AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Akshaya Tritiya 2021 | कधी आहे अक्षय्य? तृतीया, या दिवशी सोने खरेदी करणे का मानलं जातं शुभ, जाणून घ्या अक्षय्य तृतीयेची पौराणिक कहाणी

हिंदू धर्मात अक्षय्य तृतीयेचा दिवस खूप शुभ मानला जातो (Akshaya Tritiya 2021). या दिवशी बरीच शुभ कामे केली जातात. हिंदू पंचगानुसार वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाची तृतीया तिथी साजरी केली जाते.

Akshaya Tritiya 2021 | कधी आहे अक्षय्य? तृतीया, या दिवशी सोने खरेदी करणे का मानलं जातं शुभ, जाणून घ्या अक्षय्य तृतीयेची पौराणिक कहाणी
akshaya-tritiya
| Updated on: May 14, 2021 | 8:56 AM
Share

मुंबई : हिंदू धर्मात अक्षय्य तृतीयेचा दिवस खूप शुभ मानला जातो (Akshaya Tritiya 2021). या दिवशी बरीच शुभ कामे केली जातात. हिंदू पंचगानुसार वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाची तृतीया तिथी साजरी केली जाते. या दिवशी दान-पुण्य करण्याचे विशेष महत्त्व आहे. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी विवाह, गृह प्रवेश, धार्मिक विधी करणे शुभ मानले जाते. या दिवशी सोने खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. असा विश्वास आहे की या दिवशी सोने खरेदी केल्याने प्रगती होते. यावेळी अक्षय्य तृतीया 14 मे 2021 रोजी आहे. चला या दिवसाशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टींबद्दल जाणून घेऊया (Akshaya Tritiya 2021 Know The Shubh Muhurat And Story Of This Festival) –

अक्षय्य तृतीया शुभ काळ

अक्षय्य तृतीयाची सुरुवात – 14 मे 2021 रोजी 05 वाजून 38 मिनिटांपासून

अक्षय्य तृतीयाचा समाप्त – 15 मे 2021 रोजी ते 7 वाजून 59 मिनिटांपर्यंत

पूजेचा शुभ मुहूर्त – पहाटे 5 वाजून 38 पासून दुपारी 12 वाजून 18 मिनिटांपर्यंत

महत्त्व

अक्षय्य तृतीयेला साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानलं जाते. या दिवशी अनेक शुभ कार्य केली जातात. या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. या दिवशी विधीवत पूजा केल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. परशुरामांचा जन्मही याच शुभदिनी झाला होता. शास्त्रानुसार या दिवशी पूर्वजांना अर्पण करणे खूप फायदेशीर मानले जाते.

पौराणिक कथा

पुराणिक आख्यायिकेनुसार, या दिवशी सुदामा आपल्या बालपणाचा मित्र श्रीकृष्णाच्या घरी आपल्या कुटुंबासाठी आर्थिक मदत मागितली. श्रीकृष्णासाठी भेट म्हणून सुदामा मूठभर पोहे घेऊन गेला. पण सुदामाला ते पोहे श्रीकृष्णाला देण्यास संकोच वाटला. पण कृष्णाने मूठभर पोहे खाल्ले आणि आपला मित्र सुदामाचा आदर-सत्कार केला.

कृष्णाने केलेला सम्नान पाहून सुदामाला खूप आनंद झाला आणि कृष्णाला आर्थिक मदतीबद्दल न विचारताच तो त्याच्या घरुन निघून गेला. सुदामा त्याच्या घरी पोहोचल्यानंतर स्तब्ध झाला. त्याच्या लक्षात आले की जुन्या झोपडीऐवजी तेथे एक भव्य राजवाडा आहे आणि पत्नी आणि मुलांनी नवीन कपडे आणि दागिने घातले आहेत. हे सर्व श्रीकृष्णाचे आशीर्वाद असल्याचे सुदामाला समजले. तेव्हापासून अक्षय्य तृतीयेचा दिवस हा संपत्ती, सुख आणि समृद्धीच्या रुपात साजरा केला जातो.

Akshaya Tritiya 2021 Know The Shubh Muhurat And Story Of This Festival

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

पूजेमध्ये वापरण्यात येणार्‍या ‘या’ 4 गोष्टी कधीही शिळ्या होत नाहीत, जाणून घ्या यामागील कारण

Lord Shanidev | शनिदेवांच्या प्रकोपापासून वाचायचं असेल तर दशरथकृत शनिस्तोत्राचं पठण करा, जाणून घ्या याबाबतची माहिती

Turtle Ring | ‘या’ चार राशीच्या लोकांनी चुकूनही कासवाची अंगठी घालू नये, अन्यथा भोगावे लागतील दुष्परिणाम

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...