AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Todays Horoscope: आजचे राशी भविष्य 30 जानेवारी 2023, आर्थिक स्थितीत सुधारणा होऊन उत्पनात वाढ होईल

आजचे राशी भविष्य. जाणून घ्या कसा जाणार तुमचा आजचा दिवस. हाती घेतलेल्या कार्यात यश संपादन कराल.

Todays Horoscope: आजचे राशी भविष्य 30 जानेवारी 2023, आर्थिक स्थितीत सुधारणा होऊन उत्पनात वाढ होईल
राशी भविष्यImage Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Jan 30, 2023 | 1:00 AM
Share

मुंबई, ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य  रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Todays rashibhavishya Marathi) हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन  राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

जाणून घ्या बारा राशींचे राशी भविष्य

मेष:

आज स्थिरता लाभल्याने आनंद मिळेल. रखडलेली कामे पूर्ण होतील होईल. महत्त्वपूर्ण निर्णय हे गुप्त ठेवा. विद्यार्थ्यांची विद्याभासातात प्रगती पाहून मन समाधानी राहिल. आर्थिक स्थितीत सुधारणा होऊन उत्पनात वाढ होईल. व्यापारात आर्थिक दृष्ट्या प्रलंबित असणारी कामे पूर्णत्वास जातील. लक्ष्मीदायक दिनमान आहे. प्रशासकीय क्षेत्रातील, सुरक्षा व्यवस्थेतील व्यक्तींना विशेष लाभ होईल. पदप्राप्ती मानसन्मान मिळेल. पत्नीकडून सहकार्य आणि कुटुंबातील इतरांकडून प्रोत्साहन मिळेल. उर्जात्मक आणि उत्साही दिवस आहे.

वृषभः

आर्थिक बाबतीत एखादी चांगली बातमी ऐकण्यास मिळेल. अपेक्षीत लाभ मिळेल. नोकरीत आपल्या कलागुणांना प्रोत्साहन मिळेल. व्यावसायिक स्पर्धेत यश मिळण्याची आज संधी आहे. राजकीय, कला क्षेत्रातील व्यक्तींना लाभ होतील. आर्थिक आवक वाढेल. आज आपल्या कामात उत्साह वाटणार आहे. बुद्धीचा वापर करुन पैशाची गुंतवणूक करा. प्रवास सुखकर व हितकारक ठरतील. सामाजिक मान सन्मान मिळेल. मुलाच्या बाबतीत आनंदाची बातमी मिळेल.आपलं कर्तुत्व अर्थात स्वतला सिद्ध कराल.

मिथुन:

आज मानसिक क्लेश उत्पन्न होईल. व्यक्तिगत समस्याचा प्रभाव कामावर राहिल. काही अप्रिय घटनेमुळे त्रास सहन करावा लागेल. आर्थिक व्यवहारात सावधानी बळा. नोकरीत दुसऱ्यावर रोष करू नका. वाईट संगती पासुन सावध रहा. घरातील मौल्यवान वस्तु गहाळ किंवा चोरी होण्याची शक्यता आहे. व्यवसाय रोजगारात मोठे परिवर्तन घडून देण्याची संभावना आहे. आपले निर्णय चुकीचे ठरू शकतात. व्यसनी मित्रामुळे नुकसान होईल.व्यसनापासुन दुर रहा. मोठी आर्थिक गुंतवणुक करू नका. कर्ज घेणे देणे टाळा. आर्थिक नुकसान हानी संभवते.

कर्क:

आज घरगुती उपयोगी वस्तु खरेदी कराल. सामाजिक कार्यात सक्रियतेने भाग घ्याल. जबाबदारीची कामे वेळेत पूर्ण होतील. नवीन योजनेचा शुभारंभ होण्याचा योग आहे. व्यवसायात यश मिळेल. अनेक नवीन संधी नवीन मार्ग सापडतील. नोकरदार पत्नीकडून सहकार्य लाभेल. त्यांच्या बढतीचे योग आहेत. व्यापारात लाभ होऊन नफ्यात वाढ होईल. दूरवरचे प्रवास आनंददायक होतील. खर्च कमी करण्याचा प्रयत्न करा. कौटुंबिक वातावरण आनंददायक राहील. मुलांच्या भवितव्याचा चिंता दूर होईल. धार्मिक भावना वाढीस लागेल. रागावर नियंत्रण ठेवा.

सिंह:

आज संघर्ष करावा लागणार आहे. अपेक्षीत सफलता लाभणार नाही. दिवस धगधगीचा आणि धावपळीचा राहील. वडिलांच्या तब्बेतीची काळजी घ्या. अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण कराल. कुटुंबातून आपल्या कामास सहकार्य लाभणार नाही. निरर्थक कामात वेळ वाया घालवू नका. वेळेचा अपव्यय टाळा. शेअर मार्केट व्यापारात गुंतवणूक करण्यासाठी दिवस मध्यम स्वरूपाचा आहे. स्थावर मालमत्तेत काही अडचण येण्याची शक्यता आहे. प्रिय व्यक्तींची भेट होईल. कोर्टकचेरी कायदयाचे वाद असतील तर सामोपचाराने मिटवा. आर्थिक योग मध्यम आहे. आपल्या आक्रमक स्वभावामुळे जवळचे मित्र दूर जाण्याची शक्यता आहे. दुरचे प्रवास घडतील. आहारावर नियंत्रण ठेवा. अध्यात्म आणि विज्ञानात रुची वाढेल.

कन्या:

आज भाग्याची साथ लाभणार आहे. आपल्या कामात बुद्धी चातुर्याचा उपयोग केल्यास फायदा होईल. अत्यंत अनुकुल दिवस आहे. समाजात व कुंटुंबात मानसन्मान मिळेल. नवीन योजना फायदेशीर ठरतील.व्यापारात काही नवीन भागीदारासोबत संबंध प्रस्थापित कराल. गृहसौख्य जोडीदाराकडून सहकार्य लाभेल.प्रवासातून लाभ घडतील. जुणी येणी वसुल होतील.विद्यार्थ्यांची विद्याभ्यासात प्रगति होईल. बेरोजगारांना नोकरीचे योग आहेत. सार्वजनिक कार्यात आपला लौकिक सांभाळण्याचा प्रयत्न करावा. कलाकारांना योग्य संधी मिळतील. आरोग्य उत्तम राहील.

तुला:

आज प्रतिकूल दिनमान राहील नोकरीत मनाजोग्या घटना घडणार नाहीत. विपरित परिणाम दिसतील. वरिष्ठांकडून नाराजी आढवून घ्याल. मानसिक स्वास्थ बिघडेल. मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. शारिरीक व्याधी जुने आजार उद्भभवण्याची शक्यता आहे. जीवन साथीसोबत वैचारिक पातळीवर मतभेद होण्याची शक्यता आहे. व्यापारिक प्रकरणात जबाबदारी वाढणार आहे. आपआपसातील वाद समझदारीने मिटवा. भागीदारासोबत वाद होण्याची शक्यता आहे. प्रवास करू नका. शारिरिक शस्त्रक्रिया अपघात याचे भय संभवते. आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक तंगी निर्माण झाल्यामुळे मानसिक ताण वाढणार आहे.

वृश्चिक:

आज रोजगारातील परिस्थिती सामान्य राहणार आहे. मितभाषी राहिल्याने आर्थिक फायदा होईल. तरूण तरुणीचे विवाह योग जुळतील. प्रेमप्रकरणात कुटुंबाच्या विरोधात जावून कठोर निर्णय घ्यावे लागतील. प्रिय व्यक्तीबरोबर अप्रिय घटना घडण्याची शक्यता आहे. आपल्या संशयीवृत्तीवर आवर घाला. खर्चावर नियंत्रण ठेवा. व्यवसायातील चिंतेमुळे मन उदास राहील. कुंटुंबात खेळीमेळीचे वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करा. कलाकारांना काही नवीन संधी मिळतील. महिला वर्गाचा आदर राखा. पती-पत्नीत वाद होणार नाही याची काळजी घ्या. हुद्दा अधिकार व सरकारी नोकरी यापासुन लाभ होईल. प्रवासाचा योग आहे.

धनू:

आज शारिरिक स्वास्थ सांभाळा. आहारावर नियंत्रण ठेवा. आपल्या व्यसनांना आवर घाला. शारिरिक व्याधीचा कामावर विपरित परिणाम होईल. अपूर्ण राहिलेली कामे वेळेत पूर्ण करण्यास कसरत करावी लागेल. व्यापारात प्रतिस्पर्थ्यासोबत आव्हान निर्माण होईल. शत्रुपक्षाचे वर्चस्व वाढेल. सयंमी भूमिका घ्या. आळस झटकून कामाला लागा. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रीत करावे. मित्रमैत्रिणीं सोबत काळजीपूर्वक व्यवहार करावे. कायदेशीर बाबीत अडकले जाण्याची शक्यता आहे. मनात असमाधान आणि असंतोष निर्माण होईल. आरोग्याबाबतीत आर्थिक खर्च वाढेल. आरोग्य सांभाळा.

मकर:

आज मनोधैर्य वाढेल. रोजगारात प्रतिमा आणि प्रतिश्रा उचांवेल. कार्यात विशेष यश येईल.मुलांच्या बाबतीत प्रसन्नतापूर्वक वातावरण राहणार आहे. साहसी वृत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. उताविळपणा करु नका. नोकरी व्यापारात योग्य प्रतिसाद मिळेल. कुटुंबात शुभकार्याचे आयोजन केले जाईल. साहित्यिक, समारंभात भाग घ्याल. मनोरंजनाकडे कल वाढेल. छोट्या छोट्या बाबींकडे लक्ष द्या. समाजात कुटुंबात आपल्या कार्याचे कौतुक होईल. आपला आहार वेळेवर घ्या. विद्यार्थी एखादी परकीय भाषा शिकतील. विद्याभ्यासासाठी उत्तम दिनमान आहे.

कुंभ:

आज कौटुंबिक वातावरण व आर्थिक परिस्थिती चांगली राहिल्याने आनंदी रहाल. वडिलोपार्जित इस्टेट वास्तू या विषयी कामे पार पडतील. नवीन घर खरेदीचा योग आहे. आपल्या वस्तुची देखभाल कराल. नोकरीत इच्छेप्रमाणे बदली किंवा बढ़ती मिळण्याचे योग आहेत. मित्र,सहकारी यांची मदत मिळेल. व्यवसायातील यश मिळाल्याने आनंदी रहाल. नोकरीत आपण घेतलेले निर्णय योग्य राहतील. सामजिक प्रसिद्धि मिळेल. उत्पन्नात वाढ होण्याचे योग आहेत. गीतकार व गायक वादक यांना संधी मिळेल. राजकारणी लोकांची लोकप्रियता वाढीस लागेल.

मीनः

आज आपण घेतलेले निर्णय योग्य ठरतील. रोजगारात प्रगती होईल. जबाबदारी वाढणार आहे. आपले कर्तुत्व सिद्ध कराल. पराक्रम व साहसी वृत्तीत वाढ होईल. व्यापारात नवीन संधी सोडू नका. नोकरीत एका नव्या समुहाशी आपला संबंध जुळण्याचा योग आहे. कुटुंबातील सदस्याकडून उत्तम सहकार्य लाभल्याने स्नेह वाढेल. भाऊबहिणीकडून आर्थिक सहकार्य लाभेल. हाती घेतलेल्या कार्यात यश संपादन कराल.स्वतःचे निर्णय स्वतः घेणे फायदेशीर राहील.मुलांच्या बाबतीत चांगले संकेत मिळतील. व्यापारात नवीन प्रस्ताव, योजना आर्थिक बाबतीत फायदेशीर ठरणार आहेत. आरोग्य उत्तम राहिल.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

मुख्यमंत्रीपदासाठी स्वतःचं पायपुसणं.... शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
मुख्यमंत्रीपदासाठी स्वतःचं पायपुसणं.... शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल.
दानवे म्हणाले मुख्यमंत्री कंजूस, CMO म्हणतंय आरोप खोटं, थेट आकडे जाहीर
दानवे म्हणाले मुख्यमंत्री कंजूस, CMO म्हणतंय आरोप खोटं, थेट आकडे जाहीर.
राज ठाकरे कल्याण मारहाण प्रकरणी कोर्टात, म्हणाले गुन्हा मान्य नाही...
राज ठाकरे कल्याण मारहाण प्रकरणी कोर्टात, म्हणाले गुन्हा मान्य नाही....
फडणवीस दानशूर राज्याचे कंजूस प्रमुख, कर्जमाफीवरून दानवेंचा घणाघात
फडणवीस दानशूर राज्याचे कंजूस प्रमुख, कर्जमाफीवरून दानवेंचा घणाघात.
प्रफुल्ल पटेलांनी घेतली मोदींची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
प्रफुल्ल पटेलांनी घेतली मोदींची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ.
आता पांघरूण खातं तयार करा म्हणजे... उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
आता पांघरूण खातं तयार करा म्हणजे... उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल.
विरोधकांच्या आरोपावर शंभुराज देसाईंचं उत्तर, शेतकऱ्यांसाठीची मदत थेट..
विरोधकांच्या आरोपावर शंभुराज देसाईंचं उत्तर, शेतकऱ्यांसाठीची मदत थेट...
भाजपच्या गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला मनसेचा विरोध, 'हे BJP वाले...'
भाजपच्या गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला मनसेचा विरोध, 'हे BJP वाले...'.
इथं तुम्ही हुरडा खाल अन् परत जाल तर...मुनगंटीवारांचा सरकारला घरचा आहेर
इथं तुम्ही हुरडा खाल अन् परत जाल तर...मुनगंटीवारांचा सरकारला घरचा आहेर.
तपोवनाची झाड तोडण्यास विरोध तरी वृक्षतोड सुरु,पालिकेच्या दाव्यानं वाद
तपोवनाची झाड तोडण्यास विरोध तरी वृक्षतोड सुरु,पालिकेच्या दाव्यानं वाद.