AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दातांमध्ये गॅप असलेल्या लोकांचे नशीब असते जोरदार! या गोष्टींमध्ये असतात प्रचंड हुशार

जर दोन्ही दातांच्यामध्ये अंतर असेल तर त्या व्यक्तीचा स्वभाव कसा असतो? जाणून घ्या सामुद्रिक शास्त्रात काय म्हटलंय?

दातांमध्ये गॅप असलेल्या लोकांचे नशीब असते जोरदार! या गोष्टींमध्ये असतात प्रचंड हुशार
| Updated on: Aug 20, 2026 | 3:53 PM
Share

सामुद्रिक शास्त्रानुसार मानवी शरीराच्या प्रत्येक अवयवाचा संबंध व्यक्तीच्या स्वभावाशी आणि आयुष्यातील काही घटनांशी जोडला जातो. चेहरा, डोळे, हाताच्या रेषा यांसोबतच दातांची रचनाही व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल काही संकेत देत असल्याचे मानले जाते. अनेकांच्या पुढच्या दातांमध्ये थोडे अंतर असते. काही जण याकडे दातांमधील कमतरता म्हणून पाहतात; मात्र सामुद्रिक शास्त्रात हे अंतर शुभ मानले जाते.

सामुद्रिक शास्त्रातील मान्यतेनुसार, पुढच्या दातांमध्ये अंतर असणारे लोक भाग्यवान असतात. अशा व्यक्तींमध्ये नवीन विचार करण्याची आणि इतरांपेक्षा वेगळे काहीतरी करण्याची क्षमता असते असे मानले जाते. त्यामुळे आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर हे लोक आयुष्यात चांगले नाव आणि प्रतिष्ठा मिळवू शकतात.

संकटांमध्येही हार मानत नाहीत

दातांमध्ये अंतर असलेल्या व्यक्तींचा स्वभाव सकारात्मक आणि आत्मविश्वासू असल्याचे सामुद्रिक शास्त्रात म्हटले जाते. आयुष्यात अडचणी आल्या तरी ते सहज घाबरत नाहीत किंवा परिस्थितीसमोर हार मानत नाहीत. मेहनत, चिकाटी आणि योग्य निर्णय घेण्याच्या क्षमतेच्या जोरावर ते समस्यांवर मार्ग काढतात अशी मान्यता आहे.

ज्योतिषशास्त्रीय मान्यतेनुसार, दातांमधील अंतराचा संबंध शुक्र आणि गुरु या शुभ ग्रहांशी जोडला जातो. शुक्र हा सौंदर्य, कला आणि आकर्षणाचा कारक मानला जातो तर गुरु ग्रह ज्ञान, सुख-समृद्धी आणि प्रगतीचे प्रतीक मानला जातो. या दोन्ही ग्रहांची कृपा असलेल्या व्यक्तींमध्ये दातांमध्ये असे अंतर दिसते अशी ज्योतिषीय धारणा आहे.

आर्थिक बाबतीतही असतात हुशार

दातांमध्ये अंतर असलेल्या व्यक्ती आर्थिक बाबतीत चतुर असतात अशीही सामुद्रिक शास्त्रातील मान्यता आहे. पैसा कमावण्यासोबतच त्याचा योग्य वापर आणि गुंतवणूक करण्याची क्षमता त्यांच्यात असते असे म्हटले जाते. आर्थिक अडचणी आल्या तरी आपल्या बुद्धीमत्तेच्या जोरावर त्या परिस्थितीतून लवकर बाहेर पडण्याची क्षमता त्यांच्यात असल्याचे मानले जाते.

सामुद्रिक शास्त्रानुसार, दातांमध्ये अंतर असलेल्या व्यक्तींना सुरुवातीच्या काळात काही संघर्ष करावा लागू शकतो; मात्र पुढे मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर त्यांना यश मिळते. ते ज्या क्षेत्रात काम करतात, त्या क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याची क्षमता त्यांच्यात असते असे मानले जाते.

डिस्क्लेमर: या बातमीत दिलेली माहिती सामुद्रिक शास्त्र, ज्योतिषीय मान्यता आणि लोकपरंपरांवर आधारित आहे. या माहितीचा उद्देश केवळ सामान्य माहिती देणे हा आहे. वाचकांनी कोणताही निष्कर्ष काढताना स्वतःचा विवेक वापरावा.

Follow Us
ठाकरेंना सर्वात मोठा धक्का! कालच बैठक घेतली अन् आज ठाकरेंच्या नगरसेवका
ठाकरेंना सर्वात मोठा धक्का! कालच बैठक घेतली अन् आज ठाकरेंच्या नगरसेवकांनी... अखेर ज्याची भीती तेच घडलं
लोकप्रतिनिधींनी स्वतःच्या मुलांना... अभिजीत दीपके यांचा संताप
Abhijeet Dipke | लोकप्रतिनिधींनी स्वतःच्या मुलांना... अभिजीत दीपके यांचा संताप, नेमकं काय घडलं?
थोड्याच वेळात शिवसेना चिन्हावर सुनावणी, इतक्यात वकील सरोदेंचं वक्तव्य
अध्यक्षांनी साक्ष, पुरावे, प्रश्नोत्तरे सगळंच... थोड्याच वेळात शिवसेना पक्ष चिन्हावर सुनावणी, इतक्यात वकील असीम सरोदेंचं विधान चर्चेत
संजय राऊतांकडे तडजोड करण्याची मागणी, नारायण राणे मानहानी प्रकरणी...
संजय राऊतांकडे तडजोड करण्याची मागणी, नारायण राणे मानहानी प्रकरणी नेमकं काय घडलं?
शिंदे यांची धावपळ आणि... शिवसेना पक्षाची सुनावणी सुरु होण्याआधीच बड्या
शिंदे यांची धावपळ आणि... शिवसेना पक्षाची सुनावणी सुरु होण्याआधीच बड्या नेत्याचं मोठं विधान
सुनेत्रा पवारांचे अध्यक्षपद खरंच अवैध? सचिदानंद सिंह यांची पुन्हा रिमा
सुनेत्रा पवारांचे अध्यक्षपद खरंच अवैध? सचिदानंद सिंह यांची पुन्हा रिमाईंडर नोटीस, आता...
मूळ शिवसेना कुणाची? 7 दिवसांच्या सुनावणीनंतर निकाल कोणत्या वळणावर?
मूळ शिवसेना कुणाची? 7 दिवसांच्या सुनावणीनंतर निकाल कोणत्या वळणावर? आज ठाकरेंचे वकील...
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठं घडणार? शरद पवार आणि पार्थ पवार भेटीनंतर
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठं घडणार? शरद पवार आणि पार्थ पवार भेटीनंतर भलत्याच चर्चांना उधाण, 3 तासांच्या बैठकीत...
धाकधुक वाढली! शिवसेनेचं चिन्ह गोठणार की... वकील अनंत कळसेंचं विधान
धाकधुक वाढली! शिवसेनेचं चिन्ह गोठणार की... वकील अनंत कळसेंचं सुचक वक्तव्य, अखेर मोठी अपडेट समोर
मोठी बातमी! लाडकी बहिण योजनेबाबत मुख्यमंत्री फडणीसांचं मोठ विधान
मोठी बातमी! लाडकी बहिण योजनेतील अपात्रतेबाबत मुख्यमंत्री फडणीसांचं मोठं विधान; काय म्हणाले?