AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘हि’ तीन प्रकारची लोकं असतात नेहमी श्रीमंत, स्वर्गासारखा घेतात आनंदाचा उपभोग

आचार्य चाणक्य यांची नीतिशास्त्र बरीच प्रसिद्ध आहे. नीतीशास्त्रात आचार्य चाणक्य यांनी जीवनाचे सार सांगितले आहे.

'हि' तीन प्रकारची लोकं असतात नेहमी श्रीमंत, स्वर्गासारखा घेतात आनंदाचा उपभोग
| Edited By: | Updated on: Nov 22, 2024 | 4:43 PM
Share

आचार्य चाणक्य यांच्या धोरणांचे अनुसरण केल्यास माणूस यशाची शिखरे गाठू शकतो. त्यांची ही धोरणे सध्याच्या काळातही खूप लाभदायक आहेत. चंद्रगुप्त मौर्ययांच्या काळात नंद वंशाच्या पतनात आचार्य चाणक्य यांचा मोलाचा वाटा होता. आचार्य चाणक्य यांची नीतिशास्त्र जगभर बरीच प्रसिद्ध आहे. नीतीशास्त्रात आचार्य चाणक्य यांनी जीवनाचे सार सांगितले आहे. या नीतिशास्त्रात आचार्य चाणक्य यांनी सांगितले आहे की, पृथ्वीवर तीन प्रकारचे लोकं सुख उपभोगतात. ते ही आपल्या आयुष्यात पुढे जातात. चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल कोण ही तीन लोकं

श्यस्य पुत्रो वशीभूतो भार्या छन्दानुगामिनी। विभवे यश्च सन्तुष्टस्तस्य स्वर्ग इहैव हि।। आचार्य चाणक्य यांच्या नीतीशास्त्रातील दुसऱ्या अध्यायातील तिसऱ्या श्लोकात असे म्हटले आहे की, तीन प्रकारचे लोकं जीवनात नेहमी श्रीमंत आणि आनंदी असतात. ही तीन लोकं आयुष्यात नेहमीच प्रगती करतात. त्यांच्या घरात नेहमी सुख-शांती असते. दु:ख त्यांच्या जवळही येत नाही.

कोण आहेत ते तीन लोकं ?

आचार्य चाणक्य यांच्या या श्लोकानुसार या पृथ्वीवर ही तीन लोकं पिता स्वर्गासारखा आनंदाचा उपभोग घेत असतात. या तीन लोकांची मुलं त्याच्या ताब्यात असतात. तसेच त्यांच्या आज्ञेनेचे पालन करतात. अशी लोकं त्याच्या आयुष्यात खूप सुखी जीवन जगत असतात. सध्या आपल्याला काही समाजात पिता आणि पुत्र यांच्यातील आज्ञापालनाचे स्वरूप लोप पावत चालले आहे. म्हणूनच चाणक्य म्हणतात की, पिता भाग्यवान असतो ज्याचा मुलगा त्याच्या प्रत्येक आज्ञेचे पालन करतो.

आचार्य चाणक्य म्हणतात की या पृथ्वीवर अशी व्यक्ती अत्यंत श्रीमंत मानली जाते, ज्याची पत्नी तिच्या पतीच्या प्रत्येक आज्ञा आपलस मानून काम करत असते.अशी लोकं खूप भाग्यवान मानली जातात. ज्या घरात नवरा-बायकोचं नातं गोड असतं. त्यांचं घर स्वर्गापेक्षा कमी नाही. अशा लोकांच्या घरात सुख, शांती आणि समृद्धी राहते.

आचार्य चाणक्य त्यांच्या श्लोकाच्या शेवटी स्पष्ट सांगितलेले आहे की जो भगवंताच्या कृपेने आणि आपल्या कष्टातून मिळणाऱ्या संपत्तीने समाधानी असतो. जोपर्यंत तो या पृथ्वीवर राहतो, तोपर्यंत तो सुख-शांतीचे जीवन जगतो. अशा व्यक्तीला आयुष्यात कधीही दु:खाला सामोरे जावे लागत नाही. तो आपले जीवन समाधानाने जगत असतो.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल