AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : या 4 गोष्टींची ज्याला ‘ओढ’, त्याच्याकडून प्रेम, दया आणि इमानदारीची अपेक्षा करणं व्यर्थ!

आचार्य चाणाक्य यांनी अशा चार गोष्टी सांगितल्या आहेत, ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीला या गोष्टींचं वेड लागल्यास त्या व्यक्तीकडून प्रेम, दया, प्रामाणिकपणाची अपेक्षा करणे निरर्थक ठरतं. (Chanakya Niti)

Chanakya Niti : या 4 गोष्टींची ज्याला 'ओढ', त्याच्याकडून प्रेम, दया आणि इमानदारीची अपेक्षा करणं व्यर्थ!
Acharya-Chanakya
| Updated on: May 23, 2021 | 7:12 AM
Share

मुंबई :  आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) यांचं आयुष्य संघर्षांनी भरलेलं होते पण त्यांनी कोणत्याही परिस्थितीत स्वत: ला विचलित होऊ दिले नाही. धैर्याने योग्य वेळेची वाट पाहिली, संधी निवडल्या आणि योग्य नीतीने आपलं कार्य केले… अशी उदाहरणं लोकांसमोर मांडली की एक यशस्वी राजकारणी, रणनीतिकार आणि अर्थशास्त्रज्ञ म्हणून ते शेवटी गणले गेले. आचार्य चाणक्य नेहमीच आपले अनुभव आणि ज्ञान इतरांना सांगत असत. (Chanakya Niti To Expect Honesty Love Kindness Those Who Attachment With These 4 things)

आचार्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती या पुस्तकात ग्रहस्थ जीवन, स्त्री-पुरुष, निती, धर्म या विषयावर आपले विचार मांडले आहेत. जे त्यांचे विचार आज मानवाला समस्या काळात मार्गदर्शन ठरतात. आचार्य चाणाक्य यांनी अशा चार गोष्टी सांगितल्या आहेत, ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीला या गोष्टींचं वेड लागल्यास त्या व्यक्तीकडून प्रेम, दया, प्रामाणिकपणाची अपेक्षा करणे निरर्थक ठरतं. त्या चार गोष्टी काय आहेत त्या जाणून घ्या…

मांसाहार

आचार्य चाणक्य यांचा असा विश्वास होता की जो माणूस मांसाहार करतो, त्याच्यातली करुणा निघून जाते. कारण तो जीवंत प्राण्याला मारुन त्यांचं मांस आपल्या आहारात समावेश करतो.अशा व्यक्तीकडून दया अपेक्षित नसते.

धन

ज्या माणसाकडे पैशाचा लोभ आहे तो कधीही प्रामाणिकपणे काम करू शकत नाही. अशा व्यक्ती सर्वत्र पैसे मिळविण्याचा प्रयत्न करीत असतात. असे लोक विश्वासार्ह नसतात. त्यांच्याकडून प्रामाणिकपणाची अपेक्षा करणे निरर्थक आहे.

स्त्री

ज्या व्यक्तीला नेहमीच स्त्रीबद्दल रस असतो, त्यास कामभावनेची सदासर्वदा तीव्र इच्छा असते. अशा व्यक्तीमध्ये पवित्रता किंवा प्रेमाची समज… अशा लोकांकडून प्रेमाची अपेक्षा करणे मूर्खपणाचे आहे.

कुटुंब

कुटुंब आणि घरामध्ये दंग व्यक्ती कधीही अपार ज्ञान मिळवू शकत नाही. जर तुम्हाला अपार ज्ञान कमवायचं असेल तर आपणास आपल्या कुटूंबापासून दूर राहून शिकावं लागेल.

(Chanakya Niti To Expect Honesty Love Kindness Those Who Attachment With These 4 things)

हे ही वाचा :

Zodiac Signs | या 4 राशींचे लोक असतात अत्यंत संवेदनशील, लहान-लहान गोष्टींवरुनही चिंतेत पडतात

Chanakya Niti | असे आई-वडील मुलांचे सर्वात मोठे शत्रू असतात, जाणून घ्या आचार्य चाणक्य काय सांगतात…

स्वप्नात या गोष्टी पाहिल्या असतील तर समजून जा लवकरच घरी देवी लक्ष्मीचं आगमन होणार, स्वप्नशास्त्र काय सांगते…

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.