‘या’ व्यक्तींच्या चुकूनही पाया पडू नका, जाणून घ्या हिंदू धर्मात काय सांगितलंय?
कोणाच्या पाया पडावं, आणि कोणाच्या पाया पडू नये? कधी पाया पडावं आणि कधी पाया पडू नये? याचे देखील काही नियम आपल्या धर्मशास्त्रात सांगितले आहेत. याबाबत जाणून घेऊयात.

हिंदू धर्मामध्ये आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तींच्या पाया पडून आशीर्वाद घेण्याची प्रथा आहे. आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तीच्या पाया पडणं हे हिंदू धर्मामध्ये संस्कृतीचं प्रतीक मानलं जातं. पाया पडून आशीर्वाद घेणाऱ्या व्यक्तीला संस्कारी मानलं जातं. त्यामुळे आपल्या पेक्षा मोठ्या असलेल्या व्यक्तींच्या, गुरुंच्या तसेच देवांच्या पाया पडलं पाहिजे.ते आपल्या उज्वल भविष्यासाठी आशीर्वाद देत असतात. मात्र कोणाच्या पाया पडावं, आणि कोणाच्या पाया पडू नये? कधी पाया पडावं आणि कधी पाया पडू नये? याचे देखील काही नियम आपल्या धर्मशास्त्रात सांगितले आहेत. याबाबत जाणून घेऊयात.
जावयाने सासऱ्याच्या पाया पडू नये, यामागे देखील एक कथा आहे, असं मानलं जातं की भगवान शंकर यांनी आपले सासरे प्रजापती राजा दक्ष यांचं शीर उडवलं होतं. तेव्हापासून या प्रथेचं पालन केलं जातं. जावई सासऱ्याच्या पाया पडत नाही.
कोणत्याही व्यक्तीनं आपल्या मामाच्या पाया पडू नये – भगवान श्रीकृष्ण यांनी आपला मामा कंस याचा वध करून त्याचा उद्धार केला. तेव्हापासून ही प्रथा सुरू झाली असं मानलं जातं. त्यामुळे हिंदू धर्मात मामाच्या पाया पडत नाहीत.
हिंदू धर्मामध्ये कुमारीकेला देवीचं रुप मानलं जातं. त्यामुळे जर घरात कुमारीका असेल तर कोणत्याही व्यक्तीने तिला आपल्या पाया पडू दिलं नाही पाहिजे.
झोपलेल्या व्यक्तीच्या कधीही पाया पडू नका – हिंदू धर्मामध्ये झोपलेल्या व्यक्तीच्या पाया पडणं वर्ज्य आहे. हिंदू धर्मामध्ये अशी मान्यता आहे, जेव्हा व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हाच झोपलेल्या अवस्थेमध्ये त्याच्या पाया पडलं जातं. त्यामुळे व्यक्ती जीवंत असताना झोपलेल्या अवस्थेमध्ये त्याच्या पाया पडू नये.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
जर तुम्हाला तुमच्या एखादा नातेवाईक मंदिरामध्ये भेटला, तर तिथे त्याच्या चुकूनही पाया पडू नका. कारण मंदिरामध्ये केवळ देवाचाच आशीर्वाद घेतला जातो. ईश्वर दर्शन हेच सर्वश्रेष्ठ मानलं जातं. या नियमांचं पालन करूनच आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तीच्या पाया पडावं असं हिंदू धर्मात म्हटलं आहे.