Horoscope 25th May 2021 | धनु आणि तूळ राशीला आरोग्याबाबत समस्या उद्भवण्याची शक्यता, जाणून घ्या संपूर्ण राशीभविष्य

Horoscope 25th May 2021 | धनु आणि तूळ राशीला आरोग्याबाबत समस्या उद्भवण्याची शक्यता, जाणून घ्या संपूर्ण राशीभविष्य
Horoscope

या आठवड्यातील मंगळवार 25 मे 2021 (Rashifal Of 25 May 2021) हा दिवस कसा असेल हे जाणून घेण्यासाठी वाचा संपूर्ण राशीभविष्य (Rashifal Of 25th May 2021 Horoscope Astrology Of Today).

Nupur Chilkulwar

|

May 26, 2021 | 2:56 PM

डॉ. अजय भाम्बी –

मुंबई : या आठवड्यातील मंगळवार 25 मे 2021 (Rashifal Of 25 May 2021) हा दिवस कोणत्या राशीच्या लोकांसाठी फायद्याचा असेल, कोणाला चांगली बातमी मिळेल. भगवान हनुमानजी कोणावर प्रसन्न होतील, कसा असेल तुमचा दिवस, या सर्व प्रश्नांची उत्तर जाणून घेण्यासाठी वाचा संपूर्ण राशीभविष्य (Rashifal Of 25th May 2021 Horoscope Astrology Of Today).

मेष :

परिस्थितींमुळे कामात येणारे अडथड्यांमधून आज थोडा दिलासा मिळेल. यावेळी बाहेरील गोष्टींऐवजी जवळचे संपर्क बळकट करण्यावर भर द्या. घरातील सदस्यांचा सल्ला आणि मार्गदर्शन ऐकणे आपल्या हिताचे असेल.

जवळच्या नातेवाईकाशी वाद-विवाद होऊ शकतात. फक्त मनमानी करण्याऐवजी इतर कोण काय म्हणतंय त्याकडेही लक्ष द्या. कौटुंबिक बाबींमध्ये जास्त हस्तक्षेप करु नका. संयम ठेवल्यास आणि शांततेने कार्य केल्याने सुसंगतता मिळेल.

आज आपल्याला जो काही यश मिळेल, त्याबद्दल फारसा विचार करु नका, त्वरित ते मिळवा. अधिक मेहनत करावीच लागेल. सरकारी कामात अडथळे अजूनही कायम राहतील. कार्यालयीन कामे सुधारतील.

💠 लव्ह फोकस – संबंध मजबूत ठेवण्यात आपली विशेष भूमिका असेल, कौटुंबिक वातावरण देखील आनंदाने भरलेले असेल.

🌀 खबरदारी – आपल्याला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या विश्रांती घेण्याची आवश्यकता आहे. जास्त कामाचे ओझे थकवा आणू शकते.

लकी रंग – पांढरा लकी अक्षर – म फ्रेंडली क्रमांक – 5

वृषभ

दुपारनंतर परिस्थिती काहीशी अनुकूल असेल. कौटुंबिक कार्यात व्यवस्था असेल. जर आपण पॉलिसीमध्ये पैसे गुंतवणार असाल तर वेळ योग्य आहे, पण आधी त्याबद्दल कसून चौकशी करा.

पूर्वीच्या नकारात्मक घटनांचा आजच्या आनंदावर प्रभाव पडू देऊ नका. अनावश्यक खर्चावर अंकुश ठेवा, कारण दिखावा करण्याच्या प्रवृत्तीमुळे उधळपट्टी होऊ शकते. यावेळी मुलांनी नवीन माहिती मिळविण्यात रस घेतला पाहिजे.

व्यवसाय पूर्ववत राहील. परंतु बहुतेक कामे आपल्या देखरेखीखाली करण्याचा प्रयत्न करा. कार्यालयातील सहकाऱ्यांशी व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. कुठल्या प्रकारचे राजकारण केले जाऊ शकते.

💠 लव्ह फोकस – कौटुंबिक व्यवस्था योग्य ठेवण्यात आपला विशेष प्रयत्न असेल. परस्पर संबंधांमध्ये अधिक भावनिक जवळीक असेल.

🌀 खबरदारी – खाणे-पिणे याविषयी बेफिकीर राहू नका. बद्धकोष्ठता आणि पोटाशी संबंधित समस्या वाढू शकतात.

लकी रंग – हिरवा लकी अक्षर – ह फ्रेंडली क्रमांक – 2

मिथुन

वेळ अनुकूल आहे. आपण ज्या कामासाठी प्रयत्न करीत होता त्यात यश मिळेल. घरातील वडीलधाऱ्यांच्या आपुलकीने आणि मार्गदर्शनाद्वारे तुम्हाला कोणत्याही मोठ्या समस्येतून मुक्तता मिळेल. आपली क्षमता अधिक चांगल्या करण्याचा प्रयत्न करा.

विद्यार्थी आणि युवकांना यावेळी इतर मित्रांशी संबंधित माहिती गोळा करणे देखील आवश्यक आहे. आपल्या मनातल्या शंका एखाद्या अनुभवी व्यक्तीबरोबर नक्की शेअर करा. स्वत: बरोबरही थोडा वेळ घालवा.

व्यवसायाशी संबंधित कामांसाठी सुरु असलेल्या या योजनेसाठी आज पैसा लावावा लागू शकतो. परंतु आपल्या बजेटच्या बाहेर खर्च करु नका. आपली प्रतिमा ऑफिसमध्ये परिपूर्ण राहील. कोणते ध्येय देखील साध्य होईल.

💠 लव्ह फोकस – पती-पत्नीमध्ये घरगुती समस्येबद्दल वादाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. काही गोष्टींकडे दुर्लक्ष करा. प्रेम प्रकरणात वेळ वाया घालवू नका.

🌀 खबरदारी – नकारात्मक विचारांना आपल्यावर वर्चस्व गाजवू देऊ नका. रक्तदाब आणि मधुमेह असलेले लोकांनी स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्यावी.

लकी रंग – क्रीम लकी अक्षर – स फ्रेंडली क्रमांक – 1

कर्क

सकारात्मक आणि ऊर्जावान राहण्यासाठी आपल्या अंतर्गत शक्तींवर लक्ष केंद्रित करा. आपल्यात काही क्रांतिकारक कल्पना निर्माण होत आहेत. इतरांच्या बोलण्याकडे लक्ष न देता आपले ध्येय साध्य करा, आपल्याला निश्चित यश मिळेल.

कधीकधी आपल्या स्वभावात इतरांवर आपली मर्जी चालवण्यासारख्या हट्टीपणा येतो, ज्यामुळे संबंधात काही समस्या उद्भवतात. या सवयीवर मात करा. सकारात्मक लोकांच्या सहवासात राहिल्याने आपल्याला अनुकूलता मिळेल.

कार्यक्षेत्रातल्या कोणावर विश्वास ठेवू नका, तुमची सर्व कामे तुमच्या देखरेखीखाली करा. आज काही अडचणींमध्ये काही सुधारणा होईल. भागीदारीशी संबंधित कामात जोडीदाराच्या सल्ल्यानुसार आणि अनुभवातून बर्‍याच गोष्टी ठीक करण्यात सक्षम असाल.

💠 लव्ह फोकस – घर आणि व्यवसायामध्ये योग्य सामंजस्य असेल. कौटुंबिक वातावरणही आनंददायी आणि शांत असेल.

🌀 खबरदारी – ताण आणि नैराश्याला स्वत:वर हावी होऊ देऊ नका. ध्यान आणि मेडिटेशन करण्यात थोडा वेळ घालवला तर तुम्हाला चांगलं आरोग्य लाभेल.

लकी रंग – केशरी लकी अक्षर – ब फ्रेंडली क्रमांक – 5

सिंह

ग्रहांची स्थिती अनुकूल असेल. यावेळी, उगाचचा विचार न करता वास्तविक परिस्थितीला सामोरे जा. प्रभावशाली व्यक्तीची भेट सकारात्मक असेल. आपण ज्या योग्य वेळेची वाट पाहत होता त्या दिवसाची प्रतीक्षा आता संपेल.

मुलांच्या वागणून त्यांच्या दृष्टीकोनातून समजून घेण्याचा प्रयत्न करा. वेळेनुसार आपली वागणूक बदलणे महत्वाचे आहे. घराच्या देखभालीच्या कामात जास्त खर्च होईल.

व्यवसायात काम करण्याची पद्धत बदलण्याची गरज आहे. मीडिया आणि आपल्या प्रतिस्पर्ध्यीच्या अफवांपासून दूर रहा आणि आपल्या कामांवर लक्ष केंद्रित करा. आपल्या कार्यालयातील काही लहानशा चुकीमुळे आपल्याला उच्च अधिकाऱ्यांच्या नाराजीचा सामना करावा लागू शकतो.

💠 लव्ह फोकस – जोडीदाराच्या कोणत्या समस्येच्या निराकरणात आपली मदत आवश्यक आहे. प्रेम संबंधांमध्ये एकमेकांशी जवळीक आणि घनिष्ठतेच्या भावना असतील.

🌀 खबरदारी – धोकादायक कार्यांपासून दूर रहा. पडण्याची किंवा जखम होण्याची शक्यता आहे.

लकी रंग – हिरवा लकी अक्षर – के फ्रेंडली क्रमांक – 6

कन्या

नित्यकर्मांपासून आरामासाठी आपल्या आवडीच्या कामांमध्येही थोडा वेळ घालवा, यामुळे आपला आत्मविश्वास पुन्हा वाढेल. आपल्याला बर्‍याच समस्या सोडविण्यात घरच्यांचं विशेष सहकार्य मिळेल.

नकारात्मक विचारांचे आपल्यावर वर्चस्व होऊ देऊ नका. आपल्या महत्वाच्या कामांमध्ये व्यस्त राहणे चांगले. तरुणांनी त्यांच्या भविष्यातील योजना अंमलात आणण्यासाठी अधिक माहिती मिळवावी.

व्यवसायातील भागीदार आणि सहयोगींचा सल्ला घेतल्यास चांगले परिणाम मिळतील. आपल्या संपर्कांची व्याप्ती अधिक वाढवा. सौदा निश्चित करण्यासाठी चांगली संधी देखील मिळू शकते.

💠 लव्ह फोकस – पती-पत्नीच्या नात्यात अहमपणा उद्भवू देऊ नका. एकमेकांच्या भावनांचा आदर केल्याने नात्यात जवळीक वाढेल.

🌀 खबरदारी – कधीकधी अशक्तपणा आणि डोकेदुखीची तक्रार जाणवेल. सकारात्मक कामांमध्ये व्यस्त रहा.

लकी रंग – गुलाबी लकी अक्षर -ए फ्रेंडली क्रमांक – 9

तूळ

कौटुंबिक कामांना प्राधान्य द्या. जवळच्या नातेवाईकांबरोबर काही मतभेद असतील तर ते सोडवण्याची वेळ आता आली आहे. आपल्या आवडीच्या कामांना थोडा वेळ द्या. यामुळे मानसिक शांती मिळेल.

ऑनलाईन कार्यांशी संबंधित कोणतेही कार्य करण्यापूर्वी चांगली माहिती मिळवा, फसवणूक होण्याची शक्यता आहे. आपल्या सभोवतालचे वातावरण सकारात्मक ठेवण्यासाठी आपला प्रयत्न आवश्यक आहे.

जर सध्याच्या व्यवसायाशी संबंधित काही नवीन काम सुरु करण्याची योजना असेल तर त्यावर कारवाई सुरु केली जाऊ शकते. व्यवसायातील किरकोळ आणि दैनंदिन उत्पन्नाकडे अधिक लक्ष द्या आणि केवळ पक्क्या बिलासह व्यवहार करा.

💠 लव्ह फोकस – घराचे वातावरण आनंददायी आणि सौहार्दपूर्ण राहील. प्रेमसंबंधांमधील गैरसमज दूर होतील.

🌀 खबरदारी – आरोग्याबाबत सतर्क राहणे महत्वाचे आहे. यावेळी, आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष केल्याने आपल्यासाठी समस्या उद्भवतील.

लकी रंग – लाल लकी अक्षर – रा फ्रेंडली क्रमांक – 3

वृश्चिक

दिवसाच्या सुरुवातीला गोष्टी व्यवस्थित करण्यात काही अडचणी येतील परंतु आपल्या समजुतदारपणामुळे दुपारनंतर परिस्थिती अनुकूल असेल. जर एखाद्याला कर्ज दिले गेले असेल तर आज ते परत मिळू शकते.

लोकांशी संवाद साधताना निष्काळजी होऊ नका, आपल्याकडील काही गोपनीय माहिती उघडकीस येऊ शकते. आपल्या मामाबरोबरचे नाते चांगले ठेवा. यावेळी कोणताही धोकादायक निर्णय घेण्यास टाळा.

व्यवसायातील मार्केटिंग संबंधित कामांवर अधिक लक्ष केंद्रित करा. यावेळी जनसंपर्क सुधारणे सकारात्मक परिणाम देईल. कर्मचार्‍यांसमवेत सुरु असलेल्या कोणत्याही अडचणी वेळेवर सोडवल्या जातील.

💠 लव्ह फोकस – प्रेम संबंधांना लग्नासाठी कौटुंबिक स्वीकृती मिळू शकते. प्रतिकूल परिस्थितीत परिवाराचं संपूर्ण सहकार्य मिळेल.

🌀 खबरदारी – सकारात्मक लोकांच्या मार्गदर्शनाचे आणि सल्ल्याचे अनुसरण करा. तणाव आणि नैराश्यासारख्या वातावरणापासून दूर रहा.

लकी रंग – पिवळा लकी अक्षर – ता फ्रेंडली क्रमांक – 8

धनु

भावनांमध्ये वाहून जाऊ नका, डोक्याचा वापर करा. हे आपल्याला चांगले निर्णय घेण्यात मदत करतील. मुलांसोबत बसून त्यांच्या समस्या सोडवल्यामुळे त्यांचे मनोबल आणि आत्मविश्वास वाढेल. थोडा वेळ धार्मिक कार्यात जाईल.

ऑनलाईन खरेदी करताना आपले बजेट लक्षात ठेवा. दिवसाच्या सुरुवातीला आपल्या कार्याची रुपरेषा ठरवा. दुपारनंतरच्या परिस्थिती काही प्रमाणात प्रतिकूल असू शकते. विद्यार्थी आणि युवकांना त्यांचे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी अधिक कठोर परिश्रम करण्याची आवश्यकता आहे.

व्यवसायात बरीच मेहनत घ्यावी असेल. आपले मनोबल टिकविणे महत्वाचे आहे. कौटुंबिक व्यवसायात योग्य व्यवस्था राखण्यात आपल्या सहकार्याचे कौतुक होईल.

💠 लव्ह फोकस – वैवाहिक संबंधांमध्ये गोडवा असेल. एखाद्या प्रिय मित्राशी संभाषण केल्याने मानसिक शांती मिळेल आणि जुन्या आठवणी परत येतील.

🌀 खबरदारी – व्यस्ततेमुळे आपल्या आरोग्याबाबत निष्काळजी राहू नका. कोणताही जुना आजार पुन्हा उद्भवू शकतो.

लकी रंग – आकाश लकी अक्षर -जी फ्रेंडली क्रमांक – 8

मकर

आज दिवसाची सुरुवात उत्तम होईल. म्हणून कोणत्याही कामाबबात निष्काळजी आणि आळशी होऊ नका. चांगली बातमी मिळेल. कुटुंबासमवेत घरगुती सुविधांची ऑनलाईन खरेदी देखील शक्य आहे.

शेजार्‍यांशी आणि जवळच्या नातलगांशी कोणत्याही प्रकारच्या वादात अडकू नका, याचा तुमच्या कामाच्या क्षमतेवरही विपरीत परिणाम होऊ शकतो आणि संबंध कडू होईल. मानसिक शांतता राखण्यासाठी आध्यात्मिक कार्यामध्येही थोडा वेळ घालवा.

व्यवसाय सामान्य राहील. प्रकल्प पूर्ण झाल्यावर किरकोळ चुका होतील. परंतु यातून काहीतरी शिका. यामुळे आपले कार्य सुधारेल.

💠 लव्ह फोकस – पती-पत्नीमध्ये परस्पर सामंजस्याची भावना असेल. कुटुंबातील सदस्यांसाठी एखादी भेटवस्तू घेतल्यास संबंध आणखी दृढ होतील.

🌀 खबरदारी – आपल्याला थोडं गुदमरल्यासारखे आणि अशक्तपणा जाणवेल. विश्वासू व्यक्तीला आपल्या मनातील शेअर करा.

लकी रंग – जांभळा लकी अक्षर – न फ्रेंडली क्रमांक – 3

कुंभ

आपल्या भविष्यातील उद्धीष्टांकडे सुनियोजितरित्या कार्य केल्याने मोठ्या प्रमाणात यश मिळेल. आपले सकारात्मक आणि सहकारी वर्तन आपल्याला इतरांता आदर मिळवून देईल. मित्र आणि कुटुंबासमवेत बराच वेळ घालवाल.

परंतु हे देखील लक्षात ठेवा की जवळपासचे कोणीतरी आपल्या समस्येसाठी कारणीभूत ठरु शकते. म्हणून प्रत्येक कृतीवर लक्ष ठेवा. मुलांवर जास्त प्रतिबंध घालू नका. यामुळे त्यांचे मनोबल कमी होऊ शकते.

दिवसाच्या सुरुवातीला व्यवसायामध्ये काही प्रकारचे व्यत्यय येऊ शकतात. पण, धैर्य ठेवा. आपण हे अडथळे दूर करण्यात यशस्वी व्हाल. आपले पूर्ण लक्ष मार्केटिंग आणि उत्पादनाच्या जाहिरातीवर केंद्रित करा.

💠 लव्ह फोकस – पती-पत्नीने घरातील समस्या सोडवण्याचा प्रयत्न केल्यास यश मिळेल. सर्व सदस्यांमध्ये परस्पर प्रेम आणि सहकार्याची भावना वाढेल.

🌀 खबरदारी – सध्याच्या वातावरणाबाबत सावधगिरी बाळगा. तथापि, आपल्या पद्धतशीर दिनचर्या आणि योगा इत्यादीकडे लक्ष देणे आपल्याला निरोगी ठेवण्यास मदत करेल.

लकी रंग – केशरी लकी अक्षर – वा फ्रेंडली क्रमांक – 9

मीन

गेल्या काही काळापासून आपण जी उद्दीष्टे मिळविण्याची योजना आखली आहेत, ती आज मिळवण्याचा उत्तम काळ आहे. या यशाचा पुरेपूर उपयोग करा. जुन्या मित्राला भेटून किंवा त्यांच्याशी संवाद साधूनही एक मोठी समस्या सोडविली जाऊ शकते.

काही आर्थिक अडचणी आणि समस्या येतील. आपण वेळेत त्यांचे निराकरण करण्यात देखील सक्षम व्हाल. शेअर्स, तेजी मंदी इत्यादी कामे करा, अन्यथा जास्त तोटा होण्याची शक्यता आहे.

आपला व्यवसायिक दृष्टिकोन कार्यक्षेत्रात बर्‍याच गोष्टी आयोजित करण्यात सक्षम असाल. परंतु वाचल्याशिवाय कोणत्याही कागदावर सही करु नका, अन्यथा मोठ्या समस्येत पडू शकता. गुंतवणूक करण्यास वेळ अनुकूल नाही.

💠 लव्ह फोकस – पती-पत्नीमध्ये परस्पर सामंजस्याचा अभाव असेल. परंतु प्रेम संबंधातील भावनिक जवळीक अधिक तीव्र होईल.

🌀 खबरदारी – सध्याच्या वातावरणामुळे निष्काळजीपणाने वागू नका आणि आरोग्य सुरक्षा नियमांचे योग्य पालन करा.

लकी रंग – लाल लकी अक्षर – मा फ्रेंडली क्रमांक – 6

Rashifal Of 25th May 2021 Horoscope Astrology Of Today

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Horoscope 24th May 2021 | कोणावर असेल महादेवाची कृपा, कोणाला मिळेल चांगली बातमी, जाणून घ्या संपूर्ण राशीभविष्य

Horoscope 21th May 2021 | मिथुन, सिंह आणि कुंभ राशीला आर्थिक लाभ होण्याची शक्यता, जाणून घ्या आजचं संपूर्ण राशीभविष्य

Horoscope 20th May 2021 | तूळ राशीला सन्मान, कुंभ, मीन राशीला आर्थिक लाभ होईल, जाणून घ्या आजचं संपूर्ण राशीभविष्य

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें