AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti | ज्या व्यक्तीत असतात हे 4 गुण, ती मोठ्या-मोठ्या संकटांना तोंड देऊ शकते

एक शांत आणि सद्गुणी व्यक्ती प्रत्येक आव्हानावर सहज विजय मिळवते. तर जी आपल्या सवयी मोडू शकत नाही, त्याला कोणीही अडचणीतून मुक्त करु शकत नाही (Chanakya Niti Person with these four qualities can easily overcome any and biggest difficulty in life according to Acharya Chanakya).

Chanakya Niti | ज्या व्यक्तीत असतात हे 4 गुण, ती मोठ्या-मोठ्या संकटांना  तोंड देऊ शकते
Acharya Chanakya
| Edited By: Nupur Chilkulwar | Updated on: Jul 02, 2021 | 7:36 AM
Share

मुंबई : प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात बर्‍याच समस्या येतात. परंतु काही लोक त्या समस्यांमधून सहज बाहेर पडतात, तर काही लोक त्यात अधिक अडकत जातात. हे सर्व व्यक्तीमधील गुण आणि क्षमता यांच्यामुळे घडते. एक शांत आणि सद्गुणी व्यक्ती प्रत्येक आव्हानावर सहज विजय मिळवते. तर जी आपल्या सवयी मोडू शकत नाही, त्याला कोणीही अडचणीतून मुक्त करु शकत नाही (Chanakya Niti Person with these four qualities can easily overcome any and biggest difficulty in life according to Acharya Chanakya).

आचार्य चाणक्य यांनी अशा चार गुणांबद्दल सांगितले आहे, जे एखाद्या व्यक्तीमध्ये असल्यास ते सर्वात मोठ्या संकटावरही सहज मात करु शकतात. परंतु हे गुण कोणावरही जबरदस्तीने लादले जाऊ शकत नाहीत, ते स्वतःच विकसित करावे लागते.

1. योग्य आणि अयोग्य यातील फरक स्वतःला त्या व्यक्तीला समजून घ्यावे लागतात. ज्यामध्ये ही समज विकसित असली, तो भविष्यातील सर्व समस्या उद्भवण्यापूर्वीच थांबवतो. योग्य आणि अयोग्य यांच्यात भेद करण्याची ही गुणवत्ता एकतर जन्मजात किंवा अनुभवाद्वारे मिळविली जाते. हे कोणालाही शिकवले जाऊ शकत नाही कारण प्रत्येक परिस्थिती ही वेगळी असते.

2. धैर्य हे असे गुण आहे जे एखाद्या व्यक्तीला अगदी वाईट काळातूनही बाहेर काढू शकते. पण धीर धरणे ही प्रत्येकासाठी सहज नाही. ज्यांना संयमाचे महत्त्व माहित आहे, ते जीवनाची प्रत्येक पायरी विचारपूर्वक घेतात. पण धैर्याचा हा गुण कोणालाही लादला जाऊ शकत नाही. एखाद्याला स्वत: सराव करुन जीवनात हा गुण आत्मसात करावा लागतो.

3. आपली वाणी नेहमी गोड ठेवावी, हे आपण लहानपणापासूनच ऐकत आलो आहोत. गोड बोलण्याने कोणाचेही मन मोहित होऊ शकते आणि सर्वात मोठ्या संकटांनाही ते टाळू शकते. परंतु जो माणूस नेहमी कडू बोलण्याची सवय ठेवतो, आपण त्याला गोड बोलायला शिकवू शकत नाही. हा गुण जन्मापासूनच मनुष्यांमध्ये असतो.

4. दान करण्याबाबत आपल्या शास्त्रातही सांगितलं गेलं आहे. पण, दान करण्याची सवय प्रत्येकाला नसते. आपण कोणालाही दानाचे महत्त्व समजावून सांगू शकतो, परंतु ही गुणवत्ता जन्मापासूनच प्रत्येक व्यक्तीमध्ये असते. ज्यांमधये हा गुण नाही, त्यांना हे शिकवले जाऊ शकत नाही.

Chanakya Niti Person with these four qualities can easily overcome any and biggest difficulty in life according to Acharya Chanakya

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Chanakya Niti | ज्या घरात या तीन गोष्टींची काळजी घेतली जाते, तिथे लक्ष्मीदेवीची कृपा असते

Chanakya Niti | अभ्यास, प्रवास आणि शेती करताना आचार्य चाणक्य यांचे हे सल्ले लक्षात ठेवा…

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...