Shani gochar 2022: शनिदेवाच्या कृपेने या तीन राशींचे चमकणार नशीब; करियर आणि आर्थिक प्रगतीचा वाढणार वेग

शनी देवाची आठवण काढताच अनेकांच्या अंगावर काटा उभा राहतो. त्यात शनीचे गोचर (Shani Gochar 2022) म्हंटले तर विचारायलाच नको. शनिदेव आपल्या राशीाल नको अशी जवळपास प्रत्येकाची भावना असते. शनिदेवांना नवग्रहांमध्ये न्यायदेवता म्हणून ओळखले जातात. शनिदेवांचा गोचर हा मंदगतीने होतो. शनिदेव अडीत वर्षानंतर एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात. त्यामुळे ज्या राशीत प्रवेश केला आहे. त्या […]

Shani gochar 2022: शनिदेवाच्या कृपेने या तीन राशींचे चमकणार नशीब; करियर आणि आर्थिक प्रगतीचा वाढणार वेग
नितीश गाडगे

|

Jun 19, 2022 | 5:32 PM

शनी देवाची आठवण काढताच अनेकांच्या अंगावर काटा उभा राहतो. त्यात शनीचे गोचर (Shani Gochar 2022) म्हंटले तर विचारायलाच नको. शनिदेव आपल्या राशीाल नको अशी जवळपास प्रत्येकाची भावना असते. शनिदेवांना नवग्रहांमध्ये न्यायदेवता म्हणून ओळखले जातात. शनिदेवांचा गोचर हा मंदगतीने होतो. शनिदेव अडीत वर्षानंतर एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात. त्यामुळे ज्या राशीत प्रवेश केला आहे. त्या राशीच्या मागच्या आणि पुढच्या राशीला साडेसाती सुरु असते. गोचरादरम्यान शनिदेव वक्रीही होतात. वक्री झाल्यानंतर काही कालावधीसाठी मागच्या राशीत जातात. त्यामुळे साडेसाती (Sadesati) आणि अडीचकीची गणितं बदलतात. शनिदेव सध्या कुंभ राशीत असून वक्री अवस्थेत आहेत. 12 जुलै रोजी, शनि ग्रह त्यांच्या स्वतःच्या राशीत मकर राशीत प्रवेश करणार आहेत. शनिदेव सहा महिने मकर राशीत राहतील. मकर राशीतील वक्री शनिचे संक्रमण काही लोकांसाठी वरदान ठरेल. मकर राशीत शनिच्या वास्तव्यादरम्यान त्यांना खूप फायदा होईल. करिअर-आर्थिक प्रगतीचा वेग प्रचंड वाढेल. जाणून घेऊया कोणत्या तीन राशींसाठी शनिचे गोचर चांगले दिवस घेऊन येणार आहे.

  1. वृषभ: शनिचे संक्रमण या राशीसाठी शुभ असेल. करियरची नवी संधी मिळू शकते. ज्या नोकरीत आहेत त्यात बढती मिळू शकते. करियरसाठी हे सुगीचे दिवस आहेत असे म्हणायला हरकत नाही. नोकरीच्या ठिकाणी मान-सन्मान मिळेल. धनलाभ होईल. उत्पन्न वाढल्याने आर्थिक चिंता कमी होईल. जीवनात सुख-सुविधा वाढतील. अविवाहित लोकांना लग्नाचा प्रस्ताव मिळेल.
  2. धनु : वक्री शनिचा मकर राशीत प्रवेश धनु राशीच्या लोकांना लाभदायक ठरेल. त्याचबरोबर साडेसातीपासून तात्पुरता दिलासा मिळणार आहे. सहा महिन्यांसाठी चांगली फळं मिळतील. अचानक पैसे किंवा उत्पन्न वाढेल. नोकरी आणि बिझनेस या दोन्हीसाठी हा काळ चांगला आहे. व्यावसायिकांना फायदा होईल आणि नोकरी शोधणाऱ्यांची प्रगती होईल. भागीदारीत काम करणाऱ्यांसाठी  हा काळ चांगला आहे.
  3. मीन: वक्री शनि गोचर मीन राशीच्या लोकांना फायद्याचे ठरेल. उत्पन्न वाढेल. सहा महिन्यांत लाभाच्या अनेक संधी मिळतील. पैसे कमावण्याचे नवीन मार्ग तयार होतील. व्यावसायिक या काळात चांगले करार निश्चित करू शकतात. दुसरीकडे, नोकरी शोधणाऱ्यांना  करिअरमध्ये सुवर्णसंधी मिळू शकते.

हे सुद्धा वाचा

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें