AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti | या 4 जणांपुढे कधीही पैशांबाबत बोलू नये, अन्यथा आपण मोठ्या संकटात पडू शकता

आचार्य चाणक्य यांनी संपत्ती (Acharya Chanakya), पैसा याला आयुष्यासाठी अत्यंत महत्वाची गोष्ट मानली आहे आणि ती खरी मित्र म्हणून साठवण्याचा सल्लाही दिला आहे. आचार्य यांचा असा विश्वास होता की तुमच्याकडे पैसे असल्यास आपण सर्वात मोठे आव्हानदेखील सहज पार करु शकतो. परंतु त्यांनी पैशांविषयीच्या गोष्टी गोपनिय ठेवण्यास सांगितले आहे

Chanakya Niti | या 4 जणांपुढे कधीही पैशांबाबत बोलू नये, अन्यथा आपण मोठ्या संकटात पडू शकता
Acharya_Chanakya
| Edited By: | Updated on: Jul 09, 2021 | 7:09 AM
Share

मुंबई : आचार्य चाणक्य यांनी संपत्ती (Acharya Chanakya), पैसा याला आयुष्यासाठी अत्यंत महत्वाची गोष्ट मानली आहे आणि ती खरी मित्र म्हणून साठवण्याचा सल्लाही दिला आहे. आचार्य यांचा असा विश्वास होता की तुमच्याकडे पैसे असल्यास आपण सर्वात मोठे आव्हानदेखील सहज पार करु शकतो. परंतु त्यांनी पैशांविषयीच्या गोष्टी गोपनिय ठेवण्यास सांगितले आहे (Acharya Chanakya said never talk about money in front of these four types of people will fall you in trouble in chanakya niti).

कधीही सर्वांसमोर पैशांविषयी बोलू नये, असे आचार्यांचा म्हणतात. आचार्य यांनी चाणक्य नीति या ग्रंथात लिहिले आहे की, विशेषत: चार लोकांसमोर कधीही पैसे आणि व्यवसायाबद्दल बोलू नये, अन्यथा आपण अडचणीत येऊ शकता. जाणून घ्या ते चार जण कोण –

लोभी व्यक्ती –

लोभी व्यक्तीचा भरवसा नसतो. तो जिथे जाईल तेथे लोभाच्या नजरेने सर्व काही पाहतो. असे लोक आपली फसवणूक करु शकतात, ज्यामुळे आपल्याला मोठे नुकसान सहन करावे लागेल. म्हणून, लोभी लोकांसमोर कधीही पैशांविषयी आणि व्यवसायाबद्दल बोलू नका.

ईर्ष्या करणारा –

ज्याला आपल्याबद्दल हेवा वाटतो त्याला नेहमीच आपल्याला खाली ओढायचे असते. कारण, तो तुम्हाला आनंदी पाहू शकत नाही. म्हणून, अशा लोकांसमोर खूप सावधगिरी बाळगा आणि पैशांविषयी आणि व्यवसायाबद्दल बोलू नका. अन्यथा आपलेही मोठे नुकसान होऊ शकते.

व्यवसायातील आपला प्रतिस्पर्धी –

जर आपण व्यवसायात आपल्या प्रतिस्पर्धी असलेल्या व्यक्तीसमोर पैसे किंवा व्यवसायाबद्दल बोलले तर तो आपले नुकसान करु शकतो. आपल्या विरुद्ध आपल्या सर्व योजना आणि गुप्त रणनीति आपल्याचविरोधात वापर शकतो.

भोळे लोक –

काही लोक अगदी साधे आणि भोळे असतात. निर्दोष लोकांना कोणासमोर काय बोलायचे हे कळत नाही. अशा लोकांसमोर आपण पैशांविषयी आणि व्यवसायाबद्दल बोलल्यास ते आपल्या गुप्त गोष्टी इतरांनाही सांगू शकतात. यामुळे तुम्हाला त्रास सहन करावा लागू शकतो.

Acharya Chanakya said never talk about money in front of these four types of people will fall you in trouble in chanakya niti

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Chanakya Niti | नोकरी आणि व्यवसायात यशस्वी व्हायचं असेल तर या चार गोष्टी लक्षात ठेवा

Chanakya Niti : या 6 परिस्थितीत कितीही काही केलं तरी माणूस दु:खी असतोच…!

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.