Planet Transit: या तीन राशींसाठी लवकरच सुरु होतोय शुभ काळ, मिळणार अपेक्षित फळ

मिथुन प्रमाणेच कन्या राशीचा स्वामी बुध ग्रह आहे. कन्या राशीच्या गोचर कुंडलीतील अकराव्या स्थानात बुध ग्रहाचा उदय होणार आहे.

Planet Transit: या तीन राशींसाठी लवकरच सुरु होतोय शुभ काळ, मिळणार अपेक्षित फळ
राशी भविष्य Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jul 27, 2022 | 5:30 AM

ज्योतिषशास्त्रात (Astrology) ग्रहांच्या राशी परिवर्तनाला (Planet Transit) विशेष महत्त्व आहे. एखादा ग्रह अस्ताला जाणं म्हणजेच तो ग्रह गोचर करताना सूर्याजवळ जातो. त्यामुळे सूर्याच्या तेजामुळे त्या ग्रहाचा प्रभाव कमी होतो. तर ग्रह सूर्यापासून जसा दूर जातो तसा उदय पावतो. असाच बुध ग्रह सूर्याच्या जवळ गेल्याने अस्ताला गेला आहे. 17 जुलैला बुध ग्रहाने कर्क राशीत प्रवेश केला आणि अस्ताला गेला. 29 जुलैला उदय होणार आहे. या बदलाचा मानवी जीवन आणि पृथ्वीवर थेट प्रभाव पडणार आहे. मात्र 3 राशी आहेत त्यांना बदलाचा सकारात्मक प्रभाव जाणवेल, जाणून घेऊयात

  1. मिथुन- या राशीचा स्वामी ग्रह बुध आहे. मिथुन राशीच्या गोचर कुंडलीतील दुसऱ्या स्थानात बुधाचा उदय होणारा आहे. या स्थानाला धन आणि वाणीचं स्थान म्हटलं जातं. त्यामुळे या काळात अचानक धनलाभ होऊ शकतो. त्यामुळे बुधाच्या उदयाचा फायदा या राशीच्या लोकांना होणार आहे. तसेच व्यवसायात करार निश्चित होण्याची दाट शक्यता आहे. वकील, मार्केटिंग आणि शिक्षकांसाठी हा काळ उत्तम असेल.
  2. कन्या- मिथुन प्रमाणेच कन्या राशीचा स्वामी बुध ग्रह आहे. कन्या राशीच्या गोचर कुंडलीतील अकराव्या स्थानात बुध ग्रहाचा उदय होणार आहे. ज्योतिषशास्त्रात या स्थानाला महत्त्वाचं स्थान आहे. या स्थानाला उत्पन्न आणि लाभाचं स्थान म्हटलं जातं. या काळात उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीसाठी उत्तम वेळ आहे.
  3. तूळ- या राशीच्या गोचर कुंडलीतील दशम स्थानात बुध ग्रहाचा उदय होत आहे. या स्थानाला व्यवसाय आणि नोकरीचं स्थान म्हटलं जातं. या काळात नवीन नोकरीचा प्रस्ताव येऊ शकतो. तसेच सध्या काम करत असलेल्या ठिकाणी पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. या काळात तुमच्या कामाचं देखील कौतुक होईल.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

हे सुद्धा वाचा
हार्वेस्टरचा वाद अन् जरांगेंचा थेट कराडला फोनकॉल, काय झालं संभाषण?
हार्वेस्टरचा वाद अन् जरांगेंचा थेट कराडला फोनकॉल, काय झालं संभाषण?.
'आका सोपा नाही...', वाल्मिक कराडचं कनेक्शन थेट अमेरिकेपर्यंत?
'आका सोपा नाही...', वाल्मिक कराडचं कनेक्शन थेट अमेरिकेपर्यंत?.
सैफवर 1 कोटींसाठी जीवघेणा हल्ला? हल्लेखोर शिरलाच कसा? काय घडलं बघा?
सैफवर 1 कोटींसाठी जीवघेणा हल्ला? हल्लेखोर शिरलाच कसा? काय घडलं बघा?.
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.