Shree Ganesha | बुधवारी चुकूनही या गोष्टी करु नये, अन्यथा आर्थिक नुकसान भोगावं लागणार

हिंदू धर्मातील प्रत्येक दिवस देवी-देवतांना समर्पित असतो. बुधवारचा दिवस हा गणपतीचा दिवस मानला जातो (Do Not Do These Things). या दिवशी भाविक गणपतीची पूजा करतात.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 9:27 AM, 5 May 2021
Shree Ganesha | बुधवारी चुकूनही या गोष्टी करु नये, अन्यथा आर्थिक नुकसान भोगावं लागणार
Lord Ganesha

मुंबई : हिंदू धर्मातील प्रत्येक दिवस देवी-देवतांना समर्पित असतो. बुधवारचा दिवस हा गणपतीचा दिवस मानला जातो (Do Not Do These Things). या दिवशी भाविक गणपतीची पूजा करतात. त्याचबरोबर काही लोक या दिवशी उपवास ठेवतात. बुधवारी गणेशाची पूजा केल्यास तुमचे सर्व त्रास दूर होतात. भगवान गणेशाला विघ्नहर्ता म्हणतात, जिथे भगवान गणेश वास्तव्य करतात, तिथे सर्व काही शुभ होतं, अशी मान्यता आहे (Do Not Do These Things On Wednesday To Get Blessings From Lord Shree Ganesha).

बुधवारच्या दिवशी काही कामे करु नये. ही कामे केल्याने घरात अडचणी येतात. बुधवारी कुठल्या गोष्टी करु नये जाणून घ्या –

कर्जाची देवाण-घेवाण

मन्यता आहे की बुधवारी कर्जाची देवाण-घेवाण करु नये. यामुळे आर्थिक समस्या उद्भवू शकतात. या दिवशी कर्ज घेतल्यास आर्थिक नुकसान होऊ शकते. दुसरीकडे जर तुम्ही एखाद्याला पैसे दिले तर तेही फायद्याचे ठरणार नाही.

पश्चिम दिशेने प्रवास करु नये

ज्योतिषशास्त्रानुसार बुधवारी पश्चिम दिशेकडे प्रवास करणे शुभ नाही. पश्चिम दिशेला दिशाशूल असे म्हणतात. आवश्यक नसल्यास बुधवारी पश्चिम दिशेने प्रवास करु नका.

गुंतवणूक

बुधवारी कोणत्याही नवीन कामात गुंतवणूक केल्यास आर्थिक नुकसान होऊ शकते. आपण बुधवार ऐवजी शुक्रवारी गुंतवणूक करा.

काळे कपडे घालू नका

बुधवारी काळ्या रंगाचे कपडे घालू नये. वैवाहिक जीवनाच्या आनंदासाठी आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी विवाहित स्त्रियांनी गडद रंगाचे कपडे घालू नयेत. याशिवाय काळ्या रंगाचे दागिनेही घालू नयेत. यामुळे घरात अशुभता येते.

बोलण्यावर संयम ठेवा

बुध ग्रहाला वाणी कारक मानलं जातं. या दिवशी कोणालाही कटू वचन बोलू नये, अशी मान्यता आहे. या दिवशी प्रत्येकाबरोबर प्रेमाने वागा. असे केल्याने आर्थिक त्रास दूर होईल. तसेच घरात आनंद आणि भरभराट होईल.

Do Not Do These Things On Wednesday To Get Blessings From Lord Shree Ganesha

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Shree Ganesha | श्री गणेशाचं खरं मुख कुठे गेलं? पौराणिक कथा काय सांगते…

Shree Ganesha | भगवान श्री गणेशाचे वाहन मूषक का? चला जाणून घेऊ ही पौराणिक कथा…