AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घरात धातूचे कासव ठेवताय, पण माहितीये का योग्य दिशा? जाणून घ्या महत्त्वाचे नियम

अनेकांच्या घरात कासव असल्याचं तुम्हाला दिसलं असेल... अनेक जण घरात धातूचा कासव देखील ठेवतात. पण कासव ठेवण्याची योग्य दिशा कोणाला माहिती नसते. म्हणून घरात धातूचा कासव ठेवण्यापूर्वी महत्त्वाचे नियम जाणून घ्या...

घरात धातूचे कासव ठेवताय, पण माहितीये का योग्य दिशा?  जाणून घ्या महत्त्वाचे नियम
Turtle
| Updated on: Mar 31, 2026 | 12:05 PM
Share

हिंदू धर्म, वास्तुशास्त्र आणि फेंग शुईनुसार, कासवाला आनंद, शांती आणि अफाट समृद्धीचे प्रतीक मानले जाते. धार्मिक श्रद्धा आणि पौराणिक कथांनुसार, विश्वाचे पालनकर्ता भगवान विष्णू यांनी समुद्रमंथनाच्या वेळी ‘कच्छ’ म्हणजेच कासवाचे रूप धारण केले होते. म्हणून कासवाला फार महत्त्व आहे. अनेकांच्या घरात कासव असतो. पण कासव ठेवण्याची योग्य दिशा कोणाला माहिती नसते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे घरात किंवा कार्यालयात कासव ठेवल्याने आर्थिक अडचणी दूर होतात. ते सकारात्मक ऊर्जा देखील प्रसारित करते. मात्र, धातूच्या कासवाचे फायदे तेव्हाच मिळू शकतात, जेव्हा ते योग्य दिशेत आणि योग्य पद्धतीने ठेवले जाते. तर, चला पाहूया की धातूचे कासव घरात कोणत्या दिशेला ठेवावे आणि यासंबंधीचे विशिष्ट नियम काय आहेत?

घरात धातूचे कासव कसे लावावे?

फेंग शुईनुसार, जर तुम्हाला तुमच्या घरात पितळेचे किंवा अष्टधातूचे कासव ठेवायचे असेल, तर त्याच्या खाली पाणी असणे आवश्यक आहे. कारण कासव हा पाण्यात राहणारा प्राणी आहे. म्हणून धातूचे कासव ठेवण्यापूर्वी एका भांड्यात पाणी ठेवा. धातूचे कासव घरातील देवघरात ठेवा. कासव तुम्ही घराच्या हॉलमध्ये देखील ठेऊ शकता. या ठिकाणी धातूचे कासव ठेवल्याने सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो आणि घरात सुख-समृद्धी येते.

धातूचे कासव कोणत्या दिशेला ठेवावे?

वास्तुशास्त्रानुसार, उत्तर दिशा संपत्तीचा देव कुबेर आणि देवी लक्ष्मी यांच्याशी संबंधित आहे. या दिशेत कासव ठेवल्याने घरात पैशाचा ओघ वाढतो. बँक बॅलन्स वाढतो. घरात योग्य दिशेत कासव ठेवल्याने शत्रूंपासूनही सुटका मिळते.

पदोन्नती मिळवण्यासाठी आणि व्यावसायिक नुकसान टाळण्यासाठी पितळी कासव एक वरदान ठरते. कार्यालयात पितळी कासव ठेवल्याने एकाग्रता वाढते आणि कामातील अडथळे दूर होतात. त्यामुळे घरात आणि कामाच्या ठिकाणी देखील कासव ठेऊ शकता.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांचा मराठ्यांसाठी एल्गार, सरकार वारंवार...
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांचा मराठ्यांसाठी एल्गार, सरकार वारंवार....