Chanakya Niti : निरोगी राहण्यासाठी या गोष्टींचे पालन करा, चाणक्य नीति काय सांगते जाणून घ्या

आरोग्य ही मानवी जीवनाची सर्वात मोठी गुरुकिल्ली आहे. जर एखादी व्यक्ती निरोगी असेल तर तो कोणत्याही समस्येशी लढू शकतो. म्हणूनच असे म्हटले जाते की आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे. चांगले आरोग्य आपल्या आहारावर बरेच अवलंबून असते. चाणक्य नीतिनुसार निरोगी राहण्यासाठी कोणत्या गोष्टींचे पालन केले पाहिजे हे जाणून घ्या

Chanakya Niti : निरोगी राहण्यासाठी या गोष्टींचे पालन करा, चाणक्य नीति काय सांगते जाणून घ्या
अपमान- चाणक्य नीतीनुसार, जर कोणी तुमचा अपमान केला असेल तर तो स्वतःकडेच ठेवावा. त्याबद्दल इतरांना सांगितल्याने त्या लोकांचा तुमच्याबद्दलचा आदर कमी होईल.
Follow us
| Updated on: Aug 02, 2021 | 8:09 AM

मुंबई : आचार्य चाणक्य हे त्यांच्या काळात एक महान विद्वान होते. त्याच्या रणनीतीला, मुत्सद्देगिरी सर्वोत्तम होती. चाणक्य एक चांगले शिक्षक होते. तक्षशिला येथे त्यांनी अनेक वर्षे अर्थशास्त्र शिकवले. त्यांनी अर्थशास्त्र आणि नैतिकतेसह अनेक ग्रंथ लिहिले आहेत. आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीतिशास्त्र पुस्तकात जीवनातील प्रत्येक स्वरुपाबद्दल सांगितले आहे (Acharya Chanakya Advise Some Things For Healthy Life In Chanakya Niti).

आजही लोकांना ही धोरणे वाचायला आवडतात. नीति ग्रंथात लिहिलेल्या गोष्टींचे पालन केल्याने एखाद्याला यश मिळते. ते म्हणाले की, आरोग्य ही मानवी जीवनाची सर्वात मोठी गुरुकिल्ली आहे. जर एखादी व्यक्ती निरोगी असेल तर तो कोणत्याही समस्येशी लढू शकतो. म्हणूनच असे म्हटले जाते की आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे. चांगले आरोग्य आपल्या आहारावर बरेच अवलंबून असते. चाणक्य नीतिनुसार निरोगी राहण्यासाठी कोणत्या गोष्टींचे पालन केले पाहिजे हे जाणून घ्या –

अजीर्णे भेषजं वारि जीर्णे वारि बलप्रदम्। भोजने चामृतं वारि भोजनान्ते विषप्रदम्।।

आचार्य चाणक्य यांच्या मते अन्न न पचल्यावर प्यालेले पाणी औषधासारखे आहे. जेवण केल्यानंतर 1 ते 2 तास पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. चाणक्य म्हणतात की जेवणादरम्यान थोडे पाणी पिणे अमृतासारखे आहे. जेवण झाल्यावर लगेच पाणी पिणे हे विषासारखे आहे.

चूर्ण दश गुणो अन्न ते, ता दश गुण पय जान। पय से अठगुण मांस ते तेहि दशगुण घृत मान॥

आचार्य चाणक्य या श्लोकात म्हणतात की कच्च्या धान्यापेक्षा धान्याचं पीठ अधिक फायदेशीर आहे. धान्याच्या पीठापेक्षा दूध अधिक फायदेशीर आहे. मांस दुधापेक्षा 10 पट अधिक पौष्टिक आहे आणि तूप त्यापेक्षा 10 पट अधिक फायदेशीर आहे.

गुरच औषधि सुखन में भोजन कहो प्रमान। चक्षु इंद्रिय सब अंश में, शिर प्रधान भी जान॥

चाणक्य म्हणतात की गिलोयमध्ये सर्व प्रकारचे औषधी गुणधर्म आहेत. त्याचप्रमाणे अन्नापेक्षा मोठा आनंद नाही. त्याचप्रमाणे, शरीराच्या सर्व इंद्रियांमध्ये डोळे प्रधान आहेत, तर मेंदू सर्व डोळ्यांमध्ये प्रमुख असतो.

चाणक्य यांच्या मते, चांगल्या आरोग्यासाठी आणि आजारांपासून दूर राहण्यासाठी आठवड्यातून एकदा मालिश केली पाहिजे. यामुळे रोम छिद्र उघडतात आणि आतली घाण बाहेर येते. मालिश केल्यानंतर आंघोळ करणे आवश्यक आहे.

Acharya Chanakya Advise Some Things For Healthy Life In Chanakya Niti

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Chanakya Niti | आचार्य चाणक्य यांच्या या 5 गोष्टी लक्षात ठेवा, कधीही आर्थिक चणचण भासणार नाही

Chanakya Niti | या 3 गोष्टींपासून नेहमी दूर रहा, अन्यथा इतरांच्या निंदेस पात्र ठराल

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.