‘चीन आणि मुस्लीम राष्ट्रे भारतावर हल्ला करतील’, तिसऱ्या महायुद्धाबाबत 16 शतकातच या संतानं केलीये मोठी भविष्यवाणी
जगाला तिसऱ्या महायुद्धाचा देखील सामना करावा लागणार आहे. या महायुद्धामध्ये भारताची मुख्य भूमिका असेल असा दावा या भाकीतामध्ये करण्यात आलेला आहे.

संत अच्युतानंद दास हे 16 व्या शतकातील मोठे संत होते. त्यांनी ‘भविष्य मालिका’ नावाचं पुस्तक लिहीलं. या पुस्तकामध्ये त्यांनी कलियुगाचा अंत कसा होणार? जगात काय -काय घटना घडणार याबाबत मोठं भाकीत केलं आहे. अच्युतानंद दास यांनी जे भाकीतं वर्तवलेले आहेत, त्यातील अनेक भविष्यवाणी या ओडिशा आणि भगवान जगन्नाथ मंदिराच्या संबंधित आहेत. कारण अच्युतानंद दास हे ओडिशामध्ये राहत होते. जगन्नाथ पुरीमध्ये असलेलं भगवान जगन्नाथ यांचं मंदिर जगप्रसिद्ध आहे. अच्युतानंद दास यांनी आपल्या ‘भविष्य मालिका’ या पुस्तकामध्ये अनेक मोठे भाकीतं केली आहेत. त्यांनी तिसऱ्या महायुद्धाबाबत देखील मोठी भविष्यवाणी केली आहे, या युद्धात भारताची मोठी भूमिका असेल असंही त्यांनी म्हटलं आहे. जाणून घेऊयात या भविष्यवाणीबद्दल
संत अच्युतानंद दास यांनी आपल्या भविष्य मालिका या पुस्तकामध्ये असा दावा केला आहे की जेव्हा कलियुगाचा अंत जवळ येईल तेव्हा आकाशात दोन सूर्य दिसायला लागतील. दुसरा सूर्य जो असेल तो खरा सूर्य नसेल तर तो एक मोठा उल्कापिंड असेल. हा उल्कापिंड बंगालच्या खाडीमध्ये पडेल, तेव्हा देशात मोठा जलप्रलय येईल असं भाकीत अच्युतानंद दास यांनी वर्तवलं आहे.
तिसऱ्या महायुद्धाबाबत देखील त्यांनी मोठी भविष्यवाणी केली आहे. जगाला तिसऱ्या महायुद्धाचा देखील सामना करावा लागणार आहे. या महायुद्धामध्ये भारताची मुख्य भूमिका असेल, तिसरं महायुद्ध 6 वर्ष आणि 6 महिने चालेल चीन आणि मुस्लीम राष्ट्रं भारतावर हल्ला करतील, मात्र भारत हे सर्व हल्ले परतून लावेल, तिसऱ्या महायुद्धात भारत विजयी होईल, भारत विश्वगुरू होईल असं या ‘भविष्य मालिके’मध्ये दावा करण्यात आला आहे.
अच्युतानंद दास यांनी भूकंपाबाबत देखील मोठं भाकीत केलं आहे, कलियुगात पृथ्वीवर एवढे भूकंप होतील की त्यामुळे पृथ्वीची प्राकृतिक रचना बदलून जाईल, त्यामुळे जगात काही नव्या समस्या निर्माण होऊ शकतात असं त्यांनी म्हटलं आहे.
डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.
