Astro Tips: पर्समध्ये ‘या’ गोष्टी ठेवल्यामुळे आर्थिक चणचण भासू शकते…
dont keep this thigs in your purse: ज्योतिषशास्त्रानुसार, काही गोष्टी अशा आहेत ज्या नकारात्मक उर्जेचे कारण मानल्या जातात. जर तुम्ही या गोष्टी तुमच्या पर्समध्ये ठेवल्या तर नकारात्मक उर्जेच्या प्रभावामुळे तुमचे उत्पन्न कमी होतेच पण तुमच्या प्रगतीमध्ये देखील अडथळा येतो. चला, जाणून घेऊया कोणत्या गोष्टी पर्समध्ये ठेवू नयेत.

ज्योतिषशास्त्रानुसार, तुमच्या आजूबाजूला ज्या उर्जा असतात त्याचा प्रभाव तुमच्या जीवनावर पडतो. शास्त्रानुसार प्रत्येक गोष्टीमध्ये एक प्रकारची उर्जा असते ही उर्जा सकारात्मक किंवा नकारात्मक असू शकते. तुमच्या पैंकी अनेकजण वस्तू ठेवण्यासाठी पर्सचा वापर करतात. महिलांच्या पर्समध्ये तुम्हाला अनेक वस्तू पाहायला मिळतात. परंतु काही अशा वस्तू आहेत ज्या तुमच्या पर्समध्ये ठेवल्यामुळे त्याचा तुमच्या आयुष्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. पर्समध्या या वस्तू ठेवल्यामुळे तुमच्या महत्त्वाच्या कामांमध्ये अडथळे निर्माण होतात. त्यासोबतच तुमच्या घरातील सदस्यांमधील मतभेद वाढण्याची शक्यता आहे.
पर्समध्ये या गोष्टी ठेवल्यामुळे तुमची प्रगती थांबते आणि तुमच्या मनामध्ये नकारात्मक विचार निर्माण होण्यास सुरूवात होते. चला तर जाणून घेऊया पर्समध्ये कोणत्या वस्तू ठेवू नयेत. अनेकांना फाटलेल्या किंवा खराब झालेल्या नोटा पर्सच्या खिशात ठेवण्याची आणि त्या विसरण्याची सवय असते. अर्थात, बाजारात या नोटा कोणताही दुकानदार घेत नाही, म्हणूनच लोक वर्षानुवर्षे या नोटा त्यांच्या पाकिटात ठेवतात, परंतु असे केल्यामुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि तुमचं आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते.
शास्त्रानुसार, जुनी बिले, पावत्या आणि पैसे भरलेले कागदपत्रे पर्समध्ये ठेवल्याने पैशाची कमतरता आणि आर्थिक अडचणी येऊ शकतात. जुने बिल्स आणि पावत्या पर्समध्ये ठेल्यामुळे नकारात्मक ऊर्जा आकर्षित करते आणि जीवनात अनावश्यक खर्च वाढवते. या गोष्टी टाळण्यासाठी, आर्थिक स्थिती चांगली राहण्यासाठी वेळोवेळी या गोष्टी पर्समधून काढणे आवश्यक आहे. सहसा लोक त्यांच्या मृत नातेवाईकांचे फोटो त्यांच्या पर्समध्ये ठेवतात. त्यांच्या आठवणी जपणे चुकीचे नाही पण त्यांचे फोटो घरामध्ये ठेवणे योग्य मानले जाते. विशेषतः, तुम्ही मृत नातेवाईकांचे फोटो घराच्या दक्षिण दिशेला ठेवू शकता परंतु मृत नातेवाईकांचे फोटो तुमच्या पर्समध्ये ठेवू नका. शास्त्रानुसार, यामुळे तुम्हाला आर्थिक नुकसानाची समस्या होऊ शकतात. जुनी नाणी आणि नोटा घरात ठेवू नयेत. तुमच्या पर्समध्ये बंद झालेले किंवा बाजारात चलत नसलेले चलन ठेवल्याने तुमचे आर्थिक नुकसानच होईल. या गोष्टींमुळे तुमच्या आयुष्यामध्ये नकारात्मक उर्जा वाढते. अशी नाणी आणि नोटा तुमच्या पर्समध्ये ठेवणे देखील तुमच्या यशात अडथळा आणू शकते.
पहिली गोष्ट म्हणजे पर्स किंवा चामड्यापासून बनवलेली इतर कोणतीही वस्तू आयुष्यात वापरू नये. प्राण्यांच्या संरक्षणासाठी, चामड्याच्या व्यापाराला कोणत्याही प्रकारे प्रोत्साहन देऊ नये. शास्त्रात चामड्याला नकारात्मक उर्जेचा स्रोत मानले जाते. त्याच वेळी, चामड्याच्या पर्समध्ये देवी-देवतांचे फोटो ठेवल्याने आर्थिक नुकसान होण्याची शक्यता अनेक पटींनी वाढू शकते. तुमच्या घरातील आर्थिक चणचण दूर करण्यासाठी तुम्ही पर्समध्ये लक्ष्मी देवीचा फोटो, श्री यंत्र आणि अक्षता ठेवू शकता. या वस्तू ठेवल्यामुळे तुमच्या घरातील आर्थिक परिस्थिती सुधारते आणि घरातील सदस्यांमधील मतभेद कमी होण्यास मदत होते.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
