दिवाळीची साफसफाई करताना ही चूक अजिबात करू नका; अन्यथा पश्चात्ताप करावा लागेल
दिवाळीची साफसफाई करताना अनेकजण नकळत काही चुका करतात ज्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येते. वास्तुशास्त्रानुसार साफसफाई करताना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे ते जाणून घेऊयात.

दिवाळीसाठी आता काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे सर्वांच्या घरी दिवाळीची खरेदी तसेच साफसफाई सुरु आहे. अनेकांच्या घराची स्वच्छता करण्यात व्यस्त आहेत. दरम्यान वास्तूशास्त्रात दिवाळीच्या स्वच्छतेदरम्यान झालेल्या काही गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. त्या जर पाळल्या नाही तर नक्कीच पश्चात्ताप करण्याची वेळ येऊ शकते. या गोष्टी तुमच्यासाठी आर्थिक समस्या निर्माण करू शकतात. चला जाणून घेऊयात की त्या नक्की कोणत्या गोष्टी आहेत ज्या पाळल्या गेल्या पाहिजेत.
फाटलेले आणि जुने कपडे
दिवाळीत कपड्यांची खरेदी केली जाते. दिवाळीला नवीन आणि स्वच्छ कपडे घालणे शुभ मानले जाते. तसेच घराची स्वच्छता करताना सगळ्यात जुने आणि फाटलेले कपडे फेकून द्या. जे कपडे आता तुमच्यासाठी योग्य नाहीत ते ठेवू शकतात. वास्तुनुसार, जुने आणि फाटलेले कपडे घरात गरिबी आणि दुर्दैवाला आमंत्रण देतात.
तुटलेला किंवा तडा गेलेला आरसा फेकून द्या
घरात तुटलेला आरसा किंवा तडा गेलेला आरसा, किंवा कोणतेही तडा गेलेले काचेचे भांडे घरात ठेवू नका. ते ताबडतोब घरातून बाहेर काढून टाका. दिवाळीसाठी साफसफाई करताना, घरात तुटलेला काच राहणार नाही याची खात्री करा. शास्त्रांनुसार, तुटलेल्या काचेमुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढते आणि नातेसंबंधांमध्ये तणाव निर्माण होतो.
बंद पडलेली किंवा तुटलेली घड्याळे
तुमच्या कपाटात कित्येक वर्षांपासून धुळीत बंद पडलेल घड्याळ, किंवा तुटलेले घड्याळ प्रगतीला अडथळा आणू शकतात. वास्तुशास्त्रानुसार, तुटलेलं घड्याळ अडथळे निर्माण करतात आणि प्रगतीला अडथळा आणतात. म्हणून, दिवाळीच्या स्वच्छतेदरम्यान, तुटलेली आणि बंद पडलेली घड्याळं ताबडतोब दुरुस्त करा किंवा घरातून काढून टाका.
तुटलेल्या किंवा भंग पावलेल्या मूर्ती
दिवाळीपूर्वी सर्वात महत्वाचे काम म्हणजे घरासोबतच देवघर स्वच्छ करणे गरजेचं आहे. देवघरात साफसफाई करताना मंदिरात कोणत्याही मूर्ती तुटल्या किंवा खराब झाल्या असतील तर त्या ताबडतोब घराबाहेर काढा. वास्तु आणि धार्मिक दृष्टिकोनातून हे अत्यंत अशुभ मानले जाते. या मूर्ती कधीही कचऱ्यात टाकू नका. त्या नदी, तलाव किंवा स्वच्छ, वाहत्या पाण्यात विसर्जित करणे चांगले.
तुटलेले फर्निचर
दिवाळीच्या स्वच्छतेदरम्यान तुमच्या घरातील कोणतेही तुटलेले फर्निचर काढून टाकायला विसरू नका. वास्तुनुसार, तुमच्या घरात तुटलेल्या किंवा वाळवीने भरलेल्या लाकडी वस्तू ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा वाढते. यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतात आणि कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. अशा परिस्थितीत, ते दुरुस्त करा किंवा फेकून द्या.
शूज, चप्पल
प्रत्येकाकडे अनेकदा अनेक जोड्या शूज किंवा चप्पल असतातच. पण कधी कधी काही तुटलेल्या चप्पल असतात जे आपण दुरुस्त करण्यासाठी ठेवलेलं असतो. पण ते शक्य होत नसल्यास खराब झालेल्या चप्पल बाहेर काढून टाका. वास्तुशास्त्रानुसार, यामुळे दुर्दैव येते. म्हणून त्या फेकून द्या.
वापरात नसलेल्या वस्तू
दिवाळीच्या स्वच्छतेदरम्यान तुमच्या घरातील सर्व गंजलेल्या किंवा वापरात नसलेल्या वस्तू काढून टाकणे अत्यंत महत्वाचे मानले जाते. गंजलेले लोखंड, जुनी भांडी, बनावट नाणी किंवा तुटलेल्या वस्तू नकारात्मक ऊर्जा पसरवतात. वास्तुनुसार, अशा न वापरात असलेल्या वस्तू घरातील ऊर्जाही नकारात्मक करतात. म्हणून बराच काळ वापरात नसलेल्या वस्तू घराबाहेर फेकून द्या.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
