Chanakya Niti | राजा आणि ब्राह्मणाइतकीच शक्तिशाली असते स्त्री, जाणून घ्या आचार्य चाणक्य काय सांगतात

आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) हे केवळ मुत्सद्दी, राजकारणी आणि अर्थशास्त्रज्ञ नव्हते तर त्यांना सामाजिक विषयांचेही बरेच ज्ञान होते. आचार्य यांनी आपले आयुष्य मोठ्या संकटांत व्यतीत केले होते.

Chanakya Niti | राजा आणि ब्राह्मणाइतकीच शक्तिशाली असते स्त्री, जाणून घ्या आचार्य चाणक्य काय सांगतात
Acharya-Chanakya

मुंबई : आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) हे केवळ मुत्सद्दी, राजकारणी आणि अर्थशास्त्रज्ञ नव्हते तर त्यांना सामाजिक विषयांचेही बरेच ज्ञान होते. आचार्य यांनी आपले आयुष्य मोठ्या संकटांत व्यतीत केले होते. यावेळी त्यांनी प्रत्येक परिस्थितीचा अगदी जवळून अभ्यास केला आणि आयुष्यभर ते लोकांचे कल्याण करत राहिले. आचार्य यांनी सांगितलेल्या मार्गावरुनही, एखादी व्यक्ती सर्व अडचणींवर सहजपणे मात करु शकते (Acharya Chanakya Said Women Are Equally Powerful Like King And A Brahmin In Chanakya Niti).

आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या चाणक्य नीति या ग्रथांत राजा, विद्वान आणि ब्राह्मणासोबतच स्त्रीच्या सामर्थ्याचेही वर्णन केले आहे. चाणक्य नीतिच्या सातव्या अध्यायातील अकराव्या श्लोकात ते असे म्हणतात की स्त्रिया आपल्या शक्तीचा योग्य वापर करुन आपल्या इच्छेनुसार काहीही करु शकतात आणि कोणाकडूनही काहीही करवून घेऊ शकतात. चाणक्य नीति काय म्हणते ते जाणून घेऊया.

बाहुवीर्य बलं राज्ञो ब्रह्मवित् बली
रूप-यौवन-माधुर्य स्त्रीणां बलमनुत्तमम्

या श्लोकाद्वारे आचार्य चाणक्य म्हणतात की राजाची शक्ती त्याच्या हातात असते. ब्राह्मणाची शक्ती त्याच्या ज्ञानात असते आणि स्त्रीची शक्ती तिचं सौंदर्य आणि गोड बोलण्यात असते.

या श्लोकाद्वारे आचार्य यांचे म्हणणे आहे की राजाचे कार्य प्रजेचे रक्षण करणे आहे. अशा परिस्थितीत राजाचं बाहुबली असणे फार महत्वाचे आहे. जेव्हा एखादा राजा बाहुबली असतो तेव्हा त्याच्याबरोबर इतर सैन्य आपोआप सामील होतात आणि त्याची शक्ती वाढते. अशा राजाला आपले लोक आणि शत्रू दोघांना कसे हाताळायचे ते माहित असते.

त्यावेळी, एक ब्राह्मण त्याच्या ज्ञानाने ओळखला जातो. हे ज्ञान ही त्याची खरी शक्ती असते. ज्या ब्राम्हणाला ज्ञान आहे, त्याला समाजात खूप आदर आणि सन्मान मिळतोच. तसेच आपल्या बुद्धिमत्तेच्या कौशल्याने तो कोणालाही धडा शिकवू शकतो.

त्याशिवाय, स्त्रीची शक्ती ही राजा आणि ब्राह्मणपेक्षा कमी नाही, असे आचार्य मानतात. स्त्रीचे सौंदर्य आणि मधूर वाणी हे तिचे सामर्थ्य आहे. यांच्याजोरावर एखादी स्त्री काहीही करु शकते आणि कोणाकडूनही काहीही करवून घेऊ शकते.

Acharya Chanakya Said Women Are Equally Powerful Like King And A Brahmin In Chanakya Niti

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Chanakya Niti | या चार व्यक्ती असतात पितृतुल्य, कधीही दुखवू नका, जाणून घ्या चौघांबद्दल

Chanakya Niti : या 4 गोष्टींची ज्याला ‘ओढ’, त्याच्याकडून प्रेम, दया आणि इमानदारीची अपेक्षा करणं व्यर्थ!