AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : तोंडावर गोड बोलणाऱ्या लोकांपासून सावध रहा! तुमचे संपूर्ण आयुष्य करू शकतात उध्वस्त

प्रत्येक व्यक्तीने अशा लोकांशी अत्यंत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. अशा लोकांवर कधीही विश्वास ठेवू नका कारण ते कधीही तुमचे हितचिंतक होऊ शकत नाहीत. तुमच्या तोंडावर स्तुती करून, ते फक्त तुमचे प्लान जाणून घेण्याचा प्रयत्न करतात.

Chanakya Niti : तोंडावर गोड बोलणाऱ्या लोकांपासून सावध रहा! तुमचे संपूर्ण आयुष्य करू शकतात उध्वस्त
तोंडावर गोड बोलणाऱ्या लोकांपासून सावध रहा! तुमचे संपूर्ण आयुष्य करू शकतात उध्वस्त
| Edited By: | Updated on: Oct 25, 2021 | 3:57 PM
Share

मुंबई : जर तुम्हाला तुमचे खरे हितचिंतक जीवनात सापडले तर तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होतात कारण अशी व्यक्ती नेहमी तुमच्या भल्याचा विचार करते. तो तुमच्याशी मित्र, भाऊ, वडील, बहीण, आई इत्यादी कोणत्याही रूपात जोडलेला असला, तरी अशी व्यक्ती तुमचा शुभचिंतक असल्यामुळे तुम्हाला कधीही चुकीच्या मार्गावर जाऊ देत नाही. दुसरीकडे, जर एका चुकीच्या व्यक्तीचा सहवास तुमचे संपूर्ण आयुष्य उध्वस्त करू शकतो. तो तुम्हाला योग्य मार्गावरून चुकीच्या बाजूला नेऊ शकतो आणि जीवनात अनेक संकटे आणू शकतो. (Beware of sweet talkers, Your whole life can be devastating)

पण कोणती व्यक्ती बरोबर आहे आणि कोणती चूक याची चाचणी कशी करावी हे प्रत्येकालाच माहीत नसते. काही लोक वारंवार फसवूनही विश्वास ठेवण्याची चूक करतात. जर तुमच्या बाबतीतही असे असेल तर तुम्ही चाणक्य नीति अवश्य वाचा. आचार्य चाणक्य यांनी नीति शास्त्रामध्ये प्रत्येक प्रकारचे नाते आणि जीवनाशी संबंधित विविध पैलू जसे की चांगले वाईट लोक इत्यादींचा उल्लेख केला आहे. अतिशय गोड बोलणाऱ्या व्यक्तीच्या संदर्भात आचार्यांनी लिहिले आहे की-

परोक्षे कार्य्यहन्तारं प्रत्यक्षे प्रियवादिनम् वर्ज्जयेत्तादृशं मित्रं विषकुम्भम्पयोमुखम्’

या श्लोकाचा अर्थ असा आहे की अशा लोकांपासून सावध राहावे जे तुमच्या तोंडावर गोड बोलतात, पण तुमच्या पाठीमागे तुमचे वाईट करतात. असे लोक एका घागरीसारखे असतात ज्यात वरचा भाग दुधाने भरलेला असतो आणि आत विष.

तुमचे आयुष्य उद्धवस्त करु शकतात गोडबोल्या व्यक्ती

आचार्यांच्या या गोष्टीकडे लक्ष दिल्यास असे अनेक लोक तुमच्या मनात येतील जे तुमच्या तोंडावर चांगले बोलत असतील, तुमची स्तुती करत असतील, तर तुमच्या पाठीमागे तुमचे वाईट करण्याची एकही संधी सोडणार नाहीत. प्रत्येक व्यक्तीने अशा लोकांशी अत्यंत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. अशा लोकांवर कधीही विश्वास ठेवू नका कारण ते कधीही तुमचे हितचिंतक होऊ शकत नाहीत. तुमच्या तोंडावर स्तुती करून, ते फक्त तुमचे प्लान जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. त्यानंतर ते तुमची प्रतिमा डागाळतात आणि तुमच्या विरोधात कट रचतात. हे लोक तुमचे संपूर्ण आयुष्य उध्वस्त करू शकतात. अशा लोकांना समजून घेतल्यानंतरही जर तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवण्याची चूक करत असाल तर तुम्ही अडचणीत येण्याची खात्री आहे. अशा लोकांपासून नेहमी अंतर ठेवावे. (Beware of sweet talkers, Your whole life can be devastating)

इतर बातम्या

Diwali 2021 | दिवाळीला विष्णूशिवाय देवी लक्ष्मीची पूजा का केली जाते, जाणून घ्या

Dhanteras 2021 | धनत्रयोदशीच्या पूजेत हे उपाय केल्याने आरोग्य आणि समृद्धी लाभेल

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.