Bhaubeej 2021 | भावासोबतचे नाते चिरकाल टिकावं असे वाटते का?, मग आज 8 गोष्टीकडे लक्ष द्या

आज भाऊबीज दिवाळीचा शेवटचा दिवस या दिवसात बहिण तिच्या भावाला ओवाळून त्याच्या आयुष्यासाठी प्रार्थना करते. पण तुमच्या भावासोबत तुमचे नाते टिकवून ठिवण्यासाठी आज 8 गोष्टींकडे लक्ष द्या. त्यामुळे तुमच्या बहिण भावाच्या नात्यामधील गोडवा अजून टिकून राहील.

Bhaubeej 2021 | भावासोबतचे नाते चिरकाल टिकावं असे वाटते का?, मग आज 8 गोष्टीकडे लक्ष द्या
bhaubeej

मुंबई :  आज भाऊबीज दिवाळीचा शेवटचा दिवस या दिवसात बहिण तिच्या भावाला ओवाळून त्याच्या आयुष्यासाठी प्रार्थना करते. पण तुमच्या भावासोबत तुमचे नाते टिकवून ठिवण्यासाठी आज 8 गोष्टींकडे लक्ष द्या. त्यामुळे तुमच्या बहिण भावाच्या नात्यामधील गोडवा अजून टिकून राहील. भाऊबीजचा  संबंध सूर्यपुत्र यमराज आणि त्याची बहीण यमुना यांच्याशी आहे, म्हणून या दिवसाला यम द्वितीया असेही म्हणतात. हा दिवस भाऊ-बहिणीचे नाते अधिक दृढ करणारा आहे. या दिवशी बहिणीने भावाला ओवाळल्यास  त्याचे वय वाढते, असे मानले जाते.

भाऊबीज करताना या 8 नियमांचे पालन नक्की करा

1. सर्वप्रथम बहीण आणि भावाने यम आणि यम दूतांची एकत्र पूजा करावी. यानंतर बहिणीने भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करावी. यानंतर बहीणीने भावाला ओवाळावे.

2. ओवाळणी करताना भावाचे तोंड उत्तर किंवा उत्तर-पश्चिम दिशेला आणि बहिणीचे तोंड उत्तर-पूर्व किंवा पूर्व दिशेला असावे.

3. ओवाळणी केल्यानंतर भावाला नक्कीच मिठाई खाऊ घाला. भावाने आपल्या बहिणीला क्षमतेनुसार काहीतरी गिफ्ट दिलेच पाहिजे.

4. भाऊबीजेच्या दिवशी दोघांमध्ये कोणत्याही प्रकारचा वाद होऊ नये आणि एकमेकांना शिवीगाळ करू नये. तुमच्या बहिणीमध्ये काही वाद असेल तर तो सोडवा. त्यामुळे तुमचे नाते अधीक घट्ट होईल.

5. या दिवशी बहिणीने भावाला स्वतःच्या हाताने मिठाई द्यावी. बहिणीच्या हाताने जेवण करणे भावासाठी शुभ असते. या दिवशी भावानेही बहिणीच्या घरी भोजन करावे. बहिणीच्या घरी जाऊन भोजन करणे शक्य नसेल तर गायीजवळ भोजन करावे.

6. भावाने कोणतीही भेटवस्तू दिली तरी बहिणीने ती प्रेमाने स्वीकारावी. भावाच्या भेटीचा अनादर करू नका. भावानेही बहिणीला मनापासून भेटवस्तू द्याव्यात.

7. भावाला तिलक करण्यापूर्वी बहिणीने काहीही खाऊ नये. ओवाळणीनंतर उपवास सोडावा.

8. भाऊ असो वा बहीण, ओवाळणाच्या काळात कोणीही काळे कपडे घालू नयेत. शुभ कार्यात काळे कपडे घालणे शास्त्रात अशुभ मानले जाते.

इतर बातम्या :

PHOTO | Chanakya Niti : जीवनाशी संबंधित आचार्य चाणक्यांच्या ‘या’ 7 गोष्टी, जाणून घ्या याबाबत

Chitragupta Puja 2021 | भाऊबीजेला होणार कर्माचा हिशेब ठेवणाऱ्या भगवान चित्रगुप्ताची पूजा, व्यापाऱ्यांसाठी हा दिवस महत्त्वाचा का, जाणून घ्या

Bhai Dooj 2021 : भाऊबीजेचा सण का साजरा करतात, जाणून घ्या पौराणिक कथा आणि शुभ मुहूर्त

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI