तुम्हीही स्वयंपाकघरात मीठ आणि तिखट एकाच ठिकाणी ठेवता का? स्वत:च ओढावून घेताय संकट
वास्तुशास्त्रानुसार, स्वयंपाकघरात कधीही मीठ, साखर, लाल तिखट एकत्र ठेवू नये. त्यामुळे घरातील वातावरणावर काय परिणाम होतो हे जाणून घेऊयात. तसेच घरात हळद साठवण्याची एक खास पद्धत आहे ज्यामुळे घरात नक्कीच समृद्धी येते.

आपल्या सर्वांनाच माहित आहे की वास्तूशास्त्रात घराबाबत अनेक नियम दिलेले असतात. त्यात स्वयंपाकघरासाठी तर जास्तच नियम असतात. कारण वास्तुशास्त्रानुसार, स्वयंपाकघर हे घरातील सर्वात महत्वाचे स्थान मानले जाते आणि संपूर्ण घराला ऊर्जा प्रदान करते. म्हणूनच, स्वयंपाकघराला घराचे हृदय देखील म्हटले जाते. असे मानले जाते की स्वयंपाकघराची स्थिती कुटुंबातील सदस्यांवर होणारा परिणाम दर्शवते. स्वच्छ आणि नीटनेटके स्वयंपाकघर आनंद, शांती आणि समृद्धी राखते.जर स्वयंपाकघर जर अस्वच्छ किंवा घाणेरडे असेल तर त्याचा जे जेवण बनतो त्यावर आणि परिणामी घरातील सदस्यांवर देखील त्याचा नकारात्मक परिणाम होतो.
मीठ आणि लाल तिखट स्वयंपाकघरात एकाच ठिकाणी का ठेऊ नये?
अस्वच्छ स्वयंपाकघर कुटुंबातील सदस्यांवर नकारात्मक परिणाम करते. कधीकधी, जाणूनबुजून किंवा नकळत स्वयंपाकघराबाबत अशा काही चुका होतात ज्याचा कुटुंबातील सदस्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनावर गंभीर परिणाम होतो. त्यामुळे वास्तूशास्त्रात याबाबत अनेक नियम पाळण्यास सांगण्यात आले आहे. त्यातील एक म्हणजे मीठ आणि लाल तिखट स्वयंपाकघरात एकाच ठिकाणी ठेऊ नये. होय, अनेकांना हे माहित नसेल की, स्वयंपाकघरात मीठ आणि तिखट एकाच ठिकाणी ठेवले तर त्याचे नकारात्मक परिणाम होतात असं म्हटलं जातं.
मीठ साठवण्यासाठी वास्तू नियम
मीठ साठवताना वास्तू नियमांचे पालन करणे आवश्यक मानले जाते. मीठाच्या योग्य साठवणुकीमुळे घरात नकारात्मक उर्जेचा प्रभाव कमी होतो. मीठ हे नेहमीच काचेच्या भांड्यात साठवले पाहिजे असे म्हटले जाते. असे केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते. तथापि, लोखंड, प्लास्टिक किंवा इतर धातूच्या भांड्यात मीठ साठवणे अशुभ मानले जाते. असे केल्याने कुटुंबावर समस्या आणि आर्थिक अडचणी येऊ शकतात.
शेजाऱ्यांना किंवा कोणालाही मीठ देताना ते हातावर देऊ नका
वास्तुनुसार, दुसऱ्याच्या घरून मीठ कधीही घेऊ नये. असे केल्याने आर्थिक अडचणी येतात असं म्हटलं जातं. तसेच, मिठाचा डबा कधीही रिकामा ठेवू नये. जेव्हा मीठ संपत आलं की लगेच तो डबा भरून ठेवा. मिठाचा डबा पूर्णपणे खाली होईपर्यंत वाट पाहू नये. तसेच मिठाच्या डब्यात मीठ भरायचं असेल तर ते शुक्रवारी भरणे कधीही योग्य मानले जाते. यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर राहते आणि सकारात्मक उर्जेचा प्रवाह कायम राहतो.
मीठ, साखर आणि मिरची एकत्र ठेवू नका.
वास्तुशास्त्रात म्हटल्याप्रमाणे स्वयंपाकघरात मीठ, साखर आणि मिरची एकत्र मसाल्या डब्यात ठेवू नये कारण त्यामुळे कुटुंबात भांडणे आणि कटकट होते. हे तिन्ही पदार्थ नेहमी वेगवेगळ्या डब्यात ठेवावेत. मीठ, मिरची आणि साखर एकाच डब्यात ठेवल्याने गरिबी येते आणि कुटुंबातील सदस्यांवरही नकारात्मक परिणाम होतो. बहुतेक घरांमध्ये मीठ आणि मिरची एकाच डब्यात ठेवली जाते, जी पूर्णपणे चुकीची आहे. नेहमी लक्षात ठेवा की मीठ, मिरची आणि साखर वेगवेगळ्या डब्यात ठेवावी.
स्वयंपाकघरात हळद अशी साठवावी?
हळद स्वयंपाकातला महत्त्वाचा घटक आहे. ती घरातील शुभ, समृद्धी आणि शांतीचे प्रतीक मानली जाते. म्हणून हळद स्वयंपाकघरात जेवणाची चव वाढवण्यासाठी नाही तर घरातील सकारात्मकता जपण्यासाठी देखील महत्त्वाची मानली जाते. मिठाच्या भांड्याप्रमाणे, हळदीचे भांडे कधीही रिकामे ठेवू नये
हळदीच्या भांड्यात एक नाणे आणि तीन लवंगा का ठेवाव्यात
हळदीच्या भांड्यात एक नाणे आणि तीन लवंगा ठेवणे खूप फायदेशीर मानले जाते. वास्तुनुसार, हळद गुरु ग्रहाचे प्रतीक आहे, नाणे देवी लक्ष्मीचे प्रतीक आहे आणि लवंगा संपत्तीचे प्रतीक आहे. असे मानले जाते की जर हे तिघे एकत्र ठेवले तर घरात कधीही संपत्ती आणि आनंदाची कमतरता भासणार नाही.
