Special Story | परदेशात नोकरी करायचीय, तर ‘या’ भाषा अवश्य शिका…

गेल्या काही वर्षांपासून परदेशी भाषेचे शिक्षण घेऊन नोकरी करण्याकडे तरुणांचा कल वाढत आहे. बरेच तरुण परदेशी भाषा शिकत देखील आहेत.

Special Story | परदेशात नोकरी करायचीय, तर 'या' भाषा अवश्य शिका...
Follow us
| Updated on: Feb 06, 2021 | 7:42 AM

मुंबई : गेल्या काही वर्षांपासून परदेशी भाषेचे शिक्षण घेऊन नोकरी करण्याकडे तरुणांचा कल वाढत आहे. बरेच तरुण परदेशी भाषा शिकत देखील आहेत. मात्र, नेमकी कोणती परदेशी भाषा शिकावी ज्यामुळे चांगला जॅाब, परदेशात जाण्याची संधी आणि जास्त पगार मिळेल हे जाणून घेण्याचा प्रयत्न विद्यार्थी करत असतात. जर तुम्हालाही परदेशी भाषा शिकून करिअर करायचे असेल तर तुम्ही जगातील या 5 अव्वल परदेशी भाषांचे अभ्यासक्रम करून करियरची सुरूवात करू शकता.  परदेशी भाषा शिकल्या तर तुमच्याकडे ‘ग्लोबल व्हिलेज’ आणि इंटरनेट युगात जगण्याची संधी नक्कीच मिळेल. (If you want to get a job foreign, you must learn this language)

अर्थात आपली भाषा किंवा कोणतीही परदेशी भाषा शिकून आपल्या करिअरची सुरूवात करायची असेल तर आता भारतातही यासाठी बर्‍याच मोठ्या संधी उपलब्ध आहेत. परंतु सर्व प्रथम, हे जाणून घेणे फार महत्वाचे आहे की, आपण कोणत्या क्षेत्रात परदेशी भाषेमध्ये योग्य कोर्स करून रोजगाराच्या संधी मिळवू शकतो किंवा आपण एखादा व्यवसाय सुरू करू शकतो जो परदेशी भाषांद्वारे सुरू केला जाऊ शकतो.

जर्मन फ्रेंच, स्पॅनिश, अरबी किंवा चिनी या इतर परदेशी भाषांसारख्या जगातील बर्‍याच लोकांना जर्मन भाषा बोलता येत नाही. परंतु ही भाषा भारतात फ्रेंच नंतरची सर्वात लोकप्रिय परदेशी भाषा आहे. जर्मन भाषा जर्मनी, ऑस्टेलिया आणि स्वित्झर्लंड इ. युरोपियन देशांची अधिकृत भाषा आहे. आज जर्मनी जगातील एक आर्थिक केंद्र आहे आणि बरेच मोठे बीएमडब्ल्यू, सीमेंस, डॅमलर आणि फोक्सवॅगन सारख्या जर्मन कंपन्यांमध्ये नोकरीची संधी मिळविण्यासाठी जर्मन भाषा बोलता येणे महत्वाचे आहे. विशेष म्हणजे जर्मन भाषेचा कोर्स भारतातील 600 हून अधिक शाळा आणि महाविद्यालयांमध्ये अभ्यासक्रमाचा भाग आहे.

स्पॅनिश स्पॅनिश ही जगभरातील सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा आहे. फ्रेंच आणि जर्मननंतर स्पॅनिश ही भाषा भारतातील सर्वात लोकप्रिय भाषा आहे. स्पॅनिश भाषा शिकल्यानंतर तुम्ही पर्यटन, परराष्ट्र सेवा, बीपीओ / केपीओ जॉब्स, ट्रान्सलेशन, आंतरराष्ट्रीय व्यवसाय अशा विविध क्षेत्रात चांगल्या नोकर्‍या करू शकता.

जपानी सतत सुधारत असलेल्या भारत-जपानी संबंधांबरोबरच, जपानी भाषेच्या तज्ञांची मागणी देखील आपल्या देशात वाढत आहे. ज्यामुळे विविध जपानी कंपन्या भारतात व्यवसाय करण्यासाठी येत आहेत. जपान तंत्रज्ञान आणि उच्च प्रतीच्या उत्पादनांचे केंद्र बनले आहे. भारतातील पूर्व आशियाई भाषांमध्ये जपानी भाषा ही सर्वात जास्त पसंतीची भाषा आहे.

फ्रेंच भारतातील कॉर्पोरेट क्षेत्रात उत्तम जॅाब मिळविण्यासाठी फ्रेंच भाषा ही सर्वोत्तम परदेशी भाषा आहे. फॅशन, ट्रॅव्हल, रिटेल, एज्युकेशन, ऑटोमोटिव्ह, लक्झरी गुड्स, एयरोनॉटिक्स इत्यादी क्षेत्राशी संबंधित बहुराष्ट्रीय कंपन्या त्यांची बोलली जाणारी प्रमुख भाषा म्हणून फ्रेंचचा वापर करतात. फ्रेंच भाषा 5 खंडांच्या 30 पेक्षा जास्त देशांमध्ये बोलली जाते आणि इंग्रजी भाषेनंतर जगातील सर्वात वाचली जाणारी परदेशी भाषा म्हणजे फ्रेंच भाषा आहे.

चीनी जगातील 1 अब्जाहून अधिक लोक मंदारिन चिनी भाषा बोलतात. चीन एक मोठी बाजारपेठ बनला आहे आणि विविध आंतरराष्ट्रीय कंपन्या आणि व्यवसायांना चिनी भाषेचे चांगले ज्ञान असणार्‍या आणि चीनी संस्कृतीत यशस्वीरित्या कार्य करू शकणार्‍या लोकांना नोकरीवर घ्यायचे आहे. कारण भारतातील फारच कमी लोक चिनी भाषा बोलतात आणि त्यांना चीनी भाषा समजते.

भारतातील बऱ्याच शिक्षण संस्थेत आणि महाविद्यालयांमध्ये विविध परदेशी भाषा शिकवल्या जातात. यामध्ये बरेच डिप्लोमा कोर्स ते पीएचडीपर्यंत शिक्षण दिले जाते. भारतामध्ये कुठल्या महाविघालयात आपण परदेशी भाषांचे शिक्षण घेऊ शकतो त्या महाविघालयांची नावे खालीलप्रमाणे

सावित्रीबाई फुले विद्यापीठ (पुणे विद्यापीठ), पुणे सिम्बायोसिस इंस्टिट्यूट ऑफ फॉरेन लँग्वेज (एसआयएफएल), पुणे इंग्रजी व विदेशी भाषा विद्यापीठ, हैदराबाद रामकृष्ण मिशन इंस्टिट्यूट ऑफ कल्चर, कलकत्ता बनारस हिंदू विद्यापीठ, वाराणसी दिल्ली विद्यापीठ, नवी दिल्ली राजस्थान विद्यापीठ, जयपूर भाषा स्कूल – जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, नवी दिल्ली अलायन्स फ्रान्सेइस डी नवी दिल्ली, नवी दिल्ली एमिटी स्कूल ऑफ लँग्वेज, नोएडा

(If you want to get a job foreign, you must learn this language)

Non Stop LIVE Update
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.