AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bhanu Saptami 2025: भानु सप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाची पूजा करण्याची पद्धत जाणून घ्या….

Bhanu Saptami 2025: सनातन धर्मात भानु सप्तमीला विशेष मानले जाते. असे म्हटले जाते की या दिवशी सूर्य देवाची पूजा आणि उपवास केल्याने व्यक्तीच्या कुंडलीत सूर्य ग्रहाची स्थिती मजबूत होते, ज्यामुळे व्यक्तीला प्रत्येक कामात यश मिळते.

Bhanu Saptami 2025: भानु सप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाची पूजा करण्याची पद्धत जाणून घ्या....
भानु सप्तमीImage Credit source: TV9 Network
| Edited By: | Updated on: Apr 20, 2025 | 3:26 PM
Share

हिंदू धर्मामध्ये सूर्य देवाची पूजा केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार, सूर्य देवाची पूजा केल्यामुळे तुमच्यावर त्यांचा आशिर्वाद प्राप्त होतो. त्यासोबतच तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होण्यास मदत होते. भानु सप्तमीचा उपवास सूर्य देवाला समर्पित आहे. याला रथ सप्तमी असेही म्हणतात. शास्त्रांनुसार, सूर्य देवाला प्रसन्न करण्यासाठी हा दिवस खूप चांगला मानला जातो. असे मानले जाते की या दिवशी विधीनुसार सूर्यदेवाची पूजा केल्याने आणि उपवास केल्याने व्यक्तीला सूर्यदेवाचा आशीर्वाद मिळतो, ज्यामुळे समाजात आदरही वाढतो. रविवार हा सूर्यदेवाला समर्पित मानला जातो. अशा परिस्थितीत, यावेळी रविवारी येणाऱ्या भानु सप्तमीचे महत्त्व आणखी वाढले आहे.

पंचांगानुसार, या वर्षी शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी 19 एप्रिल रोजी संध्याकाळी 6:21 वाजता सुरू होईल आणि 20 एप्रिल रोजी संध्याकाळी 7 वाजता संपेल. उदय तिथीनुसार, 20 एप्रिल 2025 रोजी भानु सप्तमी साजरी केली जाईल. हिंदू धर्मामध्ये आठवड्यातील प्रत्येक दिवस देवाला समर्पित केला जातो. रविवारी सूर्य देवाची पूजा केल्यामुळे तुमच्या जीवनामधील अडथळे दूर होण्यास मदत होते. त्यासोबतच तुमच्या शरीरामध्ये दिवसभर उर्जा निर्माण होते.

भानु सप्तमीच्या दिवशी पूजा करण्यासाठी ब्रह्म मुहूर्तावर स्नान करावे. त्यानंतर, एका भांड्यात पाणी, गूळ, रोळी, लाल फुले आणि गंगाजल घाला आणि उगवत्या सूर्याला अर्घ्य अर्पण करा. भगवान सूर्याचे वैदिक मंत्र जप करा आणि चालीसा पठण करा. या दिवशी गंगा नदीत स्नान करण्याची प्रथा देखील आहे. यानंतर, सूर्यदेवाच्या आरतीने पूजा संपवा.

भानू सप्तमी पूजा मंत्र…..

ॐ घृणिं सूर्य्य: आदित्य: ॐ ह्रीं ह्रीं सूर्याय सहस्रकिरणराय मनोवांछित फलम् देहि देहि स्वाहा.. ॐ ऐहि सूर्य सहस्त्रांशों तेजो राशे जगत्पते, अनुकंपयेमां भक्त्या, गृहाणार्घय दिवाकर:

भानु सप्तमीला काय करावे?

गरजू व्यक्तीला गूळ आणि लाल कपडे दान करा. गाईला भाकरी आणि गूळ खायला घाला. सूर्य मंदिरात जा आणि दर्शन घ्या आणि दिवा लावा. लाल रंग सूर्यदेवाला प्रिय आहे, म्हणून लाल वस्त्रे घाला. सूर्यनमस्कार केल्याने शरीर निरोगी राहते आणि मन शांत राहते.

भानु सप्तमीचे महत्त्व… धार्मिक श्रद्धेनुसार, भानु सप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाची पूजा केल्याने आजारांपासून मुक्तता मिळते. शिवाय, आरोग्यही चांगले राहते. या दिवशी विधीनुसार उपवास आणि पूजा केल्याने सूर्यदेवाचे आशीर्वाद मिळतात. याशिवाय, जीवनातील सर्व दुःखे आणि कष्ट दूर होतात.

डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.

जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.