Easter Day 2021 | ‘ईस्टर डे’ला अंडी का भेट देतात? जाणून घ्या या दिवसाचं महत्त्व…

ईस्टर डेच्या दिवशी चर्चमध्ये बायबलचं पठन केलं जातं. प्रभू येशूच्या स्मरणात हा दिवस साजरा केला जातो (Easter Day 2021 Know How Easter Day Celebrated And The Story Behind It)

Easter Day 2021 |  'ईस्टर डे'ला अंडी का भेट देतात? जाणून घ्या या दिवसाचं महत्त्व...
Easter Sunday

मुंबई : आज ईस्टर-डे (Easter Day) आहे. ख्रिश्चन समाजाच्या लोकांसाठी आजचा दिवस अत्यंत खास असतो. गुड फ्रायडेच्या दिवशी प्रभू येशू यांचा अनेक प्रकारचा छळ करुन त्यांची हत्या करण्यात आली होती. याच्या दोन दिवसांनंतर म्हणजेच रविवारच्या दिवशी प्रभु येशू पुन्हा जिवंत झाले होते. या दिवसाला ख्रिश्चन समाजाचे लोक उत्सव साजरा करतात. या दिवसाला ईस्टर संडे म्हटलं जातं. ईस्टर डेच्या दिवशी चर्चमध्ये बायबलचं पठन केलं जातं. प्रभू येशूच्या स्मरणात हा दिवस साजरा केला जातो (Easter Day 2021 Know How Easter Day Celebrated And The Story Behind It)

ईस्टर डे का साजरा केला जातो?

ख्रिश्चन धर्मानुसार, गुड फ्रायडेच्या दिवशी प्रभू येशूने आपला देहत्याग केला होता. मृत्यूच्या दोन दिवसांनंतर ते पुन्हा जीवित झाले. मान्यता आहे की पुनर्जन्मानंतर प्रभु येशू 40 दिवसांपर्यंत आपल्या शिष्यांसोबत राहिले. तेव्हापासून 40 दिवस ईस्टरचा उत्सव साजरा केला जातो. हा सण असत्यावर सत्य आणि हिंसेवर अहिंसेचा विजय म्हणून साजरा केला जातो.

ईस्टर डे कसा साजरा केला जातो?

ईस्टर डेचा पहिल्या आठवड्याला ईस्टर वीक म्हटलं जातं. या दिवशी लोक चर्चमध्ये बायबलचं पठन करतात. मेणबत्ती लावतात. या विशेष सणाला चर्चलास सजवलं जाते. मान्यता आहे की प्रभू येशू यांनी त्यांचा जाच करणाऱ्या लोकांनाही माफ केलं होतं.

अंडी भेट देण्याची अनोखी परंपरा

ईस्टर-डेला लोक एकमेकांना अंडी गिफ्ट देतात. मान्यता आहे की, अंडी चांगल्या दिवसाचे संकेत असतात. या दिवशी आई-वडील रंगबिरंगी अंडी लपवतात आणि आपल्या मुलांना अंडी शोधण्यास सांगतात.

ईस्टर रविवारच्या खास गोष्टी

1. ख्रिश्चन लोक ईस्टरला आनंदाचा दिवस मानतात. याला ‘खजूर इतवार’ ही म्हटलं जातं.

2. ईस्टर संडे लोकांमधील बदलाचा दिवस आहे. मान्यता आहे की प्रभू येशूंच्या पुनर्जन्मानंतर त्यांचा छळ करणाऱ्या लोकांना खूप पश्चाताप झाला होता.

3. ईस्टर संडेच्या दिवशी असंख्य मेणबत्त्या लावून प्रभू येशूचे भक्त त्यांच्याप्रती आपली श्रद्धा आणि विश्वास प्रकट करतात.

Easter Day 2021 Know How Easter Day Celebrated And The Story Behind It

संबंधित बातम्या :

Happy Easter Day 2021 : ईस्टर संडेनिमित्त प्रियजनांना पाठवण्यासाठी खास मेसेज !

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI