15 दिवसांत 2 ग्रहण, होणार विनाश, जाणून घ्या काय म्हणतंय ज्योतिष शास्त्र?
Surya And Chandra Grahan Date or Time 2025: 2025 'या' महिन्यात 15 दिवसांत 2 ग्रहण, जुळून आलाय फार विचित्र योगायोग... होणार विनाश, जाणून घ्या काय म्हणतंय ज्योतिष शास्त्र?

Surya And Chandra Grahan Date or Time 2025: भारतात चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण यांना फार मोठं महत्त्व आहे. ग्रहण काळात विशेष काळजी घेतली पाहिजे असं पूर्वजांनी सांगितलं आहे. तर यामागे ज्योतिष शास्त्र देखील आहे… सांगायचं झालं तर 2025 मध्ये 15 दिवसांमध्ये 2 ग्रहण लागणार आहे. पहिला ग्रहण 7 सप्टेंबर रोजी असणार असून तो चंद्रग्रहण असणार आहे.. तर 15 व्या दिवशी म्हणजे 21 सप्टेंबर रोजी खंडग्रास सूर्यग्रहण असणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, या ग्रहणांचा जीवन, आरोग्य आणि व्यवसायावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे ग्रहण काळातील वेळ, सुतक काळ आणि उपाय जाणून घ्या.
सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण या केवळ खगोलीय घटना नाहीत तर ज्योतिषशास्त्रात त्यांना विशेष महत्त्व देण्यात आले आहे. एका महिन्या 15 दिवसांच्या अंतरावर दोन ग्रहण… असं फार क्वचित होतं. ज्योतिषशास्त्रात, एकाच महिन्यात इतक्या कमी अंतराने येणारे ग्रहण हे मोठ्या बदलांचे आणि संभाव्य आव्हानांचे लक्षण मानले जातात.
यंदाच्या वर्षी म्हणजे 2025 मध्ये दोन ग्रहणे फार कमी अंतरावर असल्याने फार विचित्र योगायोग जुळून आला आहे. यापूर्वी 2022 मध्ये 25 ऑक्टोबर रोजी सूर्यग्रहण आणि 7 नोव्हेंबर रोजी चंद्रग्रहण झालं होतं. तर 1979 मध्ये 22 ऑगस्ट रोजी सूर्यग्रहण 6 सप्टेंबर रोजी चंद्रग्रहण झालं होतं…
7 सप्टेंबर – पूर्ण चंद्रग्रहण
वर्षातील शेवटचं पूर्ण चंद्रग्रहण 7 सप्टेंबर 2025 रोजी भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेला होईल. हे ग्रहण भारत, आशिया, युरोप आणि ऑस्ट्रेलियाच्या अनेक भागात दिसणार आहे. त्यामुळे काही गोष्टींची काळजी घेणं देखील फार महत्त्वाचं आहे.
ग्रहण प्रारंभ – रात्री 9.57 वाजता
मध्यकाळ – 11.41 वाजता
समाप्ती – 1.27 वाजता (8 सप्टेंबरच्या रात्री)
पूर्ण चंद्रग्रहणाच्या वेळी धार्मिक आणि मानसिक परिणाम जास्त मानले जातात. वैदिक शास्त्रांनुसार, या काळात अन्न, पाणी, पूजा आणि शुभ कार्ये करण्यास मनाई आहे. शास्त्रात गर्भवती महिलांना विशेषतः सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला जातो.
21 सप्टेंबर – खंडग्रास सूर्यग्रहण
चंद्रग्रहणाच्या 15 दिवसांनंतर म्हणजे 21 सप्टेंबर रोजी अश्विन महिन्याच्या तिथीवर खंडग्रास सूर्यग्रहण होईल. हा ग्रहण भारतात दिसून येणार नाही… पण त्याचा ज्योतिषीय परिणाम होईल.
ग्रहण सुरू: रात्री 11.00 वाजता
समाप्ती वेळ: दुपारी 3:24 वाजता (22 सप्टेंबर)
खंडग्रास सूर्यग्रहण न्यूझीलंड, पूर्व मलेशिया, दक्षिण पॉलिनेशिया आणि अंटार्क्टिकाच्या काही भागात दिसेल. विशेष म्हणजे सूर्यग्रहणाचा दिवस पितृ अमावस्येशी देखील जुळतो, जो श्राद्ध आणि पितृ तर्पणासाठी खूप महत्वाचा असतो. पितृदोष आणि पूर्वजांशी संबंधित कर्मांच्या संकल्पासाठी हा काळ सर्वात योग्य मानला जातो.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
