AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Diwali 2022: दिवाळीतल्या सूर्यग्रहणाचा गर्भवती महिलांवर होणार ‘हा’ परिणाम

दिवाळीत सूर्यग्रहण आल्यामुळे अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. विशेषतः गर्भवती महिलांच्या बाबतीत कोणती काळजी घेणे आवश्यक आहे हे जाणून घेऊया.

Diwali 2022: दिवाळीतल्या सूर्यग्रहणाचा गर्भवती महिलांवर होणार 'हा' परिणाम
ग्रहण आणि गर्भवतींनी घ्यायची काळजी Image Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Oct 24, 2022 | 5:56 PM
Share

मुंबई,  यावर्षी, वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण दिवाळीच्या (Diwali 2022) एका दिवसानंतर, 25 ऑक्टोबर 2022 रोजी मंगळवारी म्हणजेच उद्या  होत आहे. सूर्यग्रहण असो की चंद्रग्रहण असो, दोन्हीचा मानवी जीवनावर खूप मोठा परिणाम होत असतो.  ज्योतिषांच्या मते, या काळात काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. जो व्यक्ती या काळात सांगितलेली खबरदारी घेत नाही, त्याला ग्रहणाच्या दुष्परिणामांना सामोरे जावे लागू शकते. चला तर मग आज जाणून घेऊया या सूर्यग्रहणाच्या काळात गर्भवती महिलांनी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात. असे म्हटले जाते की ग्रहणाचा गर्भवती महिलांवर अधिक परिणाम होतो. यादरम्यान काय काळजी घेणे आवश्यक आहे जाणून घेऊया.

सूर्यग्रहण काळात गर्भवती महिलांनी काय करावे आणि काय करू नये-

ज्योतिष आणि धार्मिक मान्यतेनुसार ग्रहण काळात गर्भवती महिलांनी घराबाहेर पडू नये. कारण यावेळी ग्रहणाची किरणे हानिकारक असतात, ज्याचा थेट परिणाम बाळावर होतो. यामागे कुठलीही अंधश्रद्धा नाही.  ग्रहणाचा काळ सुरू होण्यापूर्वी पिण्याच्या पाण्यात तुळशीची पाने टाकावीत. हे पाणी तुम्ही ग्रहणानंतर किंवा ग्रहण काळात पिऊ शकता. तुळशीच्या पानांमुळे पाणी दूषित होत नाही. ग्रहणकाळात पाणी पिणे टाळावे, पण जर प्यायचेच असेल तर तुळशीची पाने टाकून ठेवलेले पाणी प्यावे किंवा या दरम्यान नारळाचे पाणी प्यावे.

ग्रहणाचा काळ हा अध्यात्माचा काळ मानला जातो. या दरम्यान आपल्या इष्टदेवतेचा मानसिक साधना करावी. या काळात गरोदर महिलांनी गायत्री मंत्र, महामृत्युंजय मंत्र, सूर्य मंत्र, विष्णु मंत्र किंवा सुंदरकांडचा पाठ करावा. हे खूप फायदेशीर मानले जाते. याशिवाय आम्ही तुम्हाला सांगतो की, ग्रहण काळात देवाच्या मूर्तीला हात न लावता जप करावा.

ग्रहणाचा कुठला विपरीत परिणाम होईल म्हणून गर्भवती महिलांनी मानसिक ताण घेऊ नये. अनावश्यक मसनिक ताणामुळे बाळाला त्रास होऊ शकतो.

ग्रहण काळात झोपणे देखील निषिद्ध आहे, परंतु जर आजारपणात आणि गर्भधारणेदरम्यान उठणे शक्य नसेल तर तुम्ही देवाचे ध्यान करून झोपू शकता.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
कुणबी प्रमाणपत्रावरून जरांगे पाटील आक्रमक; फडणवीस-बावनकुळेंवर आरोप
कुणबी प्रमाणपत्रावरून जरांगे पाटील आक्रमक; फडणवीस-बावनकुळेंवर गंभीर आरोप
कोणाच्या दबावाखाली प्रमाणपत्र दिलं? जरांगे-सरकारवर काँग्रेसचा हल्ला
Vijay Wadettiwar | कोणाच्या दबावाखाली प्रमाणपत्र दिलं? जरांगे-सरकारवर काँग्रेस नेत्यांचा जोरदार हल्ला
अमित शाह उत्तर द्या च्या घोषणांनी संसद परिसर दणाणलं
Delhi | अमित शाह उत्तर द्या च्या घोषणांनी संसद परिसर दणाणलं; पुन्हा कामकाज स्थगित
अरे, तुम्ही मला पाणीच... धनंजय मुंडेंचा तो व्हिडीओ व्हायरल
अरे, तुम्ही मला पाणीच... सुनेत्रा पवारांच्या उपस्थित पत्रकारांना अडवण्यापूर्वीचा मुंडेंचा व्हिडीओ तुफान व्हायरल
सुप्रीम कोर्टात मोठी सुनावणी; धनुष्यबाणावर कोणाचा हक्क? आज होणार फैसला
Shiv Sena Supreme Court Hearing | सुप्रीम कोर्टात मोठी सुनावणी; धनुष्यबाणावर कोणाचा हक्क? आज होणार फैसला
बांग्लादेश कट्टरपंथ्यांच्या ताब्यात; शेख हसीनांचा गंभीर आरोप
Sheikh Hasina | बांग्लादेश कट्टरपंथ्यांच्या ताब्यात; शेख हसीनांचा गंभीर आरोप, डिसेंबरमध्ये पुनरागमनाची घोषणा!
मोठी बातमी! रणनीतीकार प्रशांत किशोर थेट सुनेत्रा पवारांच्या भेटीला,
मोठी बातमी! रणनीतीकार प्रशांत किशोर थेट सुनेत्रा पवारांच्या भेटीला, बैठकीत... महाराष्ट्राच्या राजकारणातील हालचाली वाढल्या
कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरलेल्या लोकप्रतिनिधींची बैठक; मनोज जरांगे पाटील
कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरलेल्या लोकप्रतिनिधींची बैठक; मनोज जरांगे पाटील यांचा मोठा निर्णय
संविधानाशी द्रोह करणाऱ्यांचा शेवट कायद्यानेच होईल; सुनावणीनंतर...
Sanjay Raut On Shivsena Hearing | आम्ही निश्चिंत आहोत...संविधानाशी द्रोह करणाऱ्यांचा शेवट कायद्यानेच होईल; सुनावणीनंतर संजय राऊतांचा इशारा!
...अन् ते थेट कोर्टाच्या रेकॉर्डवर आलं.’ राऊतांनी सांगितली कोर्टातील म
Sanjay Raut | ...अन् ते थेट कोर्टाच्या रेकॉर्डवर आलं.’ राऊतांनी सांगितली कोर्टातील महत्त्वाची बाब