AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Horoscope Today 13 March 2024 : आजचे राशी भविष्य, या राशीच्या लोकांनी व्यायामावर, प्रकृतीवर लक्ष केंद्रित करावं

या राशीच्या लोकांनी कामात व्यग्र असताना खाणेपिणे विसरू नये. याचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. तुम्हाला व्यायामावरही लक्ष केंद्रित करावे लागेल.

Horoscope Today 13 March 2024 : आजचे राशी भविष्य, या राशीच्या लोकांनी व्यायामावर, प्रकृतीवर लक्ष केंद्रित करावं
| Updated on: Mar 13, 2024 | 7:00 AM
Share

मुंबई : ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य यामध्ये अनुक्रमे येता आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Horoscope Today 13 March 2024) हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

मेष

आज प्रगतीचे नवे मार्ग खुले होतील. संध्याकाळपर्यंत चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. आई-वडिलांसोबत धार्मिक स्थळाला भेट देण्यासाठी जाल. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. सॉफ्टवेअर इंजिनिअर्ससाठी आजचा दिवस खास असणार आहे. तुमच्याबरोबर सर्व काही चांगले होईल. तुमचे आरोग्य पूर्वीपेक्षा चांगले राहील.

वृषभ

आज करिअरच्या बाबतीत मोठे यश मिळेल. नोकरीच्या ठिकाणी आर्थिक लाभाच्या संधी मिळतील. व्यावसायिकांना कामात चांगली संधी मिळेल. आज तुम्ही काही लोकांशी संगत कराल जे तुम्हाला सर्व प्रकारे मदत करण्यास तयार असतील. तुमच्या नातेवाईकांकडूनही तुम्हाला पूर्ण लाभ मिळेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. याशिवाय कार्यालयातील परिस्थितीही तुमच्या अनुकूल राहील.

मिथुन

आज वैवाहिक नात्यातील, जोडीदारातील दुरावा, भांडण मिटेल. बिझनेसमधील काही कामांमुळे तुम्ही चिंतेत असाल. आज कर्जाचे व्यवहार टाळावेत. काही कामासाठी जास्त घाई करावी लागू शकते. तसेच कामात व्यग्र असताना खाणेपिणे विसरू नये. याचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. तुम्हाला व्यायामावरही लक्ष केंद्रित करावे लागेल.

कर्क

आज तुम्हाला तुमची प्रतिष्ठा वाढवण्याच्या अनेक संधी मिळतील. तुमचे जीवन चांगले बनवण्याच्या दृष्टीने आणखी पुढे जाल. यामुळे आज तुमचा बराच वेळ वाया जाऊ शकतो. घरात नवीन पाहुणे येण्याची शक्यता आहे. एकत्र बसून विशिष्ट विषयावर चर्चा होऊ शकते. आज तुम्ही कोणत्या ना कोणत्या राजकारणात अडकू शकता. ते राजकारण घरात तसेच कामाच्या ठिकाणीही होऊ शकते. ऑफिसमध्ये थोडे जास्त काम असेल.

सिंह

आज तुम्हाला लाभ होईल. जे लोक बेरोजगार आहेत त्यांना रोजगाराची सुवर्णसंधी मिळेल. जर तुम्हाला एखादी व्यक्ती आवडत असेल आणि त्या व्यक्तीला प्रपोज करायचे असेल तर आजचा दिवस शुभ आहे. रसायनशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी दिवस संमिश्र जाणार आहे. मेहनतीच्या जोरावर यश मिळेल. आज तुम्हाला काही अनुभवी लोकांकडून चांगला सल्ला मिळेल. एखादी खास बातमी समजू शकते.

कन्या

आज तुमचा दिवस खास असेल. घरातील वातावरण प्रसन्न राहील. कोणत्याही महत्त्वाच्या कामात थोडी मेहनत करूनच यश मिळेल. वेब डिझायनर्ससाठी दिवस चांगला जाणार आहे. मुले अभ्यासाच्या बाबतीत त्यांच्या मित्रांकडून काही चांगली प्रेरणा घेतील. याचा तुम्हाला फायदा होईल. तुम्हाला चांगली बातमी मिळेल.

तूळ

आज मन स्थिर नसल्यामुळे तुम्हाला थोडी चिंता वाटेल, परंतु संध्याकाळपर्यंत तुम्हाला बरे वाटेल. आज तुम्हाला कोणताही मोठा निर्णय घेण्यात अडचण येईल. मित्रांसोबत मतभेद होण्याचीही शक्यता आहे. तुम्ही तुमच्या मित्राशी विनाकारण बोलणे टाळावे. कार्यालयातील तुमच्या सहकाऱ्यांशी कोणत्याही प्रकल्पाबाबत तुम्ही एकमत, सहमती दर्शवणार नाही. संध्याकाळची वेळ तुमच्यासाठी चांगली असेल. काही कामात थोडे कमी प्रयत्न केल्याने कामे अपूर्ण राहू शकतात.

वृश्चिक

आजच्या चांगल्या कामगिरीचा परिणाम तुमच्या करिअरवर स्पष्टपणे दिसून येईल. तुमच्या वरिष्ठांशी चांगली वागणूक ठेवाल. जीवशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगला जाणार आहे. तुम्हाला शिक्षकांचे पूर्ण सहकार्य मिळेल. पालकांशी संबंध अधिक घट्ट होतील. मोठी ऑफर मिळून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.कामात स्थिरता राहील.

धनु

आज पैशाशी संबंधित प्रकरणे सहज सुटतील. दिवसभर उत्साह आणि आत्मविश्वास राहील. स्वभावात संयम ठेवा. तुमच्या सर्व समस्यांचे निराकरण सहज मिळेल. तसेच आज तुमचे काम नक्कीच यशस्वी होईल. आर्थिक बाजूही मजबूत राहील.

मकर

आज तुमचे आरोग्य पूर्वीपेक्षा चांगले राहील. स्वतःमध्ये बदल घडवून आणण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. करिअरमध्ये तुम्हाला यश निश्चित मिळेल. आज तुम्हाला घरातील वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. व्यवसायानिमित्त परदेशात जावे लागेल. कुटुंबात तुमच्या गुणांची प्रशंसा होईल.

कुंभ

आज तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त पैसे मिळतील. तुमची प्रलंबित कामे आज नक्कीच पूर्ण होतील. कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याचे सहकार्य मिळेल. व्यावसायिकांना उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळतील. तुमच्या इच्छेनुसार काही काम पूर्ण झाल्यावर तुम्ही आनंदी व्हाल. निरोगी राहाल. तुमची सकारात्मक विचारसरणी तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडवून आणू शकते. एकंदरीत दिवस चांगला जाईल.

मीन

आज करिअरच्या दृष्टीने गोष्टी सुधारण्याची शक्यता आहे. तुमची कामे चांगल्या पद्धतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. पण आज तुमच्या जोडीदाराच्या तब्येतीची काळजी वाटू शकते. त्यांना अचानक आरोग्याशी संबंधित काही समस्या उद्भवू शकतात. त्यांची पूर्ण काळजी घेतली पाहिजे. तुम्हाला कुटुंबातील सर्वांचा पाठिंबा मिळत राहील. आज घाईत काही कामं होऊ शकतात.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.