मोबाईलवरुन माहिती अधिकार अर्ज दाखल करा, तुम्हाला हवी असलेली माहिती मिळवा

माहिती अधिकार कायद्याचा वापर करुन माहिती मिळवणं आता सोपं झालं असून केंद्र आणि राज्य सरकारच्या वेबसाईटवरुन माहिती मागवता येते. (RTI Online )

मोबाईलवरुन माहिती अधिकार अर्ज दाखल करा, तुम्हाला हवी असलेली माहिती मिळवा
माहितीचा अधिकार आता ऑनलाईन
Follow us
| Updated on: Mar 02, 2021 | 12:46 PM

मुंबई: माहिती अधिकार कायदा 2005 (Right to Information Act 2005) मध्ये लागू करण्यात आला. माहिती अधिकार कायद्याद्वारे नागरिक त्यांना हवी असलेल्या विभागांसंदर्भातील प्रश्नांची माहिती मागवू शकतात. माहिती अधिकारांतर्गत माहिती मागवायाची असेल तर काय करावे, असा प्रश्न अनेकांना पडतो. माहिती अधिकार कायद्याचा वापर करुन माहिती मिळवणं आता सोपं झालं आहे. नागरिक त्यांना हवी असलेली माहिती ऑनलाईन पद्धतीनं मागवू शकतात. केंद्र आणि राज्य सरकारनं यासाठी स्वतंत्र वेबसाईट तयार केल्या आहेत. ( RTI Online how to get information under Right to information Act through website)

माहिती अधिकारासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या वेबसाईट

केंद्र सरकारच्या विभागासंदर्भातील माहिती मागवायची असेल तर तुम्हाला https://rtionline.gov.in/ या वेबसाईटला भेट द्यावी लागेल. महाराष्ट्र राज्य सरकारच्या कार्यकक्षेत येणाऱ्या विभागांसर्दभातील माहिती मागवायची असल्यास तुम्हाला https://rtionline.maharashtra.gov.in/ या वेबसाईटवर भेट द्यावी लागेल. महाराष्ट्र राज्य माहिती अधिकार वेबसाईट द्वारे तुम्ही 200 विभागांची माहिती ऑनलाईन पद्धतीनं मागवू शकता. त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करावा लागेल.

ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी घ्यायची दक्षता

माहितीच्या अधिकारांतर्गत ऑनलाईन माहिती अधिकाराचा अर्ज तसेच प्रथम अपील अर्ज दाखल करण्यासाठी पोर्टलचा वापर करता येईल. यासाठी लागणारे विहित शुल्क ऑनलाईन पद्धतीनं भरता येईल. तुम्ही मागवलेली माहिती अधिक असल्यास अतिरिक्त शुल्क भरावे लागेल. ऑनलाईन अर्जामध्ये जे रकाने देण्यात आले आहेत त्यामध्ये तुम्ही 15 शब्दांमध्ये तुमची माहिती लिहू शकता. त्यापेक्षा जास्त मजकूर असल्यास पीडीएफ फाईल अपलोड करावी लागेल.

अर्जाचं शुल्क

ऑनलाईन पद्धतीचा वापर करुन माहिती मागवण्यासाठी 20 रुपये शुल्क भरावे लागले. तर, अर्जदार दारिद्र्य रेषेखालील असल्यास त्यांना माहिती मागवण्यासाठी शुल्क भरावं लागणार नाही. अर्जाचं शुल्क भरण्यासाठी 1) इंटरनेट बँकींग 2) एटीएम-कम-डेबिट कार्ड 3) क्रेडिट कार्ड (मास्टर्स/व्हीसा) याचा वापर करता येईल.

ऑनलाईन अर्ज कसा करणार?

महाराष्ट्र शासनाच्या माहिती अधिकार कायदा ऑनलाईन अर्ज पोर्टला भेट द्या. त्यानंतर वेबसाईटवर ऑनलाईन माहितीचा अधिकार पोर्टल वापरण्यासाठीच्या मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. त्या वाचून समजून घ्या त्यानंतर मार्गदर्शक सूचना वाचल्याचं मान्य करुन अर्ज दाखल करण्याच्या बटनवर क्लिक करा. यानंतर तुम्हाला कोणत्या विभागाची माहिती हवी आहे तो निवडावा लागेल. अर्जदाराचे नाव, ईमेल आयडी, मोबाईल नंबर, पत्ता, अर्ज दाखल करण्याचं कारण, अर्जदार दारिद्रय रेषेखालील आहे का ते निवडल्यानंतर हवी असलेल्या माहितीसंबंधी तपशील माहिती अधिकार विनंती अर्ज मजकूर नमुन्यात लिहावा. त्यानंतर तुम्हाला अर्ज सबमिट करता येईल. त्यानंतर विहीत शुल्क भरुन तुम्ही हवी असलेली माहिती मिळवू शकता.

महाराष्ट्र शासनाच्या पोर्टलवर कोणत्या विभागांची माहिती

मंत्रालयातील विविध विभाग, पोलीस आयुक्त कार्यालयं, महापालिका, जिल्हा परिषद, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, जिल्हा पोलीस कार्यालय, तहसील कार्यालय आदी विभागांकडून माहिती मागवता येईल.

संबंधित बातम्या :

नागपुरात चार वर्षात 4 लाख वृक्षांची कत्तल, माहिती अधिकारात उघड

सरन्यायाधीशांचे कार्यालय आता ‘आरटीआय’ अंतर्गत

( RTI Online how to get information under Right to information Act through website)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.