AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चंद्र ग्रहण का लागतं माहिती आहे का?; धार्मिक आणि वैज्ञानिक कारणं वाचाच

16 मे बुद्ध पौर्णिमेंच्या दिवशी वर्षाचे पहिले चंद्र ग्रहण लागणार आहे. चंद्र ग्रहणाला धार्मिक रूपाने पाहिले गेले तर अशुभ घटना मानलं गेलं आहे. जाणून घ्या प्रत्येक वर्षी चंद्र ग्रहण का लागते आणि त्याला अशुभ घटना का मानलं जातं

चंद्र ग्रहण का लागतं माहिती आहे का?; धार्मिक आणि वैज्ञानिक कारणं वाचाच
| Edited By: | Updated on: May 15, 2022 | 6:38 PM
Share

Lunar Eclipse 2022: बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी 2022 वर्षाचे पहिले चंद्र ग्रहण (First Lunar Eclipse 2022) लागणार आहे. प्रत्येक वर्षी चंद्र ग्रहण कोणत्या पौर्णिमेच्या दिवशी आणि चंद्रर ग्रहण कोणत्यातरी अमावस्येच्या दिवशी लागते. वैज्ञानिक दृष्टी ने याला एक खगोलीय घटना मानलं जातं. पण, धार्मिक दृष्टीने ग्रहणाला अशुभ मानलं गेलं आहे. ग्रहणकाळात सूर्य आणि चंद्र संकटांत असतात असं मानलं जातं. सूर्य, चंद्राला हिंदू धर्मात देवता मानलं जातं. यादरम्यान पूजा पाठ तसंच कोणतंही शुभ कार्य करू नयेत असे संकेत आहेत. अशावेळी मंत्रांचा मानसिक जप करण्याचा सल्ला दिला जातो. मे महिन्यातील 16 तारखेला चंद्र ग्रहण लागणार आहे. यामुळेच जाणून घेऊया प्रत्येक वर्षी ग्रहण का लागतं आणि आणि त्यानुसार धार्मिक आणि वैज्ञानिक मान्यता काय आहेत.

काय आहे धार्मिक मान्यता –

धार्मिक मान्यतेनुसार समुद्र मंथना झाल्यावर अमृतावरून देव आणि दानवात वाद सुरू झाला. भगवान विष्णु ने मोहिनी चे रूप धारण केले. सर्व दानवांना प्रभावित केले. मोहिनी ने दैत्य आणि देवगणांना वेगवगळं बसवलं आणि दानवांना सांगितलं की ते सर्वांना अमृत देणार. पण पहिले देवगण अमृत घेणार. सर्व असुर मोहिनीच्या बोलण्यात आले. पण, स्वर्भानु नावाच्या दानवांने मोहिनीची चाल समजली. तो गपचुप जाऊन देवांमध्ये बसला. त्याला तिथे बसताना चंद्र आणि सूर्य यांनी पाहिलं. मोहिनी त्याला अमृत देणारच होती. तेव्हा चंद्र देवाने मोहिनीला त्याच्या बद्दल सांगितले. रागात विष्णु देव त्याच्या अवतारात आले त्यांनी सुदर्शना कडून त्याचा गळा कापला. पण, तोपर्यंत ते अमृत घेवून अमर झाले होते. त्यामुळे चक्राने त्याचे दोन भाग झाले. शरीराचा हिस्सा राहु आणि धडाचा हिस्सा केतु झाला. आपल्या शरीराला या अवस्थेत पाहून राहु आणि केतु चंद्र आणि सूर्य यांच्याशी दुश्मनी झाली. तेव्हा पासून दरवर्षी राहु बदला घेण्यासाठी वर्षाच्या कोणत्यातरी अमावस्येलाच्या दिवशी सूर्याला आपला ग्रहन बनवतो आणि पौर्णिमेच्या दिवशी चंद्राला ग्रहन बनवतो. पण धड नसल्याने काही वेळा नंतर सूर्य आणि चंद्र त्याच्या विळख्यातून सुटतात. ग्रहनाच्या काळात आपले देव संकंटात असतात. त्यामुळे याघटनेला अशुभ मानलं जातं.

वैज्ञानिक दृष्टीकोनातू खगोलीय घटना –

वैज्ञानिक दृष्टीने पाहिले गेले तर ग्रहण एक खगोलीय घटना आहे. खरंतर पृथ्वी सूर्याची परिक्रमा करे आणि चंद्र पृथ्वीची परिक्रमा करतो. परिक्रमेच्या दरम्यान एक क्षण असा येतो की, जेव्हा चंद्र आणि सूर्य पृथ्वीच्या मध्ये येतो आणि पृथ्वीवर सूर्याचा प्रकाश पडत नाही. तेव्हा त्याला सूर्य ग्रहण म्हणातात. तसंच चक्कर मारताना पृथ्वी चंद्र आणि सूर्याच्या मध्ये येते, तेव्हा चंद्रा पर्यंत सूर्याचा प्रकाश पोहचत नाही त्याला चंद्र ग्रहण असं म्हणतात.

मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.