Pichach Yog : शनि आणि मंगळ गोचरमुळे जुळून येतोय पिशाच योग, या राशीच्या लोकांना राहावे लागेल सावध
Pishach yog यावेळी नवव्या घरात शनि आणि मंगळ एकमेकांकडे जात असल्याने पिशाच योग तयार झाला आहे. ज्योतिष शास्त्रानुसार ज्या राशींवर पिशाच योगाचा प्रभाव पडतो त्यांना मानसिक आणि शारीरिक त्रासातून जावे लागते.

मुंबई : ज्योतिषशास्त्रामध्ये (Astrology) अशा काही ग्रहांच्या संयोगाबद्दल सांगितले आहे ज्यांच्या निर्मितीमुळे काही राशींवर खूप भयानक परिणाम होऊ शकतात. असाच एक योग म्हणजे पिशाच योग. यावेळी नवव्या घरात शनि आणि मंगळ एकमेकांकडे जात असल्याने पिशाच योग तयार झाला आहे. ज्योतिष शास्त्रानुसार ज्या राशींवर पिशाच योगाचा प्रभाव पडतो त्यांना मानसिक आणि शारीरिक त्रासातून जावे लागते. सध्या पिशाच योग पुढील एक महिना चालू राहणार आहे. 16 नोव्हेंबर रोजी मंगळाच्या संक्रमणानंतर त्याचा प्रभाव कमी होईल. नवव्या आणि पाचव्या योगात मंगळ आणि शनीच्या उपस्थितीमुळे पिशाच योग कोणत्या राशींवर निर्माण होतो ते जाणून घेऊया.
या राशीच्या लोकांवर होणार प्रभाव
वृषभ
वृषभ राशीसाठी, पिशाच योगाचा प्रतिकूल परिणाम होऊ शकतो आणि आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. इजा आणि अपघात होण्याचीही शक्यता आहे. तुमचे शत्रू आणि विरोधक तुमचे नुकसान करू शकतात. कोणत्याही मालमत्तेबाबत वाद सुरू असेल तर तुम्हाला कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागू शकते. जोखमीचे निर्णय घेणे टाळा आणि ज्याची तुम्हाला माहिती नाही असे काम करणे टाळा.
तूळ
तूळ राशीसाठी मंगळ आणि शनि यांच्यामध्ये तयार झालेला पिशाच योग प्रतिकूल फलदायी ठरेल. या काळात तुमचे उत्पन्न चांगले असले तरी बचत करणे कठीण होईल. यावेळी तुमचा खर्च वाढेल. आरोग्याच्या बाबतीतही तुम्हाला समस्यांना सामोरे जावे लागू शकते. जवळच्या नातेवाईकाचा अविश्वास आणि अव्यवहार्यपणामुळे तुम्हाला मानसिक त्रास होऊ शकतो. तुम्ही कोणावरही अतिआत्मविश्वास टाळावा अन्यथा नुकसान होऊ शकते. तुमच्या मुलांच्या आरोग्याबाबतही तुम्ही चिंतेत राहाल.
मकर
मकर राशीच्या लोकांना पुढील 1 महिना पिशाच योगामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवनात तुम्हाला खूप संयम राखावा लागेल, अन्यथा तुमच्या राग आणि उत्कटतेमुळे तुमच्या नात्यात तणाव वाढेल. तुम्हाला अशा अनेक प्रसंगांना सामोरे जावे लागेल, ज्यामुळे तुम्हाला अचानक पैसे खर्च करावे लागतील. यावेळी, कोणाशीही पैशाची देवाणघेवाण करताना काळजी घ्या, अन्यथा तुमचे पैसे अडकू शकतात. तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवणे तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
