AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Garuda Purana : ‘या’ पाच व्यक्तींची संगत तुम्हाला विनाशाच्या मार्गावर नेईल

संगतीचा एखाद्या व्यक्तीच्या जीवनावर निश्चितच मोठा परिणाम होतो (Garuda Purana). जर संगत चांगली असेल, तर त्या व्यक्तीच्या जीवनाला एक योग्य दिशा मिळते, परंतु जर व्यक्तीची संगत वाईट असेल तर चांगली व्यक्ती देखील चुकीच्या मार्गावर जाते आणि आपलं आयुष्य खराब करते.

Garuda Purana : 'या' पाच व्यक्तींची संगत तुम्हाला विनाशाच्या मार्गावर नेईल
मृत्यूच्या वेळी कोणत्या लोकांना काय भोगावे लागतात कष्ट
Nupur Chilkulwar
Nupur Chilkulwar | Updated on: Jun 06, 2021 | 10:28 AM
Share

मुंबई : संगतीचा एखाद्या व्यक्तीच्या जीवनावर निश्चितच मोठा परिणाम होतो (Garuda Purana). जर संगत चांगली असेल, तर त्या व्यक्तीच्या जीवनाला एक योग्य दिशा मिळते, परंतु जर व्यक्तीची संगत वाईट असेल तर चांगली व्यक्ती देखील चुकीच्या मार्गावर जाते आणि आपलं आयुष्य खराब करते. गरुड पुराणात देखील अशा काही लोकांबद्दल सांगण्यात आलं आहे, ज्यांपासून अंतर ठेवण्यातच शहाणपण आहे (Company Of These Five Types Of People Will Take You To Destruction By Garuda Purana).

सनातन धर्मातील 18 महापुराणांपैकी एक गरुड पुराण मानले जाते. अशा सर्व धोरणांचा उल्लेख गरुड पुराणात केला गेला आहे जो तुमच्या भविष्यासाठी उत्तम आहे. गरुड पुराणात जीवनापासून मृत्यूपर्यंत आणि मृत्यूनंतरच्या घटनांचे वर्णन केले आहे. गरुड पुराणात ज्या पाच लोकांपासून अंतर ठेवण्यास सांगण्यात आले आहे त्यांच्याबद्दल जाणून घेऊ –

नशिबाच्या भरवशावर राहणारे लोक

असे काही लोक आहेत जे केवळ नशिबाच्या भरवशावर असतात. असे लोक प्रत्यक्षात कर्म न करत आणि त्यासाठी इतरांना प्रेरित करण्याचा प्रयत्न करतात. पण, आयुष्यात कर्म केल्याशिवाय आपलं नशिबही आपल्याला साथ देत नाही. कर्म केल्याने नशीब बदलले जाऊ शकते, परंतु नशिबाच्या भरवशावर कर्म सोडू शकत नाही. नशिबावर अवलंबून असलेल्यांपासून दूर राहावे.

नकारात्मक विचार करणारे लोक

बरेच लोक जीवनात इतके नकारात्मक असतात की त्यांना प्रत्येक गोष्टीत काही नकारात्मकता दिसते. असे लोक आपल्या यशामध्ये नेहमीच अडथळा ठरतात. जर अशी नकारात्मक विचारसरणीची माणसे आपल्या सभोवताल राहत असतील तर त्यांच्यापासून अंतर ठेवण्यातच शहाणपण.

दिखावा करणारे लोक

काही व्यक्ती असे असतात ज्यांना फक्त प्रत्येक गोष्टीवर शो ऑफ करायचं असते, ते नेहमी स्वत:ला मोठं दाखवण्याचा प्रयत्न करतात. असे लोक स्वतःच्या अहंकाराला संतुष्ट करण्यासाठी हे करतात. यासाठी ते इतरांना दुखावण्यासही संकोच करत नाहीत. अशा लोकांपासून नेहमीच दूर रहावे.

व्यर्थ गोष्टींमध्ये वेळ वाया घालवणे

संगत नेहमी अशा लोकांची ठेवावी ज्यांच्याकडून तुम्हाला काहीतरी शिकायला मिळेल. परंतु काही व्यक्ती फक्त बोलतात आणि बोलण्यात व्यर्थ वेळ घालवतात, ते कोणतेही कार्य व्यवस्थित करत नाहीत. अशा व्यर्थ गोष्टी करणार्‍या लोकांपासून दूर राहणे आपल्यासाठी चांगले आहे. असे लोक आपला बहुमूल्य वेळ वाया घालवतात.

आळशी लोक

आळशी व्यक्ती त्याच्या अपयशाला स्वत:ला जबाबदार असतो. परंतु तो आपल्या अपयशाचा दोष नेहमी नशिबावर किंवा दुसऱ्या व्यक्तीला देतो. त्याला स्वतःच्या उणिवा दिसत नाही. अशा लोकांपासून नेहमीच दूर रहावे.

Company Of These Five Types Of People Will Take You To Destruction By Garuda Purana

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Garuda Purana | या तीन सवयी कुटुंबात भांडणे आणि मतभेदांचे कारण ठरु शकतात

Garuda Purana | ‘या’ सवयींमुळे देवी लक्ष्मी होतात नाराज, गरुड पुराणातही आहे याचा उल्लेख

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...