Chanakya Niti : माणसाच्या आयुष्यातील तीन सर्वात मोठी दु:ख कोणती? चाणक्य काय म्हणतात?
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य म्हणतात माणसाचं आयुष्य हे अनेक खाच खळग्यांनी भरलेलं असतं, त्यावर आपल्याला मात करता आली पाहिजे.

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळात देखील मार्गदर्शक ठरतात. अनेकांना आपलं आयुष्य जगण्याची प्रेरणा देतात. चाणक्य म्हणतात माणसाचं आयुष्य हे अनेक चढ -उताराने भरलेलं असतं. तुमच्या आयुष्यात कधी आनंदाचे क्षण येतात, तर कधी दु:खाचे प्रत्येकाची वेळ बदलत असते. आज दु:ख आहे, तर उद्या आनंद. परंतु माणसाने दोन्ही स्थितीमध्ये संयम ठेवायला शिकलं पाहिजे. तुम्ही जर दु:खाच्या काळात संयम ठेवला तर त्यानंतर तुम्हाला नक्कीच यश मिळणार आहे. मानसाने नेहमी प्रयत्न करत राहिलं पाहिजे. परंतु माणसाच्या आयुष्यात अनेकदा असे देखील क्षण येतात, जे त्याच्या दु:खाचं सर्वात मोठं कारण ठरतं. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.
अडाणीपण – चाणक्य म्हणतात जो माणूस कधीच शिकत नाही, ज्याला लिहिला वाचता येत नाही, अशा माणसाचं दु:ख हे सर्वात मोठं असतं. कारण आयुष्य जगत असताना अशा माणसाला त्याच्या जीवनात प्रचंड संघर्ष करावा लागतो. अशा व्यक्तीची व्यवहारामध्ये फसवणूक होते. शिक्षण नसल्यामुळे अशा व्यक्तींना कायम कष्टाचीच कामं करावी लागतात. त्यांना त्यांच्या कष्टाचा योग्य मोबदला देखील मिळत नाही. त्यामुळे माणसाने कधीही अडाणी राहू नये, माणसाने शिकलं पाहिजे, असा सल्ला चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये दिला आहे.
तारुण्यात भरकटने – चाणक्य म्हणतात माणसाचं तारुण्य म्हणजे देवाने त्याला दिलेलं वरदान असतं. आपल्या तारुण्यामध्ये लाथ मारीन तिथे पाणी काढण्याची हिंमत माणसात असते, परंतु तो जर त्याच्या तारुण्यात भरकटला तर आयुष्यभराचा पश्चाताप त्याच्या वाट्याला येतो. त्यामुळे तारुण्यात कोणतीही चूक न करता माणसाने केवळ आपल्या कामाशी प्रामाणिक राहिलं पाहिजे, प्रचंड कष्ट केले पाहिजेत, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.
परावलंबी जीवन – चाणक्य म्हणतात कधी- कधी आपल्या स्वत:चं हक्काचं घर असून देखील तुमच्यावर दुसऱ्याच्या घरात राहण्याची वेळ येते. यापेक्षा दुसरं मोठं दु:ख या जीवनात असू शकत नाही.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
