Chanakya Neeti : आयुष्यात फक्त या 5 गोष्टी लक्षात ठेवा, कधीच अपयश येणार नाही
चाणक्य म्हणतात अनेकदा आपण उताविळपणाच्या भरात असे काही निर्णय घेतो, ज्यामुळे आपलं प्रचंड नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे कोणताही निर्णय घेताना तो विचारपूर्वकच घ्या, ज्यामुळे तुम्हाला त्याच्यापासून भविष्यात कोणतंही नुकसान होणार नाही.

आपण सर्वच जण आपल्या दैनंदिन जीवनात वेगवेगळ्या समस्यांचा सामना करत असतो. कधी -कधी आपण एखाद्या घटनेमुळे उदास असतो, तर कधी-कधी आपल्याला प्रचंड राग आलेला असतो, अनेकदा उताविळपणात आपण असे निर्णय घेतो त्याचा मोठा फटका आपल्याला भविष्यात बसतो. उताविळपणात आपण काय करतोय? काय निर्णय घेतोय याचा सारासार विचार करण्याची ताकद आपण गमावून बसलेलो असतो. तर अनेकदा आपल्यासमोर अशी परिस्थिती असते की आपल्याला तातडीनं निर्णय घेण्याची गरज असते, अशा वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये जर आपल्याला अपयश टाळायचं असेल तर चाणक्य यांनी काही नीती सांगितल्या आहेत, ज्या तुम्हाला यशाच्या मार्गापर्यंत पोहोचवू शकतात, आज आपण त्याबद्दलच जाणून घेणार आहोत.
उताविळपणात कोणताही निर्णय घेऊ नका – चाणक्य म्हणतात उताविळपणात कोणताही निर्णय घेणं व्यक्तीनं टाळलं पाहिजे, कारण उताविळपणात घेतलेले 99 टक्के निर्णय हे चुकण्याचीच शक्यता असते. त्यामुळे तुम्हाला भविष्यात मोठं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे उताविळपणात निर्णय घेऊन आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका. विचारपूर्वक निर्णय घ्या.
शत्रूच्या शक्तीचा योग्य अंदाज लावा – चाणक्य म्हणतात शत्रू तुमच्यासमोर कोणत्याही रुपात येऊ शकतो, त्यामुळे शत्रूवर वार करण्यापूर्वी त्याच्या ताकदीचा योग्य अंदाज लावा. जर शत्रू तुमच्यापेक्षा अधिक बलवान असेल तर त्यामुळे तुमचंच नुकसान होऊ शकतं, त्यामुळे शत्रूवर कोणताही विचार न करता थेट वार करणं टाळा.
योजना गुप्त ठेवा – चाणक्य म्हणतात तुम्हाला जर एखादं लक्ष्य प्राप्त करायचं आहे, आणि त्यासाठी तुम्ही एखादी योजना बनवली तर ती गुप्त ठेवा. जर तुम्ही तुमची योजना सांगितली तर तुम्हाला धोका होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही जेवढी तुमची योजना गुप्त ठेवता, तेवढं अधिक यश तुम्हाला मिळण्याची शक्यता अधिक असतो.
सन्मान – जर तुम्ही एखाद्या ठिकाणी गेलात तर त्या ठिकाणी तुम्हाला मान-सन्मान कोणत्या उद्देशातून दिला जात आहे हे लक्षात घ्या, अनेक ठिकाणी आपला स्वार्थ साधण्यासाठी समोरचा व्यक्ती तुम्हाला मान देतो, अशा लोकांपासून सावध रहा असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.
योग्य वेळेची वाट पहा – चाणक्य म्हणतात प्रत्येक गोष्टीसाठी एक योग्य वेळ असतो, त्या वेळेची वाट पहावी आणि जेव्हा ती वेळ येते तेव्हाच ते काम पूर्ण करावं. तोपर्यंत संयम ठेवावा, तरच तुम्हाला यश मिळू शकतं.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
