AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : आयुष्यात या 5 लोकांचं अनुकरण नकोच, अन्यथा विनाश अटळ, चाणक्य काय म्हणतात?

आर्य चाणक्य म्हणतात समाजामध्ये जसे काही चांगले लोक असतात, तसेच काही वाईट देखील लोक असतात. त्यामुळे आपण कोणाचं अनुकरण करत आहोत, हे आपल्याला कळालं पाहिजे, जर आपण चुकीच्या लोकांचं अनुकरण केलं तर आपण मोठ्या संकटात सापडू शकतो.

Chanakya Niti : आयुष्यात या 5 लोकांचं अनुकरण नकोच, अन्यथा विनाश अटळ, चाणक्य काय म्हणतात?
ChanakyaImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jan 25, 2026 | 8:30 PM
Share

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये चाणक्य यांना आपल्या जीवनात जे अनुभव आले, ते अनुभव चाणक्य यांनी या ग्रंथामध्ये सांगितले आहेत, तसेच कोणत्या परिस्थितीमध्ये माणसाचं वर्तन कसं असावं? याबद्दल देखील चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य यांचे हे विचार आजही अनेकांसाठी मार्गदर्शक ठरतात. चाणक्य म्हणतात आपल्या आयुष्यात आपल्याला दोन प्रकारचे लोक भेटतात, एक चांगल्या स्वभावाचे लोक असतात, जे नेहमी दुसर्‍यांच्या भल्याचा विचार करतात. तर दुसरीकडे असे देखील लोक असतात जे दुसऱ्याला जास्तीत जास्त त्रास कसा होईल, याचाच सतत विचार करत असतात, त्यांना त्यामधून आनंद मिळतो, मात्र हा आनंद क्षणिक असतो. परंतु तुम्ही जर अशा लोकांचं अनुकरण केलं तर तुम्ही देखील मोठ्या संकटात सापडू शकता. त्यामुळे पाच प्रकारच्या लोकांचं अनुकरण कधीच करू नये.

स्वार्थी लोक – आर्य चाणक्य म्हणतात स्वार्थी लोकांचं अनुकरण कधीच करू नका, जे स्वार्थी लोक असतात, ते नेहमी आपल्या फायद्याच्याच गोष्टी पहात असतात, आणि एक दिवस असा येतो की ते मोठ्या संकटात सापडतात. तुम्ही जर अशा लोकांचं अनुकरण केलं तर तुम्ही देखील एक दिवस मोठ्या संकटात सापडू शकता.

अंहकारी लोक – ज्या व्यक्तीला कोणत्याही गोष्टीचा जसं की पैसा, ताकद अशा कोणत्याही गोष्टीचा गर्व झाला असेल तर तुम्ही चुकूनही अशा लोकांचं अनुकरण करू नका, कारण या गोष्टी माणसाजवळ फार काळ टिकत नाही, मात्र तुमच्या अंहकारामुळे तुमच्याजवळ असलेली माणसं तुमच्यापासून दुरावली जातात, त्यामुळे अशा लोकांचं अनुकरण करू नका असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

आळशी लोक – चाणक्य म्हणतात जे लोक काही कामधंदा करत नाहीत, नुसते बसून असतात. अशा लोकांचं अनुकरण करू नका, त्यामुळे तुम्ही एक दिवस संकटात सापडाल.

अप्रामाणिक लोक – चाणक्य म्हणतात जे लोक आपल्या कामाप्रती प्रामाणिक नसतात, अशा लोकांचं अनुकरण कधीही करू नये, त्यामुळे तुम्ही संकटात सापडाल, लोकांचा तुमच्यावर असलेला विश्वास कमी होईल. समाजामध्ये तुमची किंमत राहणार नाही.

असत्य बोलणारे लोक- चाणक्य म्हणतात ज्या लोकांना खोटं बोलण्याची सवय असते, अशा लोकांचं देखील कधीच अनुकरण करू नये.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
हैदराबाद गॅझेटवर शिवेंद्रराजे भोसले यांचा मोठा खुलासा; मराठा आरक्षणा..
हैदराबाद गॅझेटवर शिवेंद्रराजे भोसले यांचा मोठा खुलासा; मराठा आरक्षणासह शेतकरी मदतीबाबत काय म्हणाले?
जरांगेंच्या निर्णयाचे स्वागत, त्यांची समाजाला गरज, बजरंग सोनवणेंचं...
Bajrang Sonavane | जरांगेंच्या निर्णयाचे स्वागत, त्यांची समाजाला गरज, बजरंग सोनवणेंचं मोठं वक्तव्य
एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये अचानक तांत्रिक बिघाड, गुजरातच्या...
एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये अचानक तांत्रिक बिघाड, गुजरातच्या वडनगरहून रस्ते मार्गाने रवाना
शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठाम, फडणवीसांचं मोठं आश्वासन
Devendra Fadnavis | शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठाम, फडणवीसांचं मोठं आश्वासन; 5 ऑक्टोबरनंतर पंचनामे होणार
उद्धव ठाकरे गणेश महासंघ कार्यालयाच्या भेटीला, छत्रपती संभाजीनगरात...
उद्धव ठाकरे गणेश महासंघ कार्यालयाच्या भेटीला, छत्रपती संभाजीनगरात मोठ्या हालचाली
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली संभाजीनगरमध्ये तुमसे ना हो पाएगा...
उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली संभाजीनगरमध्ये तुमसे ना हो पाएगा आंदोलनाचा समारोप
सिद्धार्थ गोरे प्रकरणात जिंदाल कंपनी अडचणीत
Nashik | सिद्धार्थ गोरे प्रकरणात जिंदाल कंपनी अडचणीत, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे प्रशासनाचे आदेश
धाराशिवमध्ये मराठा आंदोलकांना ताब्यात घेतल्याने गोंधळ; कैलास पाटील...
धाराशिवमध्ये मराठा आंदोलकांना ताब्यात घेतल्याने गोंधळ, ठाकरेंचे आमदार थेट...
मराठवाड्याच्या रखडलेल्या प्रकल्पांवरून ठाकरे सेना आक्रमक
Uddhav Thackeray : मराठवाड्याच्या रखडलेल्या प्रकल्पांवरून ठाकरे सेना आक्रमक, संभाजीनगरात आंदोलन
धाराशिवमध्ये अजब कारभार; जिल्ह्यातील विकास समितीच्या बैठकीत...
धाराशिवमध्ये अजब कारभार; जिल्ह्यातील विकास समितीच्या बैठकीत... नेमकं काय घडतंय?