Chanakya Neeti : हे चार लोक सापापेक्षाही असतात जास्त विषारी त्यांची संगत आजच सोडा, चाणक्य काय म्हणतात?
चाणक्य म्हणतात समाजात असे काही लोक असतात जे साप आणि विंचवापेक्षाही जास्त विषारी असतात, जेव्हा वेळ येते तेव्हा ते आपला खरा रंग दाखवतात, त्यामुळे अशा लोकांपासून आपण नेहमी सावध राहावं

आर्य चाणक्य हे एक भारतातील मोठे विचारवंत, कुटनीती तज्ज्ञ आणि अर्थतज्ज्ञ होते. त्यांनी आपल्या कुटनीतीच्या जोरावर मौर्य वंशाची राजवट निर्माण केली. चंद्रगुप्त मौर्य सारख्या एका सामन्य मुलाला राजा बनवलं. चाणक्य हे केवळ कुटनीती तज्ज्ञच नव्हते, तर त्यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये असे अनेक विचार मांडले आहेत. जे आजही आपलं आयुष्य जगत असताना अनेकांना मार्गदर्शन करतात. चाणक्य म्हणतात तुमच्या आयुष्यात असे काही लोक असतात जे साप आणि विंचवापेक्षाही जास्त विषारी असतात, अशा लोकांपासून वेळीच सावध होण्याचा सल्ला चाणक्य देतात. जर तुम्ही अशा लोकांवर डोळे झाकून विश्वास ठेवला तर त्यात तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं असंही चाणक्य यांनी म्हटलं आहे. जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे त्याबद्दल?
चाणक्य यांच्या मते काही लोक हे शत्रू, साप आणि विंचवापेक्षाही जास्त खतरनाक असतात. अशा लोकांना वेळीच ओळखता आलं पाहिजे, त्यांच्यापासून दूर राहण्यातच तुमचं हीत आहे. या प्रकारचे लोक कधीही तुमचा विश्वासघात करू शकतात असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.
स्वार्थी लोक – चाणक्य म्हणतात माणसानं नेहमी स्वार्थी लोकांपासून दूर राहिले पाहिजे, असे लोक आपल्या स्वार्थासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. आपला स्वार्थ साधण्यासाठी हे लोक तुमचा विश्वासघात करू शकतात. प्रसंगी ते तुम्हाला इजा करू शकतात किंवा तुमच्या मृत्यूचा कट देखील रचू शकतात, त्यामुळे नेहमी अशा लोकांपासून सावध राहिलं पाहिजे असा सल्ला चाणक्य नीतीमध्ये चाणक्य यांनी दिला आहे.
धूर्त लोक – चाणक्य म्हणतात अशा लोकांवर कधीही विश्वास ठेवू नका, असे लोक आपल्या थोड्याशा फायद्यासाठी कोणतंही पाऊल गाठू शकतात. हे लोक तुमचा विश्वासघात करायला कधीच मागे-पुढे पाहणार नाहीत, त्यांना फक्त आपला स्वार्थ दिसतो.
थट्टा मस्करीमध्ये सर्व मर्यादा ओलंडणारे लोक – चाणक्य म्हणतात ज्या लोकांना समोरच्या व्यक्तीची मस्करी कोणत्या मर्यादेपर्यंत करावी हे कळत नाही, त्या लोकांपासून नेहमी सावध राहावं, कारण अशा लोकांची मस्करी कधी-कधी तुमच्या जीवावर देखील बेतू शकते.
रागीट स्वभावाचे लोक – ज्या लोकांचा स्वाभाव रागीट असतो, जे लोक थोड्या-थोड्या कारणांवरून चिडतात असा लोकांपासून नेहमी सावध राहवं असा सल्ला चाणक्य देतात.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
