आंघोळीनंतर तुम्हीही करतात या चुका? तर आजच व्हा सावध, वास्तुशास्त्र काय सांगतं?
तुम्हाला माहिती आहे का? की आंघोळीनंतर काही छोट्या-छोट्या चुका तुमच्या हातून होतात, त्याची फार मोठी किंमत तुम्हाला भविष्यात मोजावी लागू शकते, या चुकांमुळे आरोग्याचे काही प्रश्न देखील निर्माण होतात.

आंघोळ करणं ही एक फक्त शरीर स्वच्छ करण्याची क्रियाच नाही तर त्यामुळे तुम्ही दिवसभर फ्रेश राहतात, तुमचा तणाव दूर होतो. मात्र तुम्हाला माहिती आहे का? की आंघोळीनंतर काही छोट्या-छोट्या चुका तुमच्या हातून होतात, त्याची फार मोठी किंमत तुम्हाला भविष्यात मोजावी लागू शकते, या चुकांमुळे आरोग्याचे काही प्रश्न निर्माण होतात, तसेच वास्तुशास्त्रानुसार देखील हे अशुभ मानलं गेलं आहे. त्याबाबत आज आपण माहिती घेणार आहोत.
आंघोळीनंतर बाथरूममध्ये जर सांडपाणी साचत असेल तर ते वास्तुशास्त्रानुसार अशुभ मानलं जातं. त्यामुळे तुम्ही आंघोळ केल्यानंतर जर पाणी साचलं असेल तर त्या पाण्याचा मार्ग मोकळा करा, तुमच्या बाथरूममध्ये जर अंघोळीचं सांडपाणी साचत असेल तर यामुळे राहु केतू नाराज होतात, असं वास्तुशास्त्रामध्ये म्हटलं आहे, यामुळे तुम्हाला आरोग्याच्या काही समस्या निर्माण होऊ शकतात.
वास्तुशास्त्रानुसार आंघोळ केल्यानंतर रिकामी बादली कधीच ठेवू नका, त्यामध्ये थोडं तरी पाणी ठेवा. आंघोळीनंतर बादलीत पाणी न ठेवल्यास घरावर आर्थिक संकट येतात, मोठ्या प्रमाणात धनहानी होते. मोकळी बादली बाथरूममध्ये ठेवणं अशुभ मानलं जातं, त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होतो.
आंघोळ केल्यानंतर बाथरूममध्ये ओले कपडे ठेवू नका, आंघोळ केल्यानंतर बाथरूममध्ये ओले कपडे ठेवणं वास्तुशास्त्रानुसार अशुभ मानलं गेलं आहे. त्यामुळे तुमच्या घरात नकारात्मक ऊर्ज प्रवेश करते.
आघोळ केल्यानंतर लगेचच कपाळाला कुंकू लावू नका, असं म्हटलं जातं की, आघोळीनंतर तुमचं शरीर आणि मन पूर्णपणे स्थिर होऊ द्या, आणि त्यानंतरच कपाळाला कुंकू लावा.
तुमच्या घरातील बाथरूम ही एक अशी जागा आहे, जिथे नकारात्मक ऊर्जा प्रचंड प्रमाणात असते, अशा स्थितीमध्ये तिचा प्रभाव कमी करण्यासाथी बाथरूममध्ये ठेवण्यात आलेल्या सर्व बादल्या या नेहमी भरूनच ठेवाव्यात असंही वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
