AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : पराभवातून सावरून विजय कसा मिळवायचा? चाणक्य यांनी सांगितला यशस्वी जीवनाचा मंत्र

चाणक्य आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये म्हणतात पराभव प्रत्येकाच्या वाट्याला येतच असतात, मात्र या पराभवातून तुम्हाला सावरता आलं पाहिजे. तरच तुम्ही भविष्यात यशस्वी व्यक्ती व्हाल. यशस्वी व्यक्ती होण्यासाठी तुमच्याकडे काही गुण असणं गरजेचं आहे. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे, त्याबद्दल?

Chanakya Niti : पराभवातून सावरून विजय कसा मिळवायचा? चाणक्य यांनी सांगितला यशस्वी जीवनाचा मंत्र
CHANKYAImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 01, 2026 | 9:12 PM
Share

आर्य चाणक्य हे एक मोठे विचारवंत होते, त्यांनी आपल्या बुद्धीच्या बळावर धनानंद सारख्या बलाढ्य राजाचा पराभव केला आणि चंद्रगुप्त मौर्य यांना राजा केलं. चाणक्य यांचा हा प्रवास खूप अवघड होता. या काळात त्यांच्या वाट्यात अनेक अडचणी आल्या, मात्र त्यांनी त्यावर मात केली आणि शेवटी विजय मिळवला. चाणक्य यांचा जेव्हा धनानंद सोबत लढा सुरू होता, तेव्हा त्यांच्या वाट्यालाही अनेकदा पराभव आला, मात्र ते थांबले नाहीत, तर त्यांनी त्यावर मार्ग शोधून काढला. चाणक्य यांना जेव्हा -जेव्हा पराभवाचा सामना करावा लागला, त्यानंतर त्यातून सावरत ते पुढच्या वेळी अधिक ताकदीने धनानंद सोबत लढते. चाणक्य यांना आपल्या आयुष्यात जे -जे काही अनुभव आले, त्या अनुभवाचं सार चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये सांगितलं आहे. चाणक्य आपल्या या ग्रंथामध्ये म्हणतात की माणसाचा जय पराजय सुरूच राहतो, परंतु जेव्हा तुमचा पराभव होतो, तेव्हा त्यातून तुम्हाला सावरता आलं पाहिजे, तरच भविष्यात तुम्ही यशस्वी होऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

पराभवाची कारणं – चाणक्य म्हणतात जेव्हा तुमचा पराभव होतो, तेव्हा तुम्ही खचून जाऊ नका, तर पराभवानंतर आपण का हरलो? आपल्याला अपयश का आलं? या कारणांचा शोध घ्या. पराभवातून योग्य तो धडा घ्या आणि पुन्हा कामाला लागा. तुम्हाला भविष्यात नक्की यश मिळणार असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

शत्रूची ताकद ओळखा – चाणक्य म्हणतात तुमचा शत्रू किती बलवान आहे, त्याचा आधी नीट अंदाज घ्या. त्यानतंर तुम्ही तुमची रणनीती ठरवा. तुम्ही तुमच्या शत्रूसोबत कसा लढा देणार आहात? याचं व्यवस्थित नियोजन करा, त्यानंतरच तुम्ही तुमच्या शत्रूवर हल्ला करा. लक्षात ठेवा शत्रूला कधीही सावध होण्याची संधी देऊ नका, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

धैर्य आणि संयम – चाणक्य म्हणतात जेव्हा एखाद्या व्यक्तीचा पराभव होतो, तेव्हा अशावेळी तो लगेच आपलं धैर्य आणि संयम गमावून बसतो. मात्र ती चूक तुम्ही करू नका. जेव्हा पराभव होतो, तेव्हा संयम ठेवा आणि अधिक जोमाने कामाला लागा, यश तुमचंच आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात..
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात दिलासा
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे जरांगे पाटलांना...
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनोज जरांगे पाटील यांना आवाहन
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता