला. शरद पवारांची गाडी पुढे होती. त्यामुळे त्या गाडीला काहीही झालं नाही. दरम्यान, महामार्ग पोलीस आणि स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन, अपघातग्रस्त वाहन हटवलं.

याबाबत प्रवक्ते अंकुश काकडे म्हणाले, “आज सकाळी पवारसाहेब पुण्याहून मुंबईला निघाले. मुंबईला जात असताना खंडाळा घाटात अमृतांजन पुलाजवळ हा अपघात झाला. पण किरकोळ अपघात होता. सुदैवाने मोठी दुर्घटना नाही. पवार साहेबांनी अपघातग्रस्त पोलिसांची नीट व्यवस्था लावून मुंबईकडे गेले”

यापूर्वीही पुरंदर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा ताफा जात असताना, परिसरात मोठा अपघात झाल्याचं निदर्शनास आलं होतं. त्यावेळी गर्दी झालेली पाहून शरद पवारांनी आपला ताफा थांबवून चौकशी केलीच, शिवाय नुकसानभरपाई संदर्भात संबंधितांशी लवकर संपर्क करावा, अशा सूचनाही पवारांनी केल्या. पवारांनी धीर दिल्याची भावना यावेळी संबंधितांनी व्यक्त केली.

(Sharad Pawar convoy car accident)

संबंधित बातम्या 

फॉर्च्युनरवर पोकलेन कोसळून अपघात, ताफा थांबवून शरद पवारांकडून विचारपूस! 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *